ई-मेल मार्केटिंगसाठी उपयुक्त ‘मेलचिंप’


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


सर्वच उद्योजक आपला उद्योग आपापल्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि उद्योगवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या ग्राहकांपर्यंत आपला उद्योग पोहोचवणे आणि त्यासाठीच आज तुम्हाला एक ई-मेल मार्केटिंग सॉफ्टवेअरबद्दल माहिती देणार आहे.

त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या ग्राहकांपर्यंत तुमच्या ऑफर्स, जाहिराती तसेच शुभेच्छा ई-मेलद्वारे पाठवू शकता, तेही एका क्लिकवर आणि तेसुद्धा अगदी मोफत. पण यासाठी तुमच्याकडे संगणकाचे बेसिक ज्ञान हवे किंवा याकरिता तुम्ही तुमच्या मित्रमंडळींची किंवा नातेवाईकांची मदत घेऊ शकता.

तर आज मी तुम्हाला ज्या सॉफ्टरवेअरबद्दल सांगणार आहे त्याचं नाव आहे मेलचिंप. मेलचिंप हा एक ऑटोमेशन प्लॅटफॉर्म तसेच ई-मेल मार्केटिंग सेवा आहे. तर आता मेलचिंपचा मोफत प्लॅन कसा वापरायचा ते बघू; पण त्यासाठी मेलचिंपवर तुमचे अकाऊंट असणे गरजेचे आहे. तर सर्वप्रथम आपण मेलचिंपवर अकाऊंट कसे उघडायचे ते पाहू.

साइन अप फ्री

➡️ सर्वप्रथम mailchimp.com या वेबसाइटवर जाणे.

➡️ त्यानंतर Sign Up Free या बटनावर क्लिक करणे.

➡️ यानंतरच्या पेजवर तुम्हाला तुमचा मेल आयडी तसेच नवीन युजर नेम व पासवर्ड टाकायचा आहे.

➡️ यानंतर तुम्ही जो ईमेल आयडी दिला आहे त्यावर व्हेरिफिकेशनसाठी मेलचिंपकडून ईमेल येईल.

➡️ आपण दिलेल्या ईमेल आयडीवर जाऊन मेलचिंपकडून आलेला ईमेल उघडावा आणि अ‍ॅक्टिव्ह अकाऊंट या बटनावर क्लिक करावे.

➡️ बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही परत मेलचिंपच्या वेबसाइटवर जाल. मग तुम्हाला मेलचिंपचे पेड प्लॅन पेज दिसतील. त्यातून तुम्ही फ्रीचा प्लॅन सिलेक्ट करायचा आहे आणि कंप्लीट या बटनावर क्लिक करावे.

➡️ यानंतर तुम्हाला तुमच्या उद्योगाचे नाव, तुमची वेबसाइट असेल तर तिचा अ‍ॅड्रेस, संपूर्ण पत्ता भरायचे आहे.

➡️ नंतर मेलचिंप तुम्हाला विचारेल की, तुमच्याकडे किती सबस्क्रायबर आहेत म्हणजेच तुमच्याकडे लोकांचे किती ईमेल आयडी आहेत. आपला प्लॅन फ्री असल्याने 501-2000 हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. (सबस्क्रायबर म्हणजे असे लोक ज्यांना तुम्ही मेल पाठवणार आहात.)

➡️ यानंतरच्या पेजवर तुम्ही तुमचे सोशिअल अकाऊंट्स मेलचिंपसोबत कनेक्ट करू शकता. तुम्हाला जर तसे करायचे नसेल तर कनटिन्यूू या बटनावर क्लिक करावे आणि पुढील पेज ओपन झाल्यावर ओके लेट्स डू इट या बटनावर क्लिक करावे.

➡️ नंतर मेलचिंप तुम्हाला तुमच्या व्यवसायासंबंधी प्रश्नावली विचारेल. ती पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मेलचिंपचा डॅशबोर्ड दिसेल.

कनेक्ट युअर स्टोर

या ऑप्शनमध्ये आपण काही अ‍ॅड ऑन अ‍ॅप्स आपल्या मेलचिंप अकाऊंटसोबत जोडू शकतो. तसे करायचे नसल्यास स्किप या बटनावर क्लिक करावे.

स्टार्ट डिझायनिंग युअर फर्स्ट ई-मेल (start designing your first email)

या ऑप्शनमध्ये आपण ई-मेलच्या वेगवेगळ्या आकर्षक अशा टेम्प्लेट्स बनवू शकतो. यासाठी तुम्हाला टेम्पलेट यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर जे पेज ओपन होईल त्यात तुम्हाला तीन ऑप्शन्स मिळतील.

१. लेआऊट्स – या ऑप्शनमध्ये तुम्हाला बेसिक आणि फीचर्ड असे दोन ऑप्शन्स मिळतील. यातील टेम्प्लेट्समध्ये तुम्ही स्वतः ड्रॅग अँड ड्रॉप या अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता आणि आपला ई-मेल आकर्षक बनवू शकता. यामध्ये खालीलप्रमाणे ऑप्शन्स वापरून तुम्ही तुमच्या ई-मेलची टेम्प्लेट तयार करू शकता.

लोगो, टेक्स्ट, बॉर्डर टेक्स्ट, डिव्हाइडर, इमेज, ग्रुप इमेज, इमेज कार्ड, इमेज+कॅप्शन, सोशिअल शेअर, सोशिअल फॉलो, बटन्स, फूटर, व्हिडीओज्, कोड

२. थीम्स – या ऑप्शनमध्ये तुम्हाला आधीच तयार असलेल्या भरपूर अशा वेगवेगळ्या टेम्प्लेट्स वापरायला मिळतील. तुम्हाला उपयुक्त टेम्प्लेट सिलेक्ट करून ड्रॅग अँड ड्रॉप या अगदी सोप्या पद्धतीने एडिट करू शकता आणि आपला ई-मेल आकर्षक बनवू शकता. यात दिलेल्या टेम्प्लेट्सचे विविध प्रकार खालीलप्रमाणे-

फीचर्ड, ई-कॉमर्स, इव्हेन्ट्स, हॉलिडे, न्यूजलेटर्स, नोटिफिकेशन्स, फोटोग्राफी, स्टेशनरी, सबस्क्रायबर अलर्ट.

३. कोड युअर ओन – या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा HTML ई-मेल तयार करून अपलोड करू शकता; पण यासाठी तुम्हाला HTML चे ज्ञान असणे आवश्यक आहे. यात दिलेले विविध प्रकार खालीलप्रमाणे-

  • पेस्ट इन कोड
  • इम्पोर्ट HTML
  • इम्पोर्ट झिप

अ‍ॅड युअर कॉन्टॅक्ट (add your contact)

ड्रॅग अँड ड्रॉप या अगदी सोप्या पद्धतीने आपल्या ई-मेलची टेम्पलेट तयार करून झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला मेलचिंपमध्ये आपले कॉन्टॅक्ट्स अ‍ॅड करावे लागतात. त्यासाठी आपणास दिलेले विविध प्रकार खालीलप्रमाणे-

इम्पोर्ट फ्रॉम अ फाइल – या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचा ई-मेलचा डेटा (अशा लोकांचे ई-मेल आयडी ज्यांना तुम्ही ई-मेल मार्केटिंग करणार आहात.) इम्पोर्ट करू शकता.

  • .csv किंवा .txt फाइलमधून तुम्ही ई-मेल आयडी इम्पोर्ट करू शकता.
  • .xls किंवा .xlsx फाइलमधून तुम्ही ई-मेल आयडी कॉपी करू शकता.
  • गुगल कॉन्टॅक्ट्स, सेल्स फोर्स, झेनडेस्कवरूनसुद्धा तुम्ही ई-मेल आयडी इम्पोर्ट करू शकता.

युज पॉप अप फॉर्म टु कलेक्ट सबस्क्रायबर

या ऑप्शनचा वापर करून तुम्ही पॉप अप फॉर्म तयार करून ई-मेल आयडी इम्पोर्ट करू शकता. (पॉप अप फॉर्म- ज्या वेळी कोणी तुमची वेबसाइट ओपन करतो त्या वेळी हा फॉर्म लगेच ओपन होतो. थोडक्यात पॉप होतो. या फॉर्मद्वारे आपण कस्टमरचा डेटा मिळवू शकता.)

कनेक्ट युअर ईकॉमर्स स्टोर – या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमच्या मेलचिंप अकाऊंटला कनेक्ट असणार्‍या साइटवरून ई-मेल आयडी इम्पोर्ट करू शकता.

लँडिंग पेज बनविणे – या ऑप्शनचा वापर करून तुम्ही एक लँडिंग पेज बनवू शकता ज्याचा वापर करून तुम्ही नवीन ई-मेल आयडी मिळवू शकता तसेच आपले प्रॉडक्ट प्रमोट करू शकता किंवा ऑफर आणि डिस्काऊंट डिस्प्ले करू शकता.

  1.  त्यासाठी कॅम्पेनवर क्लिक करा. त्यानंतर समोरच तुम्हाला क्रिएट अ लँडिंग पेज हे बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.
  2.  त्यानंतर लँडिंग पेजला नाव देऊन बिगिनवर क्लिक करा.

या ऑप्शनमध्ये तुम्हाला आधीच तयार असलेल्या भरपूर अशा वेगवेगळ्या टेम्प्लेट्स वापरायला मिळतील. तुम्हाला उपयुक्त टेम्प्लेट सिलेक्ट करून ड्रॅग अँड ड्रॉप या अगदी सोप्या पद्धतीने एडिट करू शकता आणि आकर्षक लँडिंग पेज बनवू शकता. यात दिलेल्या टेम्प्लेट्सचे विविध प्रकार खालीलप्रमाणे-

  • अ‍ॅक्सेप्ट पेमेंट्स
  • लीड जनरेशन
  • ग्रो युअर लिस्ट
  • प्रमोट प्रॉडक्ट्स

सेंड युअर फर्स्ट ई-मेल कॅम्पेन-

आता आपण मेलचिंपचा वापर करून ई-मेल कसे सेंड करायचे ते पाहू.

  1. सर्वप्रथम कॅम्पेन (Campaign) या बटणावर क्लिक करा.
  2. त्यानंतर क्रिएट कॅम्पेन या बटणावर क्लिक करा.

या ऑप्शनचा वापर करून तुम्ही खालीलप्रमाणे प्रकार ई-मेलद्वारे आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता.

अ‍ॅड, लँडिंग पेज, पोस्टकार्ड, सोशिअल पोस्ट, साइन अप फॉर्म्स

पण सध्या आपण ई-मेल कसे पाठवायचे हे पाहणार आहोत

कारण बाकीची पद्धतपण थोड्या प्रमाणात सारखीच आहे. ती थोड्या फार वापरानंतर लक्षात येईल.

मग ई-मेल या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपल्या कॅम्पेनला नाव द्या. मग बिगिन या बटनावर क्लिक करा. त्यानंतर अ‍ॅड रेसिपीएंट या बटनावर क्लिक करा. मग चूज अ‍ॅन ऑडियन्सवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही अ‍ॅड केलेल्या ई-मेल आयडीची लिस्ट सिलेक्ट करा आणि सेव्ह या बटनावर क्लिक करा.

त्यानंतर फॉर्म या बटनावर क्लिक करा आणि आपल्या व्यवसायचे नाव आणि ई-मेल आयडी लिहा आणि सेव्ह या बटनावर क्लिक करा.

आता अ‍ॅड सबजेक्ट या बटनावर क्लिक करा. यात सबजेक्ट या कॉलममध्ये ई-मेलचा सबजेक्ट लिहा. सबजेक्ट लिहिताना तुम्ही इमोजीसचा वापर करून तुमचा ई-मेल सबजेक्ट आकर्षक बनवू शकता. नंतर प्रिव्हीव टेक्स्ट या कॉलममध्ये तुम्ही सबजेक्टविषयी एका ओळीत माहिती लिहू शकता किंवा प्रिव्हीव टेक्स्टचा कॉलम तुम्ही रिकामा ठेवू शकता. यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करा.

मग कन्टेन्ट या बटनावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही बनवलेली ई-मेल टेम्प्लेट सिलेक्ट करा. मग तुमची ई-मेल टेम्प्लेट ओपन होईल. जर तुम्हाला त्यात काही बदल करायचे असतील तर करू शकता अन्यथा सेव्ह अ‍ॅण्ड क्लोज या बटनावर क्लिक करा.

आता सेंड या बटनावर क्लिक करा.

आता सेंड नाऊ या बटनावर क्लिक करा किंवा तुम्ही शेड्यूल या बटनावर क्लिक करून ई-मेल कॅम्पेन तुमच्या वेळेनुसार नंतर शेड्यूल करून पाठवू शकता.

ई-मेल कॅम्पेन ट्रॅक

आपण पाठवलेला ई-मेल कॅम्पेन आपण पूर्णपणे ट्रॅक करू शकता. त्यासाठी रिपोर्ट्सवर क्लिक करा. आपल्या कॅम्पेनच्या नावावर किंवा व्हीव रिपोर्ट्सवर क्लिक करा. यात तुम्हाला कॅम्पेनबद्दल खालीलप्रमाणे माहिती मिळेल.

  • किती जणांनी तुमचा ई-मेल ओपन केला.
  • किती जणांनी ई-मेलमधील लिंकवर क्लिक केले.
  • किती ई-मेल बाऊन्स झाले.
  • किती जणांनी त्यांचे नाव तुमच्या ई-मेलच्या यादीतून काढून घेतले. थोडक्यात अनसबस्क्राइब केले.
  • तसेच कोणत्या भागातून ई-मेल ओपन झालेत.

तुम्ही पाठवलेला ई-मेल कॅम्पेन तुम्ही आपल्या मोबाइलद्वारेसुद्धा ट्रॅक करू शकता. त्यासाठी तुम्हाला ‘मेलचिंप’चे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल जे प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. ‘मेलचिंप’चा वापर करणे हे बर्‍याच जणांना सुरुवातीला अवघड जाऊ शकते किंवा किचकट वाटू शकते; पण थोडे प्रयत्न केल्यास ‘मेलचिंप’ वापरून केलेल्या फ्रीच्या ई-मेल मार्केटिंगचा तुमच्या व्यवसायाला नक्कीच फायदा होईल.

– चंदन इंगुले
7276580101

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?