Advertisement
उद्योगोपयोगी

व्यवसायवाढीसाठी कसे वापरावे Twitter?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आपल्या व्यवसायाची माहिती देणारी वेबसाईट असेल तर ती ट्विटरच्या प्रोफाईलमध्ये add करा त्यातून वेबसाईटला जास्त लोक भेट देतील.

फॉलो करा व फॉलोवर्स मिळवा

एकदा का तुम्ही प्रोफाईल पूर्ण केली की तुमच्या व्यवसायाशी किवा तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या लोकांना फॉलो करा अशा व्यक्तींना फॉलो केल्याने तुम्हाला अपडेटस मिळत जातात. उद्या जर आपला फोटोग्राफीचा व्यवसाय असेल तर मासिकांचे ब्लोगर्स व इतर नामवंत फोटोग्राफर्स ना फॉलो करा फक्त फॉलो करणे महत्त्वाचे नाही तर आपल्यालासुद्धा लोकांनी फॉलो करायला हवे ज्याने करून आपण ट्विट केलेली माहिती लोकपर्यत पोहचू शकेल.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

तुमच्या मित्र परिवाराला इनवाईटस पाठवा व त्यांना अजून पुढे पाठवायला सांगा तुमच्याकडे तुमच्या ग्राहकाचे इमेल आयडी असतील तर त्यांना ट्विटरवरून तुम्हाला फॉलो करण्याचा मेल पाठवा तुमच्याकडे मोबाईल नंबर व ट्विटर आयडी पाठवून त्यांना फॉलो करण्यास आवाहन द्या

उपयोगाच्या गोष्टी ट्विट करा

तुम्ही तुमच्या वेबसाईटची लिंक किवा इतर काही व्यवसायबद्दलची माहिती ट्विट कराल, परंतु ती तुमच्या फॉलोवरसला उपयोगी असली पाहिजे. फॉलोवर्स मिळवायला फार वेळ लागतो, मात्र तुमची एक चुकीची ट्विट फॉलोवर्स गमावण्यास पुरेशी आहे.

ज्या तुमच्या क्षेत्रातल्या ट्वीस आहेत त्या रिट्विट करा म्हणजे तुमचे फॉलोवर्ससुद्धा तुमचे ट्विटस रिट्विट करतील. तुम्हाला ट्विट करताना काळजी घेतली पाहिजे ट्विटस प्रोफेशनल असणे गरजेचे आहेत जर ते व्यवसायातले ट्विट असतील. तुमच्या मार्केटीगला याचा उपयोग होऊ शकतो.

ग्राहकांना ऐका

व्यवसायातील एक म्हण आहे. ग्राहक नेहमी बरोबर असतो. ग्राहकांचे ऐकल्याने त्यांच्या गरजा व अपेक्षा काय आहेत ते कळतात twitter च्या माध्यमातून ग्राहक तुम्हाला या सूचना देऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांच्या सूचनेकडे लक्ष द्या. जरी ते तुमच्या बाबतीत नसले तरी त्यांना रिप्लाय देऊन व त्या सुचनांची चर्चा करून त्यातून सेल होऊ शकतो. एक जबाबदार उद्योजक म्हणून ग्राहकांच्या तुमच्याकडे लक्ष जाऊ शकते.

नक्की तुम्हाला Twitter कडून काय हवे आहे?

वेगवेगळ्या गोष्टींसाठी Twitterअप्प्रोच करणे म्हणजे वेगवेगळे रिझल्ट अपेक्षित करणे. आपल्याला आपण Twitterवर का आहोत? आपला उद्देश स्पष्ट असला की अपेक्षित परिणाम मिळतील. तुम्ही Twitterचा उपयोग फओलोर्स वाढवण्यासाठी करता का? की व्यवसायासाठी लीड्स मिळवण्यासाठी?

ग्राहकांपर्यंत व सप्लायर्स किवा मार्केटर्सपर्यंत पोहचण्यासाठी तुम्ही या वरील कुठल्याही हेतूने Twitter वर असाल तरी तुम्हाला सतत Twit करत राहावे लागते, ज्याने करून तुमचे Twitter गोल्स पूर्ण होऊन परिणाम येतील तुम्ही जे Twitter कराल ते तुमच्या फॉलोर्सपर्यंत पोहोचते व ती माहिती त्यांनी Retwitt केली पाहिजे अशी माहिती टाका,म्हणजे ती त्यांच्या फॉलोर्सपर्यंत पोहोचेल.

– निखील महाडेश्वर
(लेखक इंटरनेट सेक्युरिटी तज्ज्ञ असून सोशल मीडिया मार्केटिंगचे प्रशिक्षक आहेत.)
मोबाईल : +९१ ९७७३१७०३७८


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!