“लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य लाभे”; असे लहानपणी प्रत्येकाने ऐकलेले असेल. घरातील वडीलधारी मंडळी नेहमीच हे सांगत आलीत. पण सगळ्यांनाच हे पटत असले तरी हे कृतीत आणायला जमत नाही. लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत.
आपल्या रोजच्या दैनंदिन जगण्यात याचा वापर नीट केला तर आपल्यासारखे नशीबवान आपणच. तर आपण सकाळी लवकर कसे उठावे? रोज मनाशी ठरवतो उद्यापासून सकाळी लवकर उठू. पण दुसर्या दिवशी हा प्लॅन फसलेला असतो किंवा चार दिवस लवकर उठतो, पण पुन्हा पाचव्या दिवशी ये रे माझ्या मागल्या असे करत लवकर उठणे पुन्हा बारगळते.
या लेखात आपण लवकर उठण्यासाठी हमखास उपयोगी पडतील अशा काही टिप्स पाहुयात.
१. आपल्याला लवकर का उठायचय हे प्रथम ठरवा. मनाशी हे पक्क असायला हवे की मला लवकर उठायचंय तेही मनापासून. सकाळी लवकर उठण्याने माझ्या मनाला, शरीराला, दैनंदिन जगण्याला काय काय फायदा होणार आहे आणि तो किती महत्त्वाचा आहे हे शोधा. हे कारणच तुमचा लवकर उठण्याचा निश्चय दृढ करेल. यातूनच लवकर उठण्याच्या आपल्या विचारला आपण प्रत्यक्षात उतरवू शकतो.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)२. एकदा आपला विचार पक्का झाला की मग आपल्या शरीराला लागलेली सवय मोडायला तयार व्हा. खरतर कोणतीही सवय मोडायला थोडा वेळ लागतोच हे तर आपल्याला ठाऊक आहे. सकाळी लवकर उठण्याच्या विषयात मात्र आपण हे विसरतो आणि लगेच बदल करायचा प्रयत्न करतो. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण सकाळी ८ वाजता उठतो आणि लवकर उठायचे ठरवले म्हणून लगेच ५ वाजता उठायला सुरुवात करायला गेलो तर आपले शरीर ते मान्यच करत नाही.
त्यामुळे बदल करा पण हळूहळू. ८ ऐवजी ७.३० करा. काही काळाने ७ करा असे करत करत आपल्याला जी वेळ साधायची आहे ती साधा. याने त्रासही होणार नाही आणि आपल्या ‘लवकर उठा’ या मोहिमेत फायदा होईल.
३. लक्षात घ्या सवय तेव्हाच लागते जेव्हा कृतीत सातत्य असते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही यात खंड पडू देऊ नका.
४. दिवसभराची काम नियोजनपूर्वक केली तर कामेही पूर्ण होतील आणि वेळेचं नियोजनही होईल. यामुळे आपण जास्तीत जास्त काम पूर्ण करतो. दिवसभर उत्साही आणि आनंदी राहतो. यामुळेच रात्री झोपही शांत लागते. झोपण्यची वेळही ठरलेली असावी.
प्रयत्नपूर्वक रात्री लवकर झोपावे. यामुळे सकाळी लवकर उठायला मदतच होते. आपल्या शरीराला आवश्यक झोप मिळावी लागते. सात ते आठ तासांची झोप, सक्तीची विश्रांती घेतली तर सकाळी लवकर उठायला त्रास होत नाही.
५. आपल्यापैकी जवळपास आता प्रत्येकाला आपला आलार्म स्नुज करायची सवय असते. ही सवय मोडा. आलार्म स्नुज करू नका. लवकर उठणे हे पूर्णपणे मनावरच अवलंबून असते. मनाला जे सांगाला तेच हळूहळू घडतंय हे तुम्हाला जाणवू लागेल. मग आपल्याला अलार्म किंवा इतर कोणत्याही गोष्टीची गरज राहणार नाही.
अनेक वेळा आपण सकाळी उठतो पण आता पुढे काय? असा प्रश्न पडतो आणि पुन्हा आपली घडी विस्कळीत होते. म्हणूनच आपले नियोजन असावे. सकाळी व्यायाम केल्याने ताजेतवाने वाटते. मोकळ्या हवेत फिरावे किंवा आपली आवडीची कामे करावीत जेणे करून नकारात्मकता मनात येणार नाही.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.