विक्री कशी वाढेल? ज्योतिषशास्त्रीय विवेचन

अंगीभूत गुण, आवड आणि उद्योगास लागणारे गुण यांचा ताळमेळ नसल्यास पुरेपूर कष्ट करूनही व्यक्तीची कशी परवड होऊ शकते.

रेस्टॉरंटची गरज होती. छोटे प्रमाण आणि मोठी संख्या (अनेक डिशेस) जेव्हा की या जोडीची ताकद होती मोठे प्रमाण आणि छोटी संख्या. हा ताळमेळ सुधारल्यास धंद्यात बरकत येण्यास वेळ लागत नाही. असो.

उद्योग ज्योतिषासारख्या Cross Discipline Techno Commercial विषयात प्रश्‍न नीट समजून घेणे, प्रश्‍नाचा सर्वांगीण विचार करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. अनेक वेळा वाटणारी समस्या आणि असणारी समस्या यांमध्ये बरेच अंतर असू शकते. या प्रकारचं एक प्रकरण पाहू.

माझ्यासमोर बसले होते एका प्रख्यात हॉटेलचे मालक. “माझ्या हॉटेलची विक्री कशी वाढेल?

मी व्यवसायात गेली तीस वर्षे आहे. आमचे पदार्थ लोकांना अतिशय आवडतात. हॉटेल फुल चालतं. जागा पुरत नाही. मी तीन वर्षांपूर्वी जागा वाढवली. एक वर्षापूर्वी पूर्ण नूतनीकरण करून परत वाढवली. तरीही जागा पुरत नाही. अनेक कलाकार, नाटककार, लेखक, व्यावसायिक लोक येतात. हॉटेलात पदार्थांची वाखाणणी करतात.

माझं हॉटेल एवढं प्रसिद्ध आहे की, पाच मैलांवरूनदेखील परिसरातलं शेंबडं पोर तुम्हाला वाट दाखवू शकेल, पण महिन्याच्या शेवटी मात्र हातात काहीच उरत नाही.

मी त्यांच्या जन्मकुंडलीवर नजर टाकली. त्या कुंडलीत सातवे घर बलवान होतं. सातवं घर चांगलं म्हणजे लोकांना आकर्षित करण्याची ताकद. उद्योग-व्यवसायासाठी हे उत्तमच. चौथं घर त्याला मदत करत होतं. म्हणजे घरच्यांकडून पूर्ण साथ.

त्यांच्या घराचाच पिढीजात व्यवसाय होता. आता भावंडं वेगळे झाली होती आणि आपआपला व्यवसाय पाहत होती. कुंडली दाखवत होती; लोकप्रिय आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व, त्यामुळे समस्या अंगभूत नसून परिस्थितीजन्य असण्याचा संभव होता.

अंगभूत समस्या म्हणजे कुंडलीशी प्रत्यक्ष संबंध असलेली समस्या, परिस्थितीजन्य समस्या म्हणजे जागा, वातावरण, ठिकाण यांच्याशी संबंधित असलेली समस्या (Related to tune place circumstances). आपण एक सोपं उदाहरण पाहू. एक माणूस जाडा आहे. शरीरात मेद साठल्यानं माणूस जाडा होतो.

जर माणसाची अंगभूत क्रयशक्ती कमी असेल (Low Physical Metabolism) तर कमी खाऊनही मेद वाढतो. ही झाली अंगभूत समस्या; परंतु एक माणूस फिरतीची नोकरी करीत होता. जागोजागी फिरत होता, आता त्याला बढती मिळून ऑफिसमध्ये बसू लागला आणि मेदोद्धार/मेदप्रकोप झाला तर त्याला त्याचे बदललेले सुखासीन जीवन आणि जीवनात आलेला आराम ही परिस्थितीजन्य कारणे आहेत. (Temporal Problems) प्रश्नकुंडली या प्रकारच्या समस्यांसाठी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करते.

मी प्रश्‍नकुंडली मांडली. त्यात दिसत होतं की, चौथं (कुटुंब) घर, सातवं घर (लोकप्रियता) आणि बारावं घर (नुकसान) आणि शर्ती यांचा परस्परसंबंध होता. याचा अर्थ त्यांची लोकप्रियता किंवा लोकसंग्रह आणि घरासंबंधी केलेल्या काही गोष्टी या त्यांच्या व्यवसायात समस्या निर्माण करीत होत्या.

हा धागा पकडून मी त्यांना त्यांच्या Regular Celebrity Customer बद्दल विचारले. त्यांनी सांगितलेली सगळी नावं जुन्या कलाकारांची होती. ही लोेक फार खर्च करणारीही नव्हती. ही लोक यायची तेव्हा स्वतः मालक त्यांची सरबराई करत, त्यांच्या चवीप्रमाणे पदार्थ दिला जाई – साखर कमी, तिखट नको, तेल नकोच नको; त्यामुळे पदार्थ बनविण्याचा वेळ वाढला.

बरं यांचे चाहते आले तर तेदेखील तसेच वयोवृद्ध, त्यामुळे वेळ व पैसा यांचं गणित व्यस्त होत होतं. वाढणारा वेळ (शनी) फायदा फस्त करीत होता. प्रश्‍नकुंडलीने समस्या अचूक अधोरेखित केली होती.

एकदा समस्या कळली म्हणजे उपाय सोपा असतो. त्यांना याप्रमाणे सूचना दिली, Cold Drinks/ Sweet Drinks चा मेनूत मोठ्या प्रमाणात समावेश करा.

आज या गोष्टीला जवळजवळ दीड वर्ष होत आहे. विक्री बर्‍यापैकी वाढली आहे आणि श्रीमान सध्या तरी अतिशय खूश आहेत.

– आनंद घुर्ये
(लेखक प्राचीन भारतीय ज्ञान या विषयातले अभ्यासक आहेत)
संपर्क : 9820489416

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?