लॉकडाउननंतर आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी कराल?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


लॉकडाउनमध्ये आपण आपल्या व्यवसायाची भावी कृती योजना ठरवलेली असेलच, पण ती लगेच अमलात आणू नका. लॉकडाउन उठल्यानंतर अजून किमान आठ ते दहा दिवस थांबावं. कोरोनामुळे आलेली लॉकडाउनची परिस्थिती ही सगळ्यांसाठीच कधीही न अनुभवलेली आहे, त्यामुळे लॉकडाउननंतर परिस्थिती कशी असेल, याचा नुसता अंदाजच लावता येऊ शकतो.

एवढे थांबलात आता अजून आठ-दहा दिवस थांबा.

परिस्थितीचा अंदाज घ्या. कदाचित तुम्ही करत असलेल्या व्यवसायाची लॉकडाउननंतरची परिस्थिती ही लॉकडाउननंतर तेवढी वाईट नसेलसुद्धा, तरीही नवीन मार्केटिंग प्लॅन राबवण्याची घाई करू नका. या आठ-दहा दिवसात तुमच्या व्यवसायातले निश्चित खर्च कमी करण्यावर भर द्या.

परिस्थितीमुळे तुम्हाला तुमच्या वस्तू किंवा सेवा याची किंमत कमी करावी लागेल, असं वाटत असेल तरी निराश होण्याच कारण नाही, कारण तुमच्या व्हेंडरलासुद्धा काही प्रमाणात किंमत कमी करावी लागेल. लॉकडाउननंतर सर्वांच्याच कॅश फ्लोमध्ये गडबड होण्याची शक्यता आहे. यात तुम्हाला तुमच्या असलेल्या व्होंडरशी नव्याने बार्गेन करण्याची तसेच तुमच्या अटींवर धंदा करणारे नवीन व्हेंडर मिळवण्याची चांगलीश संधी आहे.

कॅश फ्लो सुधारण्यासाठी नफा कमी करणे किंवा ना नफा ना तोटा तत्त्वावर काही महिने काम करावे लागू शकेल. उदाहरणार्थ या पूर्वी एका व्यवहारात दहा टक्के नफा मिळवत असाल, तर आता नफ्याचे मार्जीन एक-दोन टक्के ठेवून पाच ते दहा व्यवहार करावे लागतील. यासाठी मोफत किंवा कमी खर्चात मार्केटिंगचे पर्याय शोधावे लागतील. मात्र हे असूनसुद्धा तुमच्या ग्राहकाला तुमची गरज कळू देऊ नका.

कॅश फ्लो सुधारला तरच तुम्हाला व तुमच्या कर्मचार्‍यांना मानसिक बळ मिळेल. आपला उद्योग ज्या इतर उद्योगांवर अवलंबून आहे, तिथे कोलॅबरेशन करण्याची ही वेळ आहे. आपला व्यवसाय डिजिटल असणं, याला आता खूप महत्त्व आहे तरी ते करताना घाई न करता ते क्रमाक्रमाने करावे. योग्य नियोजन आणि अमंलबजावणी याची गरज आहे.

– अमोल पुंडे
संपर्क : 9820017174
(लेखक मार्केटिंग सल्लागार आहेत.)

Author

  • अमोल पुंडे

    नमस्कार, मी अमोल पुंडे मार्केटिंग सल्लागार. गेली ७ वर्षे मी व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करावं कुठे करावं आणि किती करावं याचा योग्य तो सल्ला देत आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या उद्योगांना योग्य तो मार्केटिंगचा सल्ला देऊन त्यांना त्यांच्या उद्योगात अधिक ग्राहक मिळवून दिले आहे ज्यात चहावाला, मसाले बनवणारे, LED वितरक, भेळ बनवणारे, उपहारगृह, Pest Control Company, Resort, डॉक्टर, LIC Agent, Education Classes, event organizer, BMW अश्या उद्योगांचा समावेश आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?