आज बर्याच कंपन्या या स्टाफ भरती आणि ट्रेनिंग हे काम बाहेरील संस्थेकडून करून घेण्याला प्राधान्य देतात. या कंपन्या विविध एच. आर. ट्रेनिंग अॅण्ड रिक्रूटमेंट कंपन्यांना हे काम सुपुर्द करतात. त्यामुळे आपण जर का अशी एच. आर. ट्रेनिंग अॅण्ड रिक्रूटमेंट कंपनी सुरू करणार असू, तर आपल्याला अशा कंपन्यांशी स्टाफ भरतीचा करार केल्यानंतर बराच चांगला व्यवसाय मिळू शकतो.
एच. आर. ट्रेनिंग अॅण्ड रिक्रूटमेंट कंपनीमध्ये तुम्हाला विविध क्षेत्रांतील बेरोजगार शोधणे, त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे आणि तुम्ही करार केले आहेत अशा कंपन्यांमध्ये भरती करणे हे तुमचे काम असते.
या कंपन्या तुम्हाला त्याचा मोबदला देतात. आज हे काम बर्याच मोठ्या प्रमाणात वेबसाइटच्या माध्यमातूनही होऊ शकते. वेबसाइटद्वारे तुम्हाला बेरोजगार तसेच कंपन्या गाठू शकतात आणि प्रत्यक्ष मुलाखत आणि ट्रेनिंगनंतर तुम्हाला त्यांची प्रत्यक्ष भरती करता येऊ शकते.
– टीम स्मार्ट उद्योजक
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia