Advertisement
उद्योगवार्ता

‘एच.टी.एल एअरकॉन’ कंपनीचा एचव्हीएसी बाजारपेठेत १०० कोटीचा विक्रमी आकडा पार

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

एच.टी.एल एअरकॉन कंपनीने एचव्हीएसी (हीटिंग, वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग) बाजारपेठेत १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हेल्थकेअर, बॅंकिंग आणि फायनान्स, व्यावसायिक, कॉरपोरेट, हॉस्पिटॅलिटी, आवासीय, फॅक्टरीज, शिक्षण अश्या विविध क्षेत्रात एच.टी.एल आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. भारतीय एचव्हीएसी बाजार वार्षिक दराने १० ते १२ टक्क्यांनी वाढत आहे. सध्या २ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका आकडा पार केला आहे. कंपनीने १०० कोटीचा टप्पा तोडल्यानंतर पुढील वर्षापासून एच.टी.एल एअरकॉन बीएसई एसएमईमध्ये लवकरच सूचीबद्ध होणार आहे.

“एच.टी.एल एअरकॉन भारतीय एचव्हीएसी सेगमेंटमध्ये अग्रणी आहे. १९९६ मध्ये सुरु करण्यात आलेली ह्या कंपनीने २२ वर्षात १०० करोडचा आकडा पार केला आहे. आम्ही सध्या इतर एमईपी सेवांच्या उद्देशाने प्रमुख बाजारपेठेतील भागात काम करीत आहोत. भविष्यात आम्ही इंटरनशनल पावरहाउस डैकिनच्या सोबतीने जागतिक स्तरावरील मध्यपूर्व देश(Middle east) आणि आफ्रिका या देशांसोबत करार करणार आहोत. बाजारात १० ते १२ टक्के दराने वाढत आहे ज्यामुळे कंपनी बाजारपेठेपेक्षा पाचपट वेगाने वाढली आहे.” असे लविंदर दुग्गल म्हणाले

एच.टी.एल एअरकॉनचे महाराष्ट्र, दिल्ली, गोवा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात उपस्थिती आहे आणि लवकरच ही कंपनी गुजरात व तामिळनाडू मध्ये विस्तार करणार आहे. लाविंदरजी पुढे म्हणाले कि “भारतीय बाजारपेठेत आमच्या उपस्थिती मजबूत झाल्यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापारावर लक्ष आहे, ज्यामुळे आम्ही येत्या काळात मध्यपूर्व देश (Middle east), आफ्रिका आणि श्रीलंका यासारख्या जागतिक स्तरावरील प्रगतीचा विकास करता येईल. २०२५ पर्यंत एच.टी.एल ५०० कोटीचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. मॉर्गन स्टॅन्ले, फिनिक्स इंफोसिटी, एचएसबीसी आणि बँक ऑफ अमेरिका यासारख्या प्रमुख प्रकल्पांचे काम एच.टी.एल एअरकॉनने केले आहेत.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त ₹५० मध्ये.


Help-Desk
%d bloggers like this: