उद्योगोपयोगी

कंपनी छोटी स्पर्धा मोठी

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

समस्यांचाच विचार केला तर लहान उद्योग आणि मोठे उद्योग यांना भेडसावणार्या समस्या खूप भिन्न असतात. मोठ्या उद्योगांना भांडवलाची समस्या नसल्याने ते त्यांच्या भांडवलाचा पद्धतशीर वापर करून मार्केट काबीज करतात व छोट्या उद्योगांना उद्ध्वस्त करतात आणि आपल्या व्यवसायासाठी एक सुरक्षित असे बाजार क्षेत्र निर्माण करून ठेवतात. या बाजार क्षेत्रात जरी एखाद्या नव्या उद्योगाचा शिरकाव झाला तरी ते प्राइझ वॉर करून, बॅकवर्ड आणि फॉर्वर्ड इंटीग्रेशन करून, डिलर्ससोबत करार करून अशा स्पर्धकांचा बीमोड करतात.

परंतु अशी परिस्थिती लहान उद्योगांच्या बाबतीत नसते. लहान उद्योगांना मर्यादित भांडवलाचा काटेकोर वापर करून आपला लहान व्यवसाय नफ्यात आणावा लागतो आणि नंतर तो वाढवावा लागतो. मोठे उद्योग आपल्या प्रॉडक्टचे उत्पादन लार्ज स्केलवर घेत असल्याने त्यांचा प्रति नग खर्च कमी असतो, त्यामुळे ते त्यांच्या उत्पादनांची किंमत कमी ठेवू शकतात आणि बाजारात स्पर्धा निर्माण करू शकतात. लहान उद्योगांच्या बाबतीत मात्र हे पूर्णतः विरुद्ध असते. निर्माण होणारे product हे संख्येने कमी असल्याने प्रति नग खर्च हा अधिक असतो आणि परिणामतः product ची किंमत अधिक असते तसेच लहान उद्योगांच्या कमी जाहिरातींच्या बजेटमुळे त्यांना परिणामकारक जाहिराती करून विक्री वाढवणे कठीण होते. या समस्यांमुळे जास्तीत जास्त लहान उद्योग पहिल्या काही वर्षांतच बंद पडायला लागतात. वरील समस्या या प्रत्येक लहान उद्योगाच्या बाबतीत निर्माण होतात आणि त्यांना त्यावर उपाय करणे अत्यावश्यक बनते. कमी उपलब्ध भांडवलामुळे मोठ्या उद्योगांना टक्कर देणे अवघड होते आणि व्यावसायिकाला पूर्ण धंद्यावरच पाणी सोडावे लागते. आपण आज त्या गोष्टींचा आढावा घेऊ ज्यांच्याद्वारे लहान उद्योगांना मोठ्या उद्योगांशी कमी संसाधनांद्वारे स्पर्धा करता येईल.

Advertisement

मोठ्या कंपन्यांकडे मनुष्यबळ आणि भांडवल अधिक असले तरी काही गोष्टी ह्या नजरेतून सुटलेल्या असतात. अशा परिस्थितीमध्ये लहान उद्योगांनी त्यांचे व त्यांच्या स्पर्धक उद्योगांचे SWOT analysis करावे. SWOT analysis म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहू.

  • SWOT analysis – यामध्ये उद्योग त्यांच्या व त्यांच्या स्पर्धकांची बलस्थाने (strength), कमजोरी (weakness), संधी (opportunities) आणि धोके (threat) कोणकोणती आहेत याची यादी करतात. ही पद्धत वापरल्यामुळे स्पर्धक उद्योगाची वर्तमान स्थिती लक्षात येते आणि भविष्याविषयी अंदाज बांधणे सोपे जाते.
  • निश (Niche) मार्केटिंग – मोठे उद्योग हे सहसा मोठ्या शहरावर focus करतात. ग्रामीण भागात त्यांची वितरण आणि विक्री व्यवस्था ही अत्यंत कमजोर असते, तसेच ग्रामीण भागात येईपर्यंत त्यांच्या वस्तूंच्या कींमती transportation मुळे किंवा डिलर्सच्या कमिशनखोरीमुळे वाढलेल्या असतात. लहान उद्योग अशा बाजार क्षेत्रांना लक्ष्य करून बाजारक्षेत्र काबीज करू शकतात. ग्रामीण क्षेत्रात मोठे उद्योग जाहिरातीही शहरी भागापेक्षा कमीच करतात, त्याचाही फायदा लहान उद्योग घेऊ शकतात. या भागात वितरकांना मिळणारे कमिशनचे प्रमाणही कमी असल्याने लहान उद्योजक वितरकांना आकर्षित करू शकतात. अशा प्रकारची मार्केटिंग करून लहान उद्योग या भागात निश बाजार क्षेत्र (Niche market) बनवू शकतात.
  • Effective Advertising : परिणामकारक जाहिरातींचा योग्य माध्यमांद्वारे वापर करून लहान उद्योग त्यांच्या वस्तूंची ब्रॅण्डिंग करू शकतात. मोठ्या उद्योगांची प्रत्येक जाहिरात ही परिणामकारक असेलच असे नाही. लहान उद्योग कमी खर्चीक माध्यमे वापरून परिणामकारक जाहिराती करू शकतात. मोठे उद्योग ज्या माध्यमांचा वापर करून जाहिरात करतात ते सर्वच भागांमध्ये परिणामकारक नसतात. सहसा ग्रामीण भागात त्यांची पोहोच ही अत्यंत कमी असते. लहान उद्योग या क्षेत्रांना जाहिरातीसाठी निवडू शकतात.
 • Vertical Integration- यामध्ये दोन प्रकार पडतात.
  1) Backward Integration, 2) Forward Integration

   • Backward Integration: यामध्ये उद्योग त्यांचे सप्लायर्स आणि सप्लायर्सचे सप्लायर्स यांची साखळी तयार करतात. यामध्ये साखळीतील सदस्यांना एकमेकांकडूनच खरेदी-विक्री करावी लागते. या पद्धतीचा अवलंब केल्याने उद्योगांना कच्च्या मालाच्या किमती कमी ठेवण्यास मदत होते व परिणामी पक्क्या वस्तूंच्या किमती कमी ठेवता येतात. अशा प्रकारची युती करून उद्योजक स्पर्धकांना मात देतात.
  • Forward Integration – यामध्ये उद्योग त्यांचे वितरक आणि त्याच्या वितरकांचे वितरक यांची साखळी तयार करतात ज्यामध्ये वितरकांना एकमेकांकडूनच खरेदी करणे बंधनकारक असल्यामुळे झालेला नफाही वितरक आपापल्या क्षमतेनुसार विभागून घेतात आणि इतर उद्योगाचे Products विकणे टाळतात. यासाठी साखळीतील सदस्य करार करतात. काही देशांमध्ये असे करार हे अवैध मानण्यात येतात. नफ्याचे व्यवस्थित विभाजन केल्यास अलिखित करार करूनदेखील या साखळ्या अबाधित ठेवता येतात.

– रिहाज शेख
7378926295
shaikhrihajhamid@gmail.com

Help-Desk
%d bloggers like this: