श्रीमंत होण्याच्या सात पायर्‍या


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


१) मला मोठं व्हायचंय! : व्यवसायात उतरायचे असल्यास सर्वप्रथम आपली मानसिक तयारी हवी. शून्यातून विश्व निर्माण करणारे धीरुभाई अंबानी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व्यवसायात उतरून (पडून नव्हे) कार्य करावयास हवे. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्याकरता दोन प्रमुख गुणांची आवश्यकता असते. एक म्हणजे आत्मविश्वास व दुसरा म्हणजे धाडस करण्याचे सामर्थ्य.

२) सकारात्मक दृष्टिकोन : एखाद्याचा दृष्टिकोन हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो; परंतु हा दृष्टिकोन काही जन्मत: लाभलेला नसतो. तो तुम्हाला हवा तसा बनवू शकतो. तो विकसित करणे, हे तुमच्याच हातात आहे. जगात असा कोणीही मनुष्य नाही की, ज्याला सकारात्मक दृष्टिकोन आवडत नाही. यशामध्ये ३० टक्के परिश्रम व 70 टक्के दृष्टिकोन यांचा वाटा असतो.

३) वेळ… एक महत्त्वाचा शब्द : ईश्वराने एक गोष्ट सर्वांना सारखी दिली आहे ती म्हणजे वेळ. म्हणूनच हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. ज्याने वेळेवर विजय मिळवला, त्याने जीवनावर विजय मिळवला, असं खुशाल समजावं. एकदा गेलेली वेळ कधीही परत येत नाही. वेळ वाया घालविणे याचाच अर्थ जीवन मातीमोल करणे होय. वेळेचा अपव्यय म्हणजे जीवनाशी हेळसांड, असे सविस्तररीत्या सांगण्यात आले आहे.

४) टीम वर्क म्हणजे काय? : दहीहंडी उत्सवामध्ये हंडी फोडताना फोडण्यासाठी गोपाळ वर चढतो, तर खालील थर कोसळला तर सर्वच लोक खाली पडतात व हंडी फोडता येत नाही. वरील उदाहरण टीम वर्कबद्दल देता येईल, कारण कोणतेही मोठे काम करताना टीम वर्कची आवश्यकता असते. एकटा व्यक्ती कोणतेही कठीण कार्य करू शकत नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

५) ध्येय व स्वप्न : आजच्या स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्वाला खूप महत्त्व आहे. स्वत:चा विकास साधायचा असेल, यशस्वी व्हायचे असेल, तर व्यक्तीला आपल्या अंगी काही महत्त्वाचे गुण बनविण्याची नितांत गरज आहे. या जगात तुम्हाला यशस्वी बनवू शकणारी एकच व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वत:च. हेच यशाचे रहस्य आहे, हे जाणा व कामाला लागा.

६) यशाचे सूत्र : यशस्वी होण्याची ज्याची-त्याची वेगवेगळी व्याख्या असू शकते; परंतु सामान्य माणूस उद्दिष्ट पूर्ण करून सर्वश्रेष्ठ पद प्राप्त करून आणि लोकप्रियता मिळवणं यालाच यश समजतो. सरळ भाषेत सांगायचं झालं, तर पद आणि यश या दोन्ही गोष्टीला यशस्विता समजलं जातं.

“एखाद्याच्या गुणाचे कौतुक करण्यात वेळ घालवू नका. त्याचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तसेच यशाचे तीन नियम आहेत. कठोर परिश्रम, आत्मविश्वास व आत्मविकास, व्यावसायिक संबंधांमध्ये विशिष्ट अंतर ठेवून व्यवहार करणे गरजेचे असते. लोकांसाठी तुम्ही एक गूढ व्यक्तिमत्त्व असले पाहिजे. त्यामुळे प्रगती आणि लोकप्रियता सतत होत राहील.”

७) मोठ्या स्वप्नांची शक्ती : जर तुम्ही जे करू इच्छिता ते बरोबर असेल आणि तुमचा तसा ठाम विश्वास असेल तर व्हा पुढे आणि ते करूनच दाखवा. तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणा आणि जरी तात्पुरतं अपयश आलं तरी लोक काय म्हणतील याची क्षती बाळगू नका.

– डॉ. संतोष कामेरकर
७३०३४४५४५४
(लेखक बिझनेस व लाइफ कोच आहेत)

error: Content is protected !!
Scroll to Top