इकिगाई; यशस्वी जगण्याची जपानी कला

मी व्यवसायाने एक सॉफ़्टवेअर इंजिनिअर आहे. व्यवसायविषयक पुस्तके, लेख, वाचन आणि त्यावर निगडित अभ्यास करणे तसेच समुपदेशन (counselling) करणे, याची मला आवड आहे. मध्यंतरी अवांतर वाचन करत असताना एका शंभर वर्षीय आजीचा झालेला वाढदिवस सोहळा आणि त्यांच्या जगण्याचं गुपित, असा एक लेख वाचनात आला.

अगदी नकळत एक नवीन शब्द माझ्या शब्दकोशात Add झाला – ‘इकिगाई’. या लेखाद्वारे मी अभ्यास केलेल्या ‘इकिगाई’ या विषयाचे विवेचन करण्याचा मी प्रयत्न केला आहे. ‘इकिगाई’, ही पुरातन जपानी विचारधारा आहे, जी देशाच्या दीर्घायुषी आयुष्याशी संबंधित आहे.

‘ईकी’ (生 き) या जपानी शब्दाचा अर्थ आहे जीवन आणि ‘गायी’ (甲 斐) म्हणजे जे मूल्य किंवा मूल्याचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. ‘इकिगाई’चा मूळ अर्थ हेतूपूर्वक आयुष्यात आनंद मिळवण्यासारखे आहे.

‘इकिगाई’ या शब्दाची उत्पत्ती हीयान कालावधी (794 ते 1185) काळात आहे. क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ आणि इकिगाई उत्क्रांतीचे तज्ज्ञ, अकिहिरो हासेगावा यांनी २००१ मध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्यांनी लिहिले की ‘गाई’ हा शब्द ‘काई’ या शब्दावरून आला आहे, ज्याचा अनुवाद जपानी भाषेत ‘शेल’ असा होतो.

हेयान कालावधीत, शेल अत्यंत मौल्यवान होते, म्हणूनच या शब्दामधील मूल्य एकरूप होणे मूळतः पाहिले जाते. हे हातारकीगाई (働 き が い) सारख्या जपानी शब्दांमध्येदेखील पाहिले जाऊ शकते, ज्याचा अर्थ कार्याचे मूल्य किंवा yarigai ~ga aru – यारीगाईगा अरु (や り 甲 斐 が あ る) आहे, म्हणजे ‘ते करणे फायदेशीर आहे.’

इकीगाई म्हणजे जे दररोज सकाळी तुम्हाला उठवते आणि प्रोत्साहित करते सतत पुढे जाण्यासाठी. ‘इकीगाई: जपानी सीक्रेट टू अ लाँग अँड हॅपी लाइफ’चे सह-लेखक हेक्टर गार्सिया म्हणतात, “तुमची ‘इकिगाई’ आपण कशात चांगले आहोत आणि आपल्याला काय करायला आवडते याच्या छेदनबिंदूवर आहे.”

‘इकिगाई’ सामान्य भाषेत समजण्यासाठी आपण Venn diagram चा वापर करूयात,
‘इकिगाई’ चार प्राथमिक घटकांचे अभिसरण म्हणून पाहिले जाते :

 • आपल्याला काय आवडते? (आपली आवड)
 • जगाला काय हवे आहे? (आपले ध्येय)
 • आपण ज्यामध्ये चांगले आहात (आपले व्यवसाय)
 • आपल्याला (आपल्या व्यवसायासाठी) कशासाठी पैसे दिले जाऊ शकतात?

खरं सांगा तुम्हाला सकाळी कशी जाग येते? गजर लावून?

आई, वडील, बायको, नवरा किंवा एखादा मित्र-मैत्रीण यापैकी कोणी जागं करतात का तुम्हाला? उठल्यावर असं वाटतं का की, वाह, आता मी ते काम करणार आहे, ज्यात मला आवड आहे? नाही ना? बऱ्याच जणांचे उत्तर ‘नाही’ हेच असेल.

मग प्रश्न हा आहे की आपण आपली ‘इकिगाई’ शोधू इच्छिता? मग स्वतःला पुढील चार प्रश्न विचारा :

 • मला काय आवडते?
 • मी कशात चांगला आहे?
 • मला आता काय देय द्यावे लागेल किंवा असे काहीतरी जे माझ्या भविष्यातील त्रासात बदलू शकेल?
 • जगाला कशाची गरज आहे? असे कोणते प्रश्न आहेत, ज्याची उत्तर माझाजवळ आहेत अगर मला त्या विषयाची जाण आहे?

जेवढं वाचलत तेवढ हे सोपं नाही आणि जेवढा समजून घेण्याचा प्रयत्न करताय, तेवढ कठीणही नाही. एका उदाहरणाने समजावून घेऊयात.

समजा तुम्हाला लेखनाची आवड आहे, लेखनावर तुमचं प्रेम आहे, तर तुमचं पॅशन हे लेखन आहे. कोणाला फोटोग्राफीची आवड आणि त्यावर प्रेम असेल, कोणाला खेळांमध्ये, कोणाला फिरण्यामध्ये, कोणाला व्यापारात, तर कोणाला स्वयंपाकात!

आता तुम्हाला फक्त तुमची पॅशन कळली. खूप लोक म्हणतात की तुमची पॅशन follow करा, आवडेल तेच करा, प्रेम असलेल्या गोष्टीच करा, पण हे किती खरं आहे? किंवा कितपत हे अमलात येऊ शकतं, हे ज्याचं त्याला ठाऊक!

फक्त पॅशननं तुम्हाला पैसे मिळतीलच असे नाही आणि कितीही तत्त्वज्ञान वाचलं तरी जगायला पैसाच लागतो, हे सत्य आहे.

लेखन तुमचं पॅशन आहे आणि त्या लेखणीतून तुम्ही सध्या परिस्थितीवर भाष्य करता, मनोरंजन करता, तुमचे विचार मांडून चांगला कार्यक्रम करता आणि ते लोकांना आवडतं, हवहवसं वाटतं, तर लेखन तुमचं मीशनसुद्धा आहे.

सचिन तेंडुलकरला क्रिकेटचं वेड आहे, तोच त्याचा ध्यास आहे, ते लोकांनाही आवडतं, मनोरंजक वाटतं, त्यांचं शतक प्रत्येकाला आपलं वाटत. अमिताभ बच्चन यांचा अभिनयसुद्धा तसाच आहे. पण मूळ प्रश्न तोच की यातून उत्पन्न कसं साधायचं?

अशा कोणत्या गोष्टींची जगाला गरज आहे? अगदी जागतिक प्रश्न वगैरे नाही, पण जरा आसपास बघा. कोणते असे प्रश्न आहेत, ज्यांची उत्तर तुमचाकडे आहेत आणि त्यातून तुम्हाला त्याचे उत्तर माहीत आहे?

याचे उत्तम उदाहरण हे Paytm, Flipkart आणि सध्याच्या बऱ्याचशा स्टार्टअप्स कंपन्या आहेत. जरा विचार करा, त्या त्या कंपनीच्या लोकांनी, संस्थापकांनी ते प्रश्न अचूक हेरलेत आणि त्यावर जे उत्तर दिलं, ते आहेत आजचे स्टार्टअप्स.

आपलं उदाहरण घ्यायचं झालं, तर लेखन होतं तुमचं passion, mission आणि आता vocation पण! त्यातून तुम्हाला मिळणार आहे अर्थार्जन!

उद्दिष्ट हे ठराविक काळासाठी असते. काळवेळेनुसार त्यात बदल घडतोच, मग त्यामुळे गरज असते ती दीर्घकालीन ध्येयाची.

ज्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे, तीच गोष्ट करून तुम्हाला पैसेदेखील मिळणार असतील आणि तेही आयुष्यभरासाठी; तर ते आहे तुमचं Profession.

आता कळलं का?

Passion + Mission + Vocation + Profession = Ikigai

या चारपैकी एका जरी गोष्ट नसेल तर, सगळं मिळालं तरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. सगळं भरून आहे, पण तरी रिकाम वाटतं.

‘इकिगाई’ द जपानी सीक्रेट टू ए लाँग अँड हॅपी लाइफ या पुस्तकात हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिसे मिरलेस यांनी दहा नियम दिले आहेत ज्यामुळे कोणालाही स्वतःची आयकीगाई शोधण्यात मदत होऊ शकेल.

 • सक्रिय रहा आणि निवृत्त होऊ नका.
 • निकड सोडून द्या आणि जीवनाची गती कमी करा.
 • तुम्ही ८० टक्के पोट भरूनच खा.
 • चांगल्या मित्रांसह स्वतःला वेढून घ्या.
 • दररोज, सौम्य व्यायामाद्वारे शरीराला आकार द्या.
 • आपल्या आसपासच्या लोकांना हसू द्या आणि त्यांची ओळख पटवा.
 • निसर्गाशी संपर्क साधा.
 • आपला दिवस उज्ज्वल करणारा आणि आपल्याला जिवंतपणा जाणवेल अशा कोणत्याही गोष्टीचे आभार माना.
 • क्षण आणि क्षण जगा.
 • आपल्या ‘इकिगाई’चा अनुसरण करा.

यावरून मला एका तत्त्वज्ञ आणि नागरी हक्क नेत्यांचे म्हणणे आठवले. हॉवर्ड डब्ल्यू थुरमन म्हणतात , “तुला काय जिवंत ठेवते हे विचारा आणि ते करायला सांगा. जगाला काय हवे आहे ते विचारू नका. आपल्‍याला काय ते जिवंत आणि कसे बनवते हे विचारा आणि ते करा. कारण जगाला जे लोक जिवंत आहेत तेच पाहिजे. ”

कोट्यवधी लोकांची समस्या अशी आहे की ते जबाबदाऱ्या स्वीकारतात आणि दिनचर्या तयार करतात. तेव्हा नवीन अनुभवांबद्दल उत्सुकता निर्माण होणे थांबते. त्यांच्या अद्भुततेतून त्यांची सुटका होण्यास सुरुवात होते, परंतु आपण ते बदलू शकता, विशेषत: जर आपण अद्याप आपण दररोज जे काही करता त्याचा अर्थ आणि पूर्तता शोधत असाल.

अल्बर्ट आइनस्टाईन आम्हाला आमची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रोत्साहित करतात. ते एकदा म्हणाले, “तुम्ही प्रश्न का विचारता याचा विचार करू नका, प्रश्न विचारणे थांबवू नका. आपण काय उत्तर देऊ शकत नाही याबद्दल चिंता करू नका आणि आपल्याला काय माहित नाही हे सांगण्याचा प्रयत्न करू नका. कुतूहल हे स्वतःचे कारण आहे.

आपण वास्तवामागील अनंतकाळ, जीवनाचे आणि अद्भुत रचनेच्या रहस्यांवर विचार करता तेव्हा आपण चकित नाही काय? आणि मानवी मनाचा हा चमत्कार आहे – माणसाने काय पाहिले, जाणवते आणि स्पर्श केले हे स्पष्ट करण्यासाठी त्याचे बांधकाम, संकल्पना आणि सूत्रे साधने म्हणून वापरली पाहिजेत. दररोज थोडे अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा. पवित्र उत्सुकता बाळगा.”

अजून एक मस्त उदाहरणच द्यायचा झाला तर स्टीव्ह जॉब्सची उत्सुकता हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे ज्यामुळे त्याने टायपोग्राफीच्या निरुपयोगी वर्गात जाण्यास आणि डिझाइनची संवेदनशीलता विकसित करण्यास प्रवृत्त केले. नंतर, ही संवेदनशीलता बाजारात Apple संगणक आणि Apple च्या कोर भिन्नतांचा एक आवश्यक भाग बनली.

आम्ही जिज्ञासू जन्म घेतो. आमची अतृप्त ड्राइव्ह शिकणे, शोध लावणे, अन्वेषण करणे आणि अभ्यास करणे आपल्या जीवनातील प्रत्येक ड्राईव्हसारखेच असणे आवश्यक आहे.

– जयेश फडणीस
8097130476
phadnisj@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?