Advertisement
भारतीय बाजारपेठ आणि आयात-निर्यात : सद्यस्थिती
उद्योगोपयोगी

भारतीय बाजारपेठ आणि आयात-निर्यात : सद्यस्थिती

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

इसवी सन 17व्या शतकाच्या पूर्वार्धापासून भारताला ‘सोने कि चिडिया’ असं म्हटलं जात होतं, कारण आपला देश त्यावेळी जगातील सर्वात मोठा निर्यातदार होता. सर्व बाबतीत आपण समृद्ध होतो. त्या काळी मसाले, सोने, हिरे, कापड आणि मीठ मोठ्या प्रमाणात आपण जगाला निर्यात करत असू.

भारतीय बाजारपेठ आजसुद्धा अनेक वस्तू आणि सेवा आयात-निर्यातमध्ये अग्रेसर आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय मालाला, वस्तूंना मागणी खूप वाढली आहे. ज्या देशाची निर्यात चांगली तशी त्या देशाची चलनव्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था मजबूत, असते. आयात-निर्यातीमुळे विदेशी चलन वाढून अर्थव्यवस्था मजबूत कणखर होण्यास मदत होते. तसेच निर्यातीचा मोठ्ठा परिणाम देशाच्या GDP वरसुद्धा होत असतो. म्हणून विदेश व्यापार करणार्यान व्यक्ती तसेच कंपन्यांना भारत सरकारही आवश्यक सोयीसुविधा देण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. आज भारतीय बाजारपरपेठ अनेक वस्तू आणि सेवा निर्यात आणि IT सेवा निर्यात पुरवण्यात अग्रेसर आहे.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

आज जागतिक बाजारपेठेत भारताच्या आयात-निर्यातील भक्कम अशी स्थिती आहे. भारतातून एकूण 7500 पेक्षा जास्त वस्तू 190 देशांना निर्यात होतात. आपल्या देशाचा आयात व्यापार निर्यात व्यापारापेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर 6000 वस्तू 140 देशांतून आयात केल्या जातात. आपल्या देशातून 75 टक्के निर्यात फक्त 5 राज्ये मिळून करतात. त्यात आकडेवारीनुसार महाराष्ट्र (22.3%), गुजरात (17.2%), कर्नाटक (12.7%), तामिळनाडू (11.5) आणि तेलंगणा (6.4%) इत्यादी राज्यांचा समावेश होतो.

भारत सरकारची डायरेक्टर ऑफ जनरल फॉरेन ट्रेड म्हणजेच DGFT ही संस्था सर्व आंतरराष्ट्रीय व्यापार हाताळते. निर्यात धोरण (Foreign Trade Policy) 2015 ते 2020 ह्या वर्षासाठी लागू केलेले धोरणसुद्धा DGFT लागू करते. प्रत्येक 5 वर्षांसाठी निर्यात धोरण तयार केले जातात. मागच्याच वर्षी GST आल्याने नवीन निर्यात धोरण लागू केले असले तरी अजून तज्ज्ञ अधिकार्यांतमार्फत बदल चालूच आहेत. DGFT संस्थेमार्फत लायसन्स पुरवण्यापासून ते सर्व प्रक्रिया झाल्यानंतरची सुविधा किंवा अडचणी दूर करण्याचे काम केले जाते.

भारत सरकारने 9 विभागीय कार्यालये DGFT ची चालू केली आहेत. मुंबई, चेन्नई, कोलकाता, न्यू दिल्ली, लुधियाना, कोचिन, पुणे, हैदराबाद आणि पुणे येथे ती कार्यालये आहेत. तसेच प्रत्येक क्षेत्रासाठी कौंसिलसुद्धा नेमून दिले आहेत. ज्याला ज्या क्षेत्रात व्यापार करायचा आहे त्याला त्या क्षेत्राचे सभासदत्व घेणे गरजेचे आहे. समजा, तुम्हाला मशीनरीमध्ये आयात करायची आहे तर तुम्हाला तुमच्या पेमेंट गॅरंटीसाठी Engineering Export Promotion Council (EEPC) ची मदत लागते.

कृषी किंवा शेतीमालमध्ये ‘अपेडा’ ही संस्था काम करते. एक्स्पोर्ट काऊंसिल एक प्रकारे एक सेवा देणारी संस्था असते, जी त्याच्या सदस्यांना मालाची विक्री, सरकारची ड्युटी मिळवण्यासाठी, बाजारपेठ उपलब्ध करून देणे, सर्व व्यापार पूर्तता करण्यासाठी मदत करत असते. विविध क्षेत्रांत विविध कौंसिल काम करतात. ते सर्व सरकारच्या DGFT मार्फत नेमलेल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठत टिकून राहण्यासाठी आपल्या देशाने जे धोरण लागू केले आहे, त्यामुळे आयात-निर्यात व्यापार वाढीस लागत आहे; पण काही परिस्थितीमध्ये धोरणात थोडे बदल करावे लागतातच. त्या बदलामुळे अनेक वस्तूंवर आणि चलनावर परिणाम होत असतोच. जर अर्थव्यवस्था भक्कम करायची असेल तर आयात आणि निर्यात समतोल किंवा निर्यात वाढवणे गरजेचे असते. तसेच नवीन उत्पादन आणि व्यापारास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असते, जेणेकरून व्यावसायिक व्यक्ती ह्या क्षेत्रात येऊन, आपल्या वस्तू किंवा मालाची मोठ्या बाजारपेठेत विक्री करावी आणि तसा मोबदलाही मिळवावा ह्या हेतूने सरकार अनेक स्कीम्स/योजनासुद्धा राबवत आहे.

भारतीय बाजारपेठेतून सर्वात जास्त आयात-निर्यात होणारे उत्पादन :-

भारत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तुलनेत आयातमध्ये जगात दहाव्या स्थानावर, तर निर्यातीमध्ये आपण 17 व्या स्थानावर आहोत.

जगभरातून भारतात सर्वात जास्त निर्यात होणारे घटक –

  • इलेट्रिक मशीन्स आणि इलेक्ट्रिक वस्तू.
जगभरातून भारतात सर्वात जास्त आयात होणारे घटक –
  • इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
आयात व्यापारामध्ये हे भारताचे मोट्ठे भागीदार आहेत

* चीन * सौदी * अरेबिया * अमेरिका * इंडोनेशिया * साऊथ * कोरिया * जर्मनी * इराक * नायजेरिया

निर्यात व्यापारात भारताचे हे मोठ्ठे भागीदार आहेत

* अमेरिका * UAE (आखाती देश) * हाँगकाँग * चीन * UK * सिंगापूर * जर्मन * श्रीलंका * बांगलादेश.

नोव्हेंबर 2016 ते नोव्हेंबर 2017 ह्या वर्षात 26.5 लाख करोड इतकी आयात देशात झाली. तसेच नोव्हेंबर 2016 ते नोव्हेंबर 2017 ह्या वर्षात 19.2 लाख करोड इतकी निर्यात देशातून झाली आहे. भारतीय बाजारपेठेमधील कोणत्याही वस्तू, सेवा आणि उत्पादनाची तंतोतंतपणे व्यापाराची आकडेवारी http://dashboard-commerce.gov.in/import-export वर मिळून जाईल.

आयात-निर्यात संबंधित इतर महत्त्वाच्या वेबसाइट्स
  • icegate.gov.in

– आकाश आलुगडे
9579801138


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!