उद्योगोपयोगी

बिझनेस ब्लॉग कसा लिहावा?

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

तुम्हाला तुमचा ब्लॉग सुरू करायचा आहे का? किंवा तुम्ही तो सुरू केला आहे, परंतु त्याच्या साहाय्याने तुम्हाला तुमची विक्री कशी वाढवायची ते माहीत आहे का? नसेल तर मग खालील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


एक चांगला ब्लॉग लिहिणे म्हणजे काय?

एक चांगला ब्लॉग हे एक उत्तम मार्केटिंगचे माध्यम आहे. शिवाय तो तुम्हाला तुमच्या ग्राहकांपर्यंत सरळ पोहोचविण्यास मदत करतो. तुम्हाला तुमच्या ग्राहकांपर्यंत खालील गोष्टी तुमच्या ब्लॉगमार्फत पोहोचविणे आवश्यक आहे.

 • Educate them: ग्राहकांना ज्ञान व माहिती द्या.
 • Empower them: ग्राहकांना योग्य पर्याय निवडण्यासाठी सक्षम बनवा.
 • Delight them: ग्राहकांना आपल्या उत्पादन व सेवेबद्दल उच्चतम अनुभव द्या.

ब्लॉगमुळे ग्राहकांना तुमच्या उत्पादनांविषयी माहिती मिळते. त्यांना तुमच्या उत्पादनांविषयी विश्वास वाटतो आणि त्यामुळे तुमचा उद्योग्/व्यवसाय वाढण्यास मदत होते. तुमचे blogging धोरण व्यवस्थित असेल तर ग्राहक तुमच्या ब्लॉगपर्यंत आपोआपच खेचले जातील आणि वाचकांचे रूपांतरण हळूहळू ग्राहकात होईल.

मग नक्की काय लिहिले पाहिजे? कशी सुरुवात करायची?

हे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडतील. त्या वेळी आपण स्वतः एक ग्राहक आहे असे समजा आणि त्यावर थोडासा विचार करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ग्राहकांना नक्की काय हवे आहे हे शोधता येईल. एकदा का तुम्ही ते शोधण्यास समर्थ झालात, की लगेच तुमच्या ब्लॉगमार्फत ग्राहकांना तुमच्या उत्पादनांविषयी माहिती द्या आणि त्यांच्या काही शंका असल्यास त्यांचे निरसन करा.

तुम्ही ब्लॉगचा वापर खालील गोष्टींसाठीही करू शकता.
 • ब्लॉगवर तुमच्या व्यवसायाबद्दल लिहिणे.
 • ब्लॉगवर ग्राहकांना तुमच्या उत्पादनांविषयी माहिती देणे.
 • ब्लॉगवर तुमचे अनुभव सांगणे.
 • ब्लॉगवर ग्राहकांना updates कळविणे.
 • योग्य उत्पादन निवडण्यासाठी ग्राहकाला मदत करणे.

तुम्हाला ब्लॉग लिहिण्यासाठी पुष्कळ साधनांचा वापर करता येतो. जसे की wordpress, blogger आणि medium. तुम्ही तुमचे स्वतःचे एखादे domain निवडा आणि सुरुवात करा. तुम्हाला ब्लॉग लिहिण्याचा विषय मिळाला की, गुगल सर्च इंजिन वापरून चांगल्यात चांगल्या कीवर्डस्चा वापर करा. त्यासाठी गुगल कीवर्ड प्लानरचा वापर करा.

तुम्ही जे काही पोस्ट लिहिणार असाल ते जास्तीत जास्त 600 शब्दांपर्यंत मर्यादित ठेवा. सुरुवात आणि शेवट योग्य असू द्या. प्रत्येक ब्लॉग पोस्टमध्ये एक तरी चांगले चित्र असू द्या आणि मग तुमची पोस्ट तुमच्या ग्राहकांना शोधता येईल. ह्यालाच SEO (Search Engine Optimization) म्हणतात.

मग हे SEO व्यवसायवृद्धीसाठी का आवश्यक आहे?

SEO मुळे ग्राहक तुमच्या पोस्टपर्यंत सहजरीत्या पोहोचू शकतात. तुमचे लिहिणे योग्य आणि मर्यादित असेल तर ग्राहक तुमच्या पोस्ट्स वाचण्यात रस घेतील आणि तुमचे कायमस्वरूपी वाचक/ग्राहक बनतील.

खालील काही गोष्टी तुमच्या ब्लॉगच्या लोकप्रियतेसाठी अवश्य करा.
 • तुमचा विषय, उत्पादन लोकांपर्यंत थेट पोहोचविणे.
 • तुम्ही ग्राहकांना जे द्यायचे कबूल केले आहे तेच त्यांना द्या.
 • उलटसुलट किंवा खोट्या जाहिराती देऊ नका.
 • तुमच्या ब्लॉगशी उपयुक्त काही लिंक्स असतील तर त्या लोकांपर्यंत पोहोचवा.
 • चांगल्यात चांगल्या गुगल कीवर्ड टूल्सचा वापर करा.
 • काही वेळेस ग्राहकांना return offer द्या. जसे… freebies, webinar, Ebook किंवा तुमच्या ब्लॉगसाठी subscription…वगैरे
 • प्रत्येक पानावर तुमचं domain नामांकित करा. त्यामुळे ते सहज शोधण्यास सोपे होते. जितक्या जास्त पोस्ट तुम्ही लिहू शकाल तितकाच तुमचा ब्लॉग प्रसिद्ध होईल.
 • जर तुम्ही तुमच्या वाचकांच्या मागण्या योग्य वेळी पुरविण्यास समर्थ व्हाल तेव्हा तुमचे वाचक तुमचे ग्राहक बनतील आणि तुमच्या ब्लॉगशी जास्तीत जास्त जोडले जातील.

तुमचा प्रत्येक वाचक तुमचा ग्राहक असेल असे नाही; परंतु ऑनलाइन येणारा जवळपास प्रत्येक ग्राहक तुमचा वाचक असेलच! एक चांगला ब्लॉग लिहिल्यामुळे एका वाचकाचे चांगल्या ग्राहकात तुम्ही रूपांतर करून आपला व्यवसाय वाढवू शकता. त्यासाठी वरील मुद्दे लक्षात घ्या आणि आजच तुमचा ब्लॉग लिहिण्यास सुरुवात करा.

नेटभेटच्या सोशल मीडिया मार्केटिंग मास्टरक्लास या मराठी प्रशिक्षणामध्ये व्यवसायवाढीसाठी ब्लॉग लेखन, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, गुगल की-वर्ड टूलचा योग्य वापर, आपली ब्लॉग पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे अनेक उपाय शिकविले जातात.

– सलील चौधरी
9819128167
(लेखक ‘नेटभेट डॉट कॉम’चे संस्थापक आहेत.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!