व्यवसायाचे ब्रॅण्डमध्ये रूपांतर कसे करावे?

आज काल बहुतेक लोक जेव्हा खरेदीला जातात, तेव्हा हमखास एक प्रश्न विचारतात “काय हो हे ब्रॅण्डेड आहे का?”

आपणही कोणाशी, कोणती गोष्ट घेण्याची शिफारीश करतो तेव्हादेखील हमखास एक गोष्ट म्हणतो “आहे अमुक तमुक गोष्ट नक्की घ्या ब्रॅण्डेड आहे!” किंवा “हा ब्रँड नको, हा ब्रँड घ्या, ह्या ब्रॅण्डच्या ह्या गोष्टी विशेष आहेत”

चला तर मग जरा तोंडओळख करून घेऊयात अगदी सोप्या भाषेत ह्या ब्रँडचा काय अर्थ आहे हे? ब्रॅण्डिंग म्हणजे नक्की काय? ब्रॅण्डिंग तुम्हाला तुमच्या व्यवसायवृद्धीत कसे वापरात येईल?

तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एक ब्रँड म्हणजे सर्व अभिव्यक्तींची बेरीज ज्याद्वारे एखादी गोष्ट (व्यक्ती, संस्था, कंपनी, व्यवसाय, शहर, राष्ट्र इ.) ओळखण्याची इच्छा बाळगते. नुसती ओळखच नव्हे तर, तो व्यवसाय किंवा व्यक्ती किंवा सेवा किंवा प्रॉडक्ट किंवा अगदी एखादी विशिष्ट गोष्ट कशा प्रकारे इतरां पेक्षा विशेष आहे आणि त्याची मूल्ये हि त्या प्रकारात अगदी प्रबळ आहेत.

आधुनिक अर्थाने एक ‘ब्रँड’ हा अपेक्षा आणि अनुभवावर आधारित आहे. त्याच्या सोप्या स्वरूपात, जेव्हा लोक आपली संस्था किंवा उत्पादन पाहतात, ऐकतात किंवा त्यांचा विचार करतात तेव्हा ते, ह्या ब्रँड नामक गोष्टींना मान्यता देतात म्हणजे त्याचा स्वीकार करतात.

एक गोष्ट अगदी महत्त्वाची आहे की तुम्ही जर नवीन व्यवसाय करू इच्छिता तर लगेच तुमचा ब्रँड बनणे शक्य नाही त्याला कारणही तसेच आहे , म्हणजे बघा कोणताही यशस्वी व्यवसाय ,उद्योग हा काही मूलभूत तत्वांवर आणि गरजे वरील उपाय किंवा प्रश्नांवरील उत्तरांवर अवलंबून असतो.

आधी व्यवसाय, उद्योग उभा राहतो मग त्या नुसार त्या निगडित सेवा पुरवली जाते. त्यातून व्यावसायिक आणि त्यांची टीम त्यांचा ग्राहकाकडून अभिप्राय घेतात. त्यांचे व्यावसायिक माप दंड, त्यांचे बिझनेस लक्ष, मिशन, व्हिजन आणि त्यांच्या ग्राहकाकडून आलेला प्रतिसाद ह्यावर पुन्हा नवीन बांधणी करून व्यावसायिक वृद्धी होते आणि एक ब्रँड तयार होतो.

ब्रँड हा काही कल्पनेसारखा स्वयंभू नाही म्हणजे अचानक प्रकट होत नाही, तर तो रणनीतीपूर्वक केलेले प्रक्रियेचा एक फळ आहे.

ब्रँड हा प्रकार बिझनेस म्यानेजमेंट च्या भाषेत मार्केटींग श्रेणीत मोडतो.

मग ब्रँड चा असा काय विशेष महत्व आहे ?

अगदी सरळ सोप्या भाषेत सांगायचं झाला तर एक बिझनेस टीप तुम्हाला सांगतो,

आपण काय करता, हे लोक खरेदी करीत नाहीत; आपण हे का करता त्या साठी ते लोक खरेदी करतात.

हे वाक्य जरा समजण्यास जड जाईल परंतु हे निर्विवाद सत्य आहे जसे कि, बर्‍याच कंपन्या त्यांच्या उत्पादनांची वैशिष्ट्ये आणि फायदे विकण्यावर लक्ष केंद्रित करतात. वास्तविकतेमध्ये, ज्यामुळे लोकांना सर्वात जास्त उत्तेजन मिळते ते, आपले ध्येय आणि आपण आपल्या व्यवसायासह काय साध्य करण्याची अपेक्षा करत आहात याची दृष्टी आहे.

ब्रँड म्हणजे केवळ लोगो किंवा टॅग लाईन किंवा स्पेशल असा मेसेज, दिखावा, आवाज नाही तर ब्रँड म्हणजे एखाद्या गोष्टीतला वैशिष्ट्य पूर्ण अनुभव.

एखादी गोष्ट कोणत्या एका समस्येचा समाधान किती सुस्पष्ट पणे देते, एखादी गोष्ट एखाद्या मुद्द्या साठी किती प्रभावी पणे पुढे सरसावते किंवा ठाम उभी राहते. त्या गोष्टींच्या बाबतीत त्यांच्या ग्राहकाला किव्हा त्या गोष्टींचा अनुभव घेतलेल्या लोक्काना त्या गोष्टींवरचा विश्वास आणि त्यांची त्याविषयीची भावना ह्यातून जो परिणाम दिसतो अनुभवास येतो तोच एक ब्रँड बनतो.

तुमच्या विश्वासावर जे विश्वास ठेवतात तुमच्या कार्य पद्धतीवर अवलंबून – अनुसरून जे तुमचा सोबत चालतात ते तुमचे ब्रँड फोल्लोवेर्स होतात.

उदाहरणाने समजून घेऊयात,

1. अगदी टिपिकल उदाहरण म्हणजे APPLE कंपनी

स्टीव्ह जॉब्स Apple यांचे ध्येय विधान होते, “साधने बनवून जगाला हातभार लावणे…” मानवजातीला प्रगती करण्याच्या मनासाठी साधने बनवून जगाला हातभार लावणे. ”

APPLE च्या जाहिराती बघा ते त्यांचे iphone ipad इतरांपेक्षा कसे वेगळेत हे सांगत नाहीत उलट ते creative म्हणजे नावीन्यपूर्णत्व ला महत्व देतात ते कायम नवीन गोष्टी, स्वातंत्र्य, आनंद, माणसाच्या दैनंदिन मानसिक भावना ह्यांचा द्वारे लोकांशी connect करतात.

Apple च्या ह्या गोष्टींवर जे प्रभावी पणे विश्वास ठेवतात ज्यांना हा अनुभव प्रत्यक्षात मिळतो ते Apple ब्रँड चे वाहक – pramotors आपोआप होतात आणि Apple सुद्धा एक ब्रँड प्रॉडक्ट म्हणून मोठी होते.

2. NIKE चे बूट खूप जण वापरात असाल काय आहे असा विशेष त्यात ?

Nike चे व्हिजन “जगातील खेळाडूंना प्रेरणा आणि नाविन्य आणण्यासाठी आहे.” असे आहे
Nike म्हणत नाही कि आमचे बूट घालून तुम्ही बेस्ट व्हाल किंवा हे तमुक ब्रँड पेक्षा स्वस्त किंवा उत्तम आहेत आणि तसाच त्यांचा प्रॉडक्ट आणि सेवा(service) आहे मग लोक आपोआप Nike मध्ये ब्रँड बघतात.

3. AMAZON ध्येय विधान –
“इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना काहीही शोधण्यात, शोधण्यात आणि खरेदी करण्यात मदत करण्यासाठी आणि व्यवसाय आणि सामग्री निर्मात्यांना त्यांचे यश जास्तीतजास्त करण्यासाठी सक्षम बनवून ग्राहकांच्या अनुभवाची मर्यादा सातत्याने वाढविणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही पृथ्वीची सर्वात ग्राहक केंद्रीत कंपनी असल्याचे आमचे लक्ष्य आहे.”

AMAZON च्या म्हणण्यानुसार सर्व गोष्टी एकाच छताखाली तेही आत्ता इंटरनेट च्या मदतीने घरबसल्या शॉपिंग ! लक्ष द्या ते असे नाही म्हणत आहेत कि अमुक तमुक गोष्ट आम्ही स्वस्त देतो किंवा हि आमची specialty वगरे.

त्यामुळे लोक त्यांच्या वर विश्वास ठेवतात आणि त्यांचा मार्फत केलेल्या शॉपिंग चा अनुभव घेऊन AMAZON ला ब्रँड करण्यात हातभार लावतात आणि त्याचे सदस्य होतात.

4. आपल्या टाटा कंपनी आणि रतन टाटा ह्यांचा उदाहरण घ्या, रतन टाटा ह्यांच्या गुणांचा फायदा टाटा समूह ला झाला आणि टाटा कंपनीच्या कामाचा – प्रॉडक्ट आणि सेवेचा फायदा रतन टाटा ह्यांना तेव्हा personality ब्रँड आणि व्यावसायिक ब्रँड निर्मिती झाली.

टाटांच्या विश्वासावर विश्वास ठेवून लोकांनी टाटा कंपनीला मोठा केला आणि लोक हि त्या समूहाचा भाग बनले – ग्राहक म्हणून आणि कर्मचारी म्हणून.

5. जसे उधाहरण TATA न चे होते तसेच मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि BILL GATES ह्यांचे आहे.

6. अमूल हि एक भारतीय दुग्ध सहकारी संस्था आणि सहकारी संस्था असून त्याचे व्यवस्थापन सहकारी संस्था करतात तरी अमूल एक ब्रँड आहे.

भारतातील ‘व्हाईट क्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे वर्गीस कुरियन हे एक सामाजिक उद्योजक होते ज्यांची “अब्ज लिटर कल्पना” होती – दूध आणि दुग्ध जन्य पदार्थ , जगातील सर्वात मोठा कृषी दुग्ध विकास कार्यक्रम, ऑपरेशन फ्लड त्यांचा मार्गदर्शन खाली झाला आणि त्याचे रूपांतर अमूल ब्रँड मध्ये लोक्कांनी केले – लोक म्हणजे त्यांचा विश्वासावर आणि कार्य क्षमतेवर आधारित त्यांचे शेतकरी व्यावसायिक त्यांचे भांडवलधार आणि ग्राहक.

7. बाबा रामदेव हे योगासनं आणि योग शिबिरांसाठी प्रसिद्ध आहेत. स्वदेशी, दानार्थ संपन्नता आणि देश हित – राष्ट्र निर्माण हि त्यांची मूल्ये आहेत तीच त्यांचा निर्मित PATANJALI समूहाने विकसित केली आणि लोकांना त्याचा अनुभव आला आणि बघता बघता पतंजली एक ब्रँड झाला.

आणखीन उदाहरणे द्यायचे झालेच तर बघा गोदरेज , बिर्ला , रिलायन्स ह्या भारतीय कंपन्या, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, लता मंगेशकर असे भारतीय कलाकार Bill gate, Elon musk, Steve Jobs, Henry Ford, Walt Disney अशी जगविख्यात व्यक्तिमत्त्व!

फक्त उद्योगच ब्रँड असू शकतो का? मुळीच नाही. सेवा, प्रॉडक्ट किव्हा सामाजिक संस्था किंवा अगदी व्यक्तीसुद्धा ब्रँड असू शकतो – ब्रँड म्हणून नावारूपाला येऊ शकतो.

अमेरिका हा देश स्वातंत्र्य, समानता, आधुनिकता, रिसर्च – डेव्हलोपमेंट, लोकशाही ह्या मूल्यांसाठी प्रसिद्ध आहे. अमेरिका हासुद्धा एक ब्रँड आहे. हे सर्व त्या त्या क्षेत्रातील एक ब्रँड आहेत! ज्या लोकांनी ही तत्त्वे अंगीभूत स्वीकारावीशी वाटतं ती अमेरिकेकडे आकर्षित होतात अगदी आजही.

आपला देश भारत – स्वातंत्र्य, समता, बंधुता, सांस्कृतिक मूल्ये आणि समृद्ध परंपरा अशा मूल्यांसाठी प्रसिद्ध आहे. भारत हासुद्धा एक ब्रँड आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील “खादी” आठवा – खादी म्हणजे स्वदेशी. त्या वेळच्या महानुभावांनी स्वदेशीचा नारा दिला स्वातंत्र्यासाठी आणि लोकांनी त्याचा स्वीकार केला खादी हा एक ब्रँड बनला.

छत्रपती श्री शिवाजी महाराज – त्यांनी स्वराज्यनिर्मितीचे आवाहन केले. त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. एक तपोयज्ञच जागवला. त्यांची शिकवण आणि त्यांचे प्रेरक आचार-विचारही आजच्या पिढीला मार्गदर्शक आहेत.

छत्रपती शिवाजी राजांचे स्वराज्य हादेखील एक ब्रँडचा आहे आणि विषेश म्हणजे तो कालातीत आहे. उद्योग वृद्धीसाठी ब्रँडिंग महत्त्वाचे का आहे?

  • ब्रँडिंगमुळे ओळख मिळते.
  • ब्रँडिंगमुळे व्यवसायमूल्य वाढते.
  • ब्रँडिंगमुळे कर्मचार्‍यांचा अभिमान आणि समाधान सुधारते.
  • ब्रँडिंगमुळे बाजारपेठेत विश्वास निर्माण करते.
  • ब्रँडिंग नवीन ग्राहक निर्माण करते आकर्षित करते.
  • ब्रँडिंग तुमच्या प्रॉडक्ट अथवा सर्विसेस म्हणजे सेवा संभंधित जाहिरातींचे समर्थन करते.
  • आपला ब्रँड आपल्याला आपल्या ग्राहकांशी भावनिकरित्या कनेक्ट होण्यास मदत करतो.

ब्रँडिंगबद्दलचा पहिला आणि एकमेव सुवर्ण नियम हा आहे: ते खरेपणावर आधारित असावा.

आपला ब्रँड आपल्या ग्राहकांना आणि स्वतःला दिलेले वचन दर्शवितो. एक चांगला ब्रँड ग्राहकांना नेहमी आपल्याकडे कार्य करतात तेव्हा त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी ते सांगेल आणि ते आपण धारण करू शकता आणि त्या आश्वासनाचा एक चांगला सहाय्य म्हणजे तो आपल्याला स्वतःशी प्रामाणिक ठेवतो.

भावनांवर एक सामर्थ्यवान ब्रँड स्ट्रॅटेजी बनवली जाते. जर तुम्हाला ते विकायचं असेल तर तुम्हाला त्यातील भावना शोधाव्या लागतील. जर तुम्हाला ते विकायचं असेल तर त्यांना ते वाटलं पाहिजे. आणि त्या मुळेच जर कोणाच्या भावनांचा फायदा (गैर फायदा) घेऊन तुम्ही ब्रँड बनवू इच्छिता तर तो काही काळच टिकेल, तो नक्कीच शाश्वत ब्रँड नसेल.

– जयेश फडणीस
8097130476

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?