व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस कार्डचं महत्त्व

उद्योगविश्वात नेटवर्किंगला फार महत्त्व आहे. नेटवर्किंगच्या वेगवेळ्या पद्धती सतत उद्याला येतच असतात. सध्या स्‍वत:ची ओळख करून देण्यासाठी अशा नेटवर्किंगमधून बिझनेस कार्ड हे व्यवसायिकांसाठी अपरिहार्य आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखपत्र म्‍हणून बिझनेस कार्डला पर्याय नाही. स्‍वत:चं बिझनेस कार्ड तयार करण्यासाठी अनेक उद्योजक Professional Designer ची मदत घेतात.

बिझनेस कार्डचा इतिहास फार जुना आहे. बिझनेस कार्डचा उदय १८व्या शकतात झालाय. तेव्हापासून आजपर्यत बिझनेस कार्डच्या प्रवासात अनेक स्थित्‍यंतर झाली. म्‍हणूनच त्‍याचं महत्त्व उद्योगजगतात फार मोठं आहे.

Professional Designer ची मदत घेण्यापूर्वी…

स्‍वत:चं बिझनेस कार्ड कसं असावं याची रूपरेषा आपण स्‍वत: ठरवावी. त्‍यासाठी काही गोष्‍टी खाली देत आहोत. त्‍याचा अभ्‍यास करावा.

१. तुमचं बिझनेस कार्ड हे तुमच्या व्यवसायाची ओळख करून देतं. त्यामुळेच First Impression is a Last Impression हे लक्षात ठेवून बिझनेस कार्डच्या Design चा विचार करावा.

२. तुमच्या व्यवसायाची एका वाक्यात ओळख करून देणारी Tag Line जरूर द्यावी.

३. कंपनीचं नाव, दूरध्वनी क्रमांक, पत्ता हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच आजच्या काळात तुमची अथवा कंपनीच्या Social Media ची लिंक बिझनेस कार्डवर असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.

४. कंपनी लोगो आणि त्याची जागा कायमस्वरूपी ठरलेली असावी.

५. बिझनेस कार्ड चा रंग कोणता असावा या गोष्टीचाही बारकाईने विचार करावा. तुमचं मार्केटिंग मटेरियल, वेबसाईट, बिझनेस कार्ड या सगळ्यांच्या रंगसंगतीमध्ये एकवाक्यता असावी याची काळजी घ्यावी.

६. बिझनेस कार्डचे नुसतेच Design चांगले केले आणि छपाई निकृष्ट दर्जाची असेल तर त्याची सर्व शोभा निघून जाऊ शकते. त्यामुळे चांगल्या Design सोबत चांगल्या गुणवत्तेच्या छपाईकडेही लक्ष द्यावे.

आपल्याकडे अजूनही अनेक उद्योजक बिझनेस कार्डच्या Presentation च्या विषयी म्हणावे तेवढे आग्रही नाहीतं, परंतु आज त्याचं महत्त्व हळुहळू प्रत्येकाला उमगू लागलंय म्हणूनच बिझनेस कार्डसुद्धा किती महत्त्वाची भुमिका पार पाडते हे यातून कळते. त्यामुळे स्वत: चे आकर्षक बिझनेस कार्ड असावे यासाठी आग्रही व्हा.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?