संवाद कौशल्य एक व्यावसायिक गरज

आपल्याकडे एक म्हण आहे की, ‘बोलणार्‍याचे दगडही विकले जातील, पण न बोलणार्‍याचे चणेसुद्धा विकले जाणार नाहीत.’ अत्यंत बोलकी म्हण आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात संभाषण कला प्रत्येकाला अवगत असायला हवी. विशेषतः उद्योजकांना तर याची जास्त गरज आहे.

माहितीचं आदानप्रदान योग्य रीतीने होऊन, त्यातून चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी ‘संवाद’ ही पहिली पायरी असते. व्यक्तिमत्त्व प्रभावशाली करण्यासाठी आणि संवादाच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी, वैयक्तिक जडणघडणीबरोबरच व्यावसायिक जीवनात हमखास यश मिळविण्यासाठी ‘संवाद कौशल्य’ अत्यंत आवश्यक आहे.

यशस्वी उद्योजक व्हायचं असेल, तर त्यासाठी व्यावसायिक कौशल्यांबरोबर आत्मविश्वास, जोखीम पेलण्याची तयारी आणि वाटाघाटीचं कौशल्यही हवंच. व्यवसाय करताना कुठे कुठे संवाद कौशल्य महत्त्वाचे असते त्याचे काही मुद्दे पाहू.

परस्पर संवाद :प्रत्येक व्यावसायिकाचा नानाविध लोकांशी सतत संबंध येत असतो. त्यामुळे लोकांशी संवाद साधायला तुम्हाला आवडते का, हे अगोदर तपासा. तुम्ही लोकांशी कशा प्रकारे वागता यावर तुमचं यश अवलंबून असते.

संवाद कौशल्य घडवताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे स्वतःच बोलणे इतरांना ऐकवणे हे नव्हे, तर इतरांचे बोलणे ऐकणेसुद्धा आले. एक चांगले संभाषण ते असू शकते जिथे एकमेकांचे ऐकून घेतले जाते.

समस्या, अडचणी सोडवणे : उद्योग उभा करताना रोज नवा संघर्ष असतो. रोज लहान-मोठ्या अडचणी समोर असतात; पण यशस्वी व्हायचंय तर या सार्‍यांवर मात करता यावी लागते. यासाठी आत्मविश्वास आणि त्वरित निर्णय घ्यावे लागतात. यासाठी आपल्याला आपली वाणी गोड ठेवावी लागते. जर आपल्याला हे संवाद कौशल्य जमले तर यात आपण यशस्वी होतो.

सेल्स आणि मार्केटिंग : प्रत्येक उद्योजक हा स्वतः चांगला सेल्समन असणे ही उद्योगाची गरज असते. ज्या उद्योजकाला हे मर्म कळते तो उद्योगात टिकतो. जेव्हा आपण एखाद्या उद्योजकाला त्याच्या व्यवसायाविषयी बोलताना ऐकत असतो त्या वेळी तो आपल्याला खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला म्हणजेच त्याचे संभाषण कौशल्य प्रभावशाली असते.

मार्केटिंग म्हणजे केवळ जाहिरात नव्हे, तर तुमच्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना तुमच्या व्यवसायाविषयक माहिती देण्यासाठी वापरलेले अनेक प्रभावी मार्ग असतात. यासाठी ग्राहकांची व मार्केटची सखोल माहिती हवी.

याचबरोबर तुमचे प्रतिस्पर्धी कोणत्या प्रकारे मार्केटिंग करतात? ते प्रभावी आहे का? याचा अभ्यास करून त्यातील काही मार्ग आपल्या व्यवसायात वापरता आले पाहिजेत. हासुद्धा एक संभाषणाचा प्रकारच झाला.

– प्रतिभा राजपूत

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?