Advertisement
संकीर्ण

कोणता व्यवसाय करू? | ज्योतिषशास्त्रीय विवेचन

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मी कोणता व्यवसाय करू? माझ्या समोर बसलेला तिशीतला तरुण विचारत होता… त्याने त्याच्या अनेक प्रकारच्या कुंडल्या माझ्या समोर ठेवलेल्या होत्या. पारंपरिक, कृष्णमूर्ती, जैमिनी, अष्टकवर्ग, सायन. पाहिजे ती पद्धत तिथे होती. इतकेच काय, पण काही कुंडल्या वेगवेगळ्या अयनाम्शाच्यादेखील होत्या.

मी विचारात पडलो. एका कुंडलीवर नजर टाकत तिचा त्या वेळच्या प्रश्न कुंडलीशी मेळ घालण्याचा प्रयत्न केला आणि एक गोष्ट लगेच लक्षात आली, की कुंडलीची वेळ बर्‍यापैकी अंदाजपंचे होती. मूळ कुंडली मात्र चांगल्यापैकी होती, वेळेमध्ये थोडाफार बदल झाला असता तरी.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

कुंडलीप्रमाणे हा माणूस चांगल्या सुखवस्तू घरातला असावयास हवा तसेच आतापर्यंत त्याला वडिलोपार्जित किंवा वडिलांनी दिलेली अशी स्थावर किंवा रोकड मालमत्ता त्याच्याकडे असायला हवी. त्याचबरोबर नजरेत भरत होता तो त्याचा कानाचा हलकेपणा आणि प्रयत्नांमध्ये सातत्याचा अभाव.

मी कुंडलीचा व्यवस्थित अभ्यास केला, प्रश्न कुंडलीच्या माध्यमातून माझे कयास पडताळून पाहिले. कुंडलीचा दर्जा बर्‍यापैकी होता. कुंडलीला सौम्य राजयोग होता. लाभस्थान चांगले होते आणि प्रत्येक दशा कशा ना कशा प्रकारे लाभस्थानाशी संबंधित होती. याचाच अर्थ या माणसाच्या आयुष्यात फार कठीण प्रसंग, फार पैशाची चणचण किंवा इतर अडचणी येण्याची शक्यता कमी होती. हलक्या कानाचे असणे आणि प्रयत्नात सातत्य राखू न शकणे या दोन बाबी अतिशय प्रकर्षाने जाणवत होत्या.

अशा जातकांना काय सांगायचे यापेक्षा कसे सांगायचे हे जास्त महत्त्वाचे असते. त्यांचा उत्साह टिकून राहणे आणि त्याच वेळी त्यांना उगाच मोठ्या आशा न दाखवणे जरुरीचे असते. असे जातक जर त्यांना हवा तसा किंवा आवडेल असा सल्ला न मिळाल्यास दुसर्‍या ज्योतिषाकडे जातात, तिसर्‍याचा दरवाजा ठोठावतात आणि अनेकांचे उंबरे झिजवतात आणि शेवटी माझं नशीबच खोटं किंवा ज्योतिषांनी बरोबर सांगितले नाही, असा दावा करून मोकळे होतात. त्यांना प्रयत्नांसाठी उद्युक्त करणे हीच त्यांच्या कुंडलीला खुलवण्याची गुरुकिल्ली असते.

मी त्याला विचारले, तुम्ही काय शिकला आहात आणि आतापर्यंत किती ज्योतिषांकडे जाऊन आला आहात?

मी बारावीनंतर व्यवसाय करण्यासाठी शिक्षण सोडले. बरेच प्रयत्न करून झाले, परंतु मनासारखा व्यवसाय काही मिळाला नाही. मी आतापर्यंत अनेक ज्योतिषांना भेटलो आहे, परंतु कोणीच मला बरोबर मार्गदर्शन करू शकले नाही. मी अंकशास्त्राप्रमाणे माझे नाव बदलले, स्वाक्षरी बदलली, इतरही अनेक उपाय केले, परंतु काही प्रगती नाही. मी आताही काहीही अर्थार्जन करत नाही.

माझे लग्नपण झाले नाही. कुंडलीच कुठे जुळत नाही. माझे कुटुंब मात्र माझी चांगली काळजी घेते. वडिलांनी काही दुकाने घेऊन भाड्याने दिली आहेत. त्यापैकी दोन दुकानांचे भाडे ते माझ्या खात्यात जमा करतात आणि त्यावर माझा सगळा खर्च चालतो.

तुम्ही इतक्या ज्योतिषांकडे जाऊन आला आहात, त्यात मला आणखी एक ज्योतिषी व्हावयाचे नाही. तुमची कुंडली उत्तम आहे, परंतु फक्त जमीन उत्तम असल्याने त्यात ऊस पिकत नाही. त्यासाठी नांगरणी, रोपणी आणि कोळपणीची जरुरी असते. त्याप्रमाणे तुमच्या कुंडलीला सातत्याची गरज आहे.

पंचपक्‍वानाचे जेवण समोर असणे आणि त्याचा आपण आस्वाद घेऊ शकणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आतापर्यंत झालेले प्रयत्न हे अपुरे, विखुरलेले आणि सातत्यविहीन आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचे लक्ष्य गाठायच्या दोन पावले आधी मागे सरता, त्यामुळे तुम्हाला परत परत अपयश, निराशा इत्यादींचा सामना करावा लागतोय.

तुम्ही जर माझ्याकडे सहा महिने सातत्याने येण्याची आणि मी सांगितलेल्या मार्गाने प्रयत्न करण्याची बांधीलकी दाखवलीत आणि जबाबदारी घेतलीत तरच या परिस्थितीत फरक पडू शकतो. तुम्ही घरी जा, निवांत विचार करा आणि तुमची समजूत पटली तर हे शिवधनुष्य उचलण्यास आपण समर्थ आहोत आणि देव आपल्याला यश नक्कीच देईल. या तुम्ही.

मी त्यानंतरच्या जातकास आत बोलावले. त्यांच्याबरोबर विचारविनिमय चालू झाला. तेवढ्यात परत दरवाजा वाजला. हेच गृहस्थ. मी गुरुजी, तुम्ही हे सगळं माझी कुंडली बघून सांगितलं. मला पटले. खूपच बरे वाटले. आतापर्यंत मला असे कोणीच सांगितले नव्हते. मला तुम्हाला माझा हात दाखवायचा आहे. मी माझा हात दाखवण्यासाठी कधी येऊ?

त्यांचे ज्योतिष-पायरी-झिजवणे-चक्र परत सुरू झाले होते…!

– आनंद घुर्ये
(लेखक प्राचीन भारतीय ज्ञान या विषयातले अभ्यासक आहेत)
संपर्क : ९८२०४८३४१६
anand.ghurye@gmail.com

स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!