प्रगतिशील उद्योग

व्यवसायातील उधारीचे महत्त्व

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


खूप पूर्वी, जेव्हा मी एका कंपनीत नोकरी करत असे तेथील एक सुरक्षा कर्मचारी एका गुरुवारी माझ्याकडे आला. त्याने मला सांगितले, साहेब, जरा अडचण आहे. तुम्ही मला शंभर रुपये उधार देऊ शकाल का? सोमवारी परत करीन. मी दिले. त्याने सोमवारी परत केले. नंतर दोन तीन आठवड्यांनंतर परत त्याने तेच केले. तसेच गुरुवारी घेऊन सोमवारी परत. असे आणखी दोन-तीन वेळा झाले.

आता माझे कुतूहल जागे झाले. शंभर रुपये तशी काही फार मोठी रक्कम नव्हती. मी एका सहकार्‍याला याबद्दल विचारले. त्याने सांगितले, अरे, तो मटक्यावर पैसे लावतो. त्यासाठी तीन-चार लोकांकडून पैसे गोळा करतो आणि जिंकला काय किंवा हरला काय आपले पैसे मात्र सोमवारी परत करतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

हा माणूस उद्योग ज्योतिषातील एक तत्त्व त्याच्या नकळत उत्तम प्रकारे वापरत होता. अशी उद्योग ज्योतिषातील अनेक तत्त्वे नकळत अनेक लोक व्यवहारात वापरतात. जसे सिग्नलवरचे भिकारी तुमच्या तोंडावरचा चंद्र बघतात, ठोक व्यापारी तुमची चाल बघतात, हॉटेल दुकानदार तुमचे कपडे आणि तुमची ते वापरायची पद्धत यांचा मेळ घालतात.

उधारी करणे हेदेखील उद्योग ज्योतिषामधील एक विशेष प्रकारचे तत्त्व आहे. ते अतिशय तारतम्याने वापरायचे असते. जेवणात मीठ असते तसे. कमी झाल्यास चव लागत नाही आणि जास्त झाल्यास चव बिघडते. उधारी म्हणजे दुसर्‍याची वस्तू, माल किंवा पैसे आपण वापरासाठी आणणे आणि नंतर त्याचे पैसे किंवा किंमत परत करणे.

उधारीची काही उदाहरणे आपण पाहू.

  • आपल्या नेहमीच्या व्यापार्‍याकडे आपले खाते ठेवणे. महिन्याच्या महिन्याला खात्याचे पैसे भरणे. आपल्या पुरवठादाराकडून सामान घेतल्यावर काही दिवसांनी त्याचे पैसे देणे. पोस्ट डेटेड चेक्स.
  • मालाची अदलाबदल करून व्यापार करणे. जसे लोखंडाच्या व्यापार्‍याने बांधकाम व्यावसायिकास लोखंड पुरवून त्या बदल्यात सदनिका किंवा दुकान घेणे.
  • दुकानात वस्तू विकण्यास ठेवणे. विकली गेल्यास पैसे घेणे.
  • मोटारींच्या कारखान्यास सुट्या भागांचा पुरवठा करणे. मोटार जर तीस दिवसांत तयार होत असेल तर 40 दिवसांनंतर पैसे घेणे.
  • एखादी टॅक्सी कायमची भाडेतत्त्वाने ठरवणे. महिन्याच्या महिन्याला त्याचे पैसे देणे.
  • एखादी सेवा देण्यापूर्वी थोडासा अ‍ॅडव्हान्स घेणे.
  • ईएमआयवर वस्तू घेणे.

थोडक्यात आधी वस्तू किंवा सेवा वापरून घेणे आणि नंतर त्याचा मोबदला देणे यास म्हणतात उधारी करणे. उधारीचा फायदा दोघांनाही म्हणजे उधारी देणार्‍यास तसेच उधारी घेणार्‍यास होतो. उधारी दिल्यामुळे व्यापार वाढतो. अगदी अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे वस्तूची किंमत कमी करूनदेखील जास्त नफा मिळू शकतो. याशिवाय वस्तूची खरेदी वाढल्यामुळे त्या व्यापार्‍याची पत त्याच्या पुरवठादाराकडे वाढते आणि तो अधिकाधिक माल उधारीवरती घेऊ शकतो.

आता आपण उधारी घेणार्‍याकडे येऊ या. उधारीची वस्तू असल्यामुळे ती घेण्यात त्याचे पैसे खर्च होत नाहीत. तो ते पैसे इतर जागी, विपणनासाठी वापरू शकतो आणि त्यामुळे वस्तूची जास्तीत जास्त विक्री करू शकण्याची शक्यता निर्माण होते.

त्यावर ज्याने त्याला उधारी दिली त्याचे कल्याण याने वस्तू यशस्वीपणे विकण्यामध्ये असल्यामुळे, त्याच्या सर्व शुभेच्छा याच्या मागे असतात. एवढेच कशाला, कित्येक वेळा पुरवठादार स्वतःच त्याला ग्राहक मिळवून देतो. कारण यामध्ये त्यांच्या भाग्याची भागीदारी झालेली असते.

उधारीचे व्यवहारातील सगळ्यात चांगले उदाहरण म्हणजे क्रेडिट कार्ड्स. अमेरिकेमध्ये १९४६ साली बिगगिन्स बँकेने पहिले क्रेडिट कार्ड बाजारात आणले. बँकेच्या ठेवीदारांना ते हे कार्ड द्यायचे. ते दाखवून लोक खरेदी करायचे. व्यापारी आपली बिले बँकेस पाठवायचे आणि बँक महिनाअखेर त्यांना पैसे द्यायची. एक महिन्याची उधारी.

या उधारीमुळे व्यापार अनेक पटींनी वाढला आणि अनेक शहरांमध्ये क्रेडिट कार्ड्स येऊ लागली. त्यामुळे एकूणच वस्तूंना मागणी वाढली. व्यापारउदीम वाढला, दुकाने वाढली, पुरवठादार वाढले, कारखाने वाढले, नोकर्‍या वाढल्या, उद्योगधंदे वाढले. अनेकांनी क्रेडिट कार्ड कंपन्यांना गंडा घातला.

त्यांचे पैसे बुडवले, परंतु उलाढाल इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की क्रेडिट कार्ड कंपन्यांनी हे नुकसान हसत हसत पेलले. नफ्यात नुकसान म्हणून. अधिकस्य अधिकं फलं! पण, मघाशी आपण म्हटलेच आहे की, उधारी ही जेवणातील मिठासारखी काम करते.

मीठ जास्त झाले तर अति वाईट-चवीलादेखील आणि प्रकृतीलादेखील. अमेरिकेमध्ये उधारीचा अतिरेक झाला आणि त्यामुळे झाला तो subprime crisis. २००७ ते २०१० या वर्षांमध्ये अमेरिकेतील अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेक बँका बुडाल्या. अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या. अनेक लोक रस्त्यावर आले; नको तेवढी उधारी केल्यामुळे.

उधारी आणि कर्ज यातील ज्योतिषशास्त्रीय फरक

उदाहरण. विकासकडे आंबे काढायची काठी आहे. ती उमेशने आंबे काढण्यासाठी मागितली. त्यानंतर काढलेल्यापैकी २० आंबे विकासला देण्याची बोली केली. दोन दिवसांनंतर त्याने विकासला आंबे आणि काठी परत केली. ही झाली उधारी व परतफेड.

विकासकडे आंबे काढण्याची काठी आहे. ती उमेशने आंबे काढण्यासाठी मागितली. विकासने काठीचे भाडे दिवसाला ५० रुपये सांगितले. उमेशने अभयकडून शंभर रुपये घेतले. ते पैसे देऊन त्याने विकासकडून काठी घेतली. त्या काठीने आंबे काढून बाजारात जाऊन विकले. त्यानंतर ती काठी त्याने विकासला दिली आणि एकशे दहा रुपये त्याने अभयला दिले. हे झाले कर्ज व त्याची परतफेड.

ही अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. उधारी घेताना उधारी तेव्हाच परत झाली असती जेव्हा की, उमेश आंबे काढण्यात यशस्वी झाला असता. कर्जाच्या बाबतीत आंबे मिळाले काय किंवा न मिळाले काय, पैसे तर परत द्यावयाचेच होते.

ऋणकोच्या यशात धनकोची कसलीच भागीदारी, जबाबदारी किंवा कुठलाच फायदा नव्हता. उधारीमध्ये मात्र सगळ्यांचाच फायदा होता. आणि जरी उधारी फसली असती, आंबे मिळाले नसते तरी नुकसान फारसे नव्हते, कारण सगळे वायदे एकमेकांवर अवलंबून होते आणि मुद्दल (काठी) सुरक्षित होती.

ज्योतिषशास्त्रीय भाषेत कर्ज म्हणजे कुंडलीचे बारावे घर आणि उधारी म्हणजे कुंडलीचे सहावे घर. परतीच्या उधारीचा शासक ग्रह आहे मंगल आणि सुरतेच्या उधारीचा शासक ग्रह आहे शनी. मंगल नेहमीच शनीच्या पुढे असावा. तेवढीच उधारी करावी जी सहजी परत करता येईल.

तेवढीच उधारी द्यावी जी परत न आल्यास उद्योगावर फार मोठा परिणाम होणार नाही. एक व्यावहारिक ठोकताळा किंवा सुवर्णमध्य लक्षात घ्या. परतीची (विक्रीची) उधारी नफ्याच्या प्रमाणात करावी आणि सुरतेची (पुरवठ्याची) उधारी उलाढालीच्या प्रमाणात करावी. उधारी ही यशस्वी उद्योगाची एक गुरुकिल्ली आहे. जपून वापरा. सचोटीने वापरा. उत्तम परिणाम नक्कीच मिळतील.

– आनंद घुर्ये
९८२०४८९४१६
(लेखक प्राचीन भारतीय शास्त्र याचे अभ्यासक आहेत.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!