प्रगतिशील उद्योग

सर्जनशीलतेची गुरुकिल्ली तुमच्या हातात

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये इनोव्हेशन घडवून आणायचे आहे? मग ते एकदम सोपे आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाच्या किंवा सिस्टमच्या प्रेमात न पडता फक्त फायनल आऊटपूटवर लक्ष ठेवले की झाले. तुमच्या जवळ असलेले सर्व ज्ञान, माहिती, अन्य संसाधने यांची यादी बनवा.

कोणत्याही शक्यतेला नाकारू नका. थोडीशी जरी चूक किंवा एखादा अर्थ चुकीचा काढला गेला किंवा एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले तर सगळे कष्ट वाया जाऊ शकतात, मार्ग चुकू शकतो. एका सायकल मेकॅनिकने असाच दृष्टिकोन ठेवला म्हणून तो विमान बनवू शकला.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

Samual Lyangle हा अमेरिकेतला मोठा वैज्ञानिक होता. त्याला सरकारने विमान बनवण्याचे सर्व अधिकार दिले. मागेल तेवढा पैसा देऊ केला. अमेरिकेतल्या कोणत्याही प्रयोगशाळेत प्रयोग करण्याची परवानगी दिली. तरीही तो विमान बनवू शकला नाही. त्याच्या आधी राइट बंधूंनी विमान बनवले आणि यशस्वीरीत्या उडवूनही दाखवले.

त्या काळात पेट्रोल इंजिनचा शोध लागला होता; पण तरीही Samual Lyangle स्टीम इंजिनच्या प्रेमात राहिला व त्यावरच प्रयोग करत राहिला. राइट बंधूनी अंतिम उद्दिष्ट लक्षात ठेवले, बुद्धी व मनाची कवाडे उघडी ठेवली. ज्ञात संसाधनाच्या प्रेमात अडकून पडले नाहीत. या त्यांच्या दृष्टिकोनामुळे ते यशस्वी झाले.

स्टीम इंजिनचे वजन जास्त आणि शक्ती कमी, तर पेट्रोल इंजिनचे वजन कमी, पण शक्ती जास्त. हा साधा फरक Lyangle च्या लक्षात आला नाही. याला कारण एकच, तो स्टीम इंजिनच्या प्रेमात होता व नवीन आलेल्या पेट्रोल इंजिन तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केले. Lyangle ला विमान बनवायला जवळजवळ २० लाख रुपये लागले तर राइट बंधूंना फक्त ६४ हजार रुपये लागले. याचाच अर्थ जर तुम्हाला प्रश्न नीट माहिती असेल तर उत्तर सोपे आणि कमी खर्चाचे असते.

The wright flyer

राइट बंधूंनी निसर्गनिर्मित तंत्रज्ञानाचासुद्धा पूर्ण अभ्यास केला. पक्षी वळण घेताना पंखाची टोके वापरतात. त्यांनी पण त्यांच्या विमानांत पंखात alerion वापरून ते साध्य केले. याचाच अर्थ आधी निसर्गात किंवा मानवनिर्मित जगात काय बनले आहे याचा पूर्ण अभ्यास असणे महत्त्वाचे आहे.

नाही तर Samuel Lyangle सारखे भरकटत जायला होईल किंवा लिओनार्डो द विंचीसारखे काळाच्या पुढे असलेले व त्यामुळे प्रत्यक्षात येऊ न शकणारे असे काही तरी बनवत बसाल. लिओनार्डो द विंचीने पाचशे वर्षांपूर्वी विमानाचे स्वप्न बघितले, रेखाटने काढली; पण त्या वेळी यंत्रशास्त्र व इतर तंत्रज्ञान प्रगत झाले नव्हते. म्हणून त्याचे विमान कागदावरच राहिले.

त्यामुळे जगाच्या खूप पुढे असणे चुकीचे नसले तरी त्यातून काही निष्पन्न न होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो व सर्जनशीलतेची ऊर्मी कमी होऊ शकते. तेव्हा काळाच्या खूप पुढे ना राहण्याची काळजी घेणेपण महत्त्वाचे आहे.

The Flying screw and ornithopter by Leonardo Da Vinci.

हे सर्व तुम्ही करत असताना आजूबाजूचे सगळे जण तुमची चेष्टा करतील, पैसे फुकट घालवतोय, असे म्हणतील. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा. जगातले सगळे शोध, सगळी इनोव्हेशन्स अस्तित्वात यायच्या आधी तथाकथित तज्ज्ञांनी हे कसे शक्य नाही याचे ज्ञान पाजळले होते; पण एक लक्षात ठेवा, तज्ज्ञांकडे स्वप्न बघण्याची दृष्टी नसते.

त्यांच्या डोळ्यावर ज्ञात ज्ञानाची झापड असते व इनोव्हेशन किंवा इन्व्हेंशन ही अज्ञानात घेतलेली उडी आहे. त्याकरता धाडस, चिकाटी आणि नवीन जाणून घेण्याची आवड पाहिजे.

एक लक्षात घ्या की, राइट बंधू हे साधे सायकल दुरुस्त करणारे होते, तर Lyangle हा खूप शिकलेला संशोधक होता. तरीही त्याला जे शक्य झाले नाही ते राइट बंधूंनी केले. राइट बंधूंनी पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रयोग करण्यावर भर दिला. त्यांनी एक विंड टनेल बनवले होते, त्यात ते हे सर्व प्रयोग करायचे.

प्रयोग करून बघणे, prototype बनवून बघणे, जगात नवीन काय बनले आहे याकडे डोळ्यावर ज्ञात ज्ञानाची झापड न येऊ देता बघणे, हे जमले की बाकी सर्व सोपे आहे. जे राइट बंधूंना जमले ते तुम्हालाही जमू शकते. बस, चला तर मग, कामाला लागू या. आपल्या कंपनीतील प्रश्न सोडवायला घेऊ या. सोपे आहे ना!

– मनीष पाटील
९३२२५९६२८३


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!