Advertisement
उद्योगोपयोगी

व्यवसायासाठी आवश्यक धोरणे आणि कार्यपद्धती

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


उद्योजकांकडे नुसतीच जिद्द, निश्चय, ध्येय असून चालत नाही, तर योग्य ते डॉक्युमेन्टेशन करण्याची सवय आणि शिस्तसुद्धा असावी लागते. धंदा तेजीत असेल, खूप ऑर्डर्स असतील, पण जर शिस्त नसेल किंवा डॉक्युमेन्टेशन नसेल तर कधीही धोका उदभवू शकतो. या लेखात आपण डॉक्युमेन्टेशन आणि शिस्त यांचे काही प्रकार म्हणजे धोरणे आणि कार्यपद्धती (Policies and Procedures) याबद्दल माहिती घेणार आहोत.

Policy म्हणजे काय?

Policy म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम ज्यांचा संस्थेच्या विविध कार्यांवर आणि कारभारांवर नियंत्रण आणि प्रभाव असतो. Policies या लेखी असाव्यात आणि व्यवस्थापनाने त्यांना अधिकृतपणे मान्यता दिलेली असावी. संस्थेचा दृष्टिकोन, रणनीती, संस्कृती आणि मूल्ये आणि त्यातील दैनंदिन ऑपरेशन दरम्यानचे कनेक्शन सूचीत करतात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

कार्यपद्धती म्हणजे काय?

कार्यपद्धती म्हणजे काहीतरी पूर्ण करण्याचा एक विशिष्ट मार्ग. हा मार्ग सातत्याने आणि पुनरावृत्ती केल्यास अपेक्षित परिणाम मिळतो. या सूचना लेखी स्वरूपात असाव्यात आणि व्यवस्थापनाने त्यांना अधिकृतपणे मान्यता द्यावी.

धोरणे आणि कार्यपद्धती कशी विकसित आणि अंमलात आणता येतील?

  • ज्या काही प्रचलित best practices असतील, त्यांचा अभ्यास करणे आणि आपल्या व्यवसायाचे स्वरूप, त्याचा आकार आणि complexity यानुसार त्याचा मसुदा लिहावा.
  • सर्व संबंधित कर्मचार्‍यांना सामील करून सहभागी दृष्टिकोन वापरा. यामुळे त्यांची सहज स्वीकृती होईल.
  • सर्व धोरणे आणि कार्यपद्धती मसुदा तयार झाल्यावर वरीष्ठ व्यवस्थापनाद्वारे त्यांचे पुनरावलोकन केले गेले आहे याची खात्री करून घ्या.
  • व्यवस्थापनाकडून लेखी मान्यता घ्या आणि सर्व कर्मचार्‍यांना माहिती द्या.
  • सर्व कर्मचार्‍यांना धोरणे व कार्यपद्धती यांचे प्रशिक्षण द्या.
  • धोरणे आणि कार्यपद्धती लागू करा आणि नियमित पुनरावलोकन करा

धोरणे आणि कार्यपद्धती तयार करणे आवश्यक असलेले काही उदाहरणात्मक विभाग :

१) संस्थात्मक नियंत्रण (Organization Control Environment)
२) व्यवसाय नियोजन आणि नियंत्रण (Business Planning and Controlling)
३) विक्री आणि रोख प्राप्ती (Order To Receive)
४) खरेदी (Procurement) आणि त्याचे payment

५) उत्पादन (Production) or ऑपरेशन्स
६) Fixed Assets
७) Inventory Management
८) खाती आणि वित्त (Accounts and Finance)

९) वैधानिक पालन (statutory compliances)
१०) मानव संसाधन (Human Resources) आणि पगार व्यवस्थापन (Payroll Management)
११) प्रशासन
१२) माहिती तंत्रज्ञान

धोरणे आणि कार्यपद्धतीचे काही फायदे

१) भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट होतात.
२) कामात शिस्त तयार होते.
३) निर्णय घेण्याची शक्ती आणि आदेशांची श्रृंखला स्पष्ट होते.
४) कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात मदत होते, तसेच जॉब रोटेशनसुद्धा सहज करता येते.

५) कर्मचारी कामगिरीचे मूल्यमापन करायला सोपे जाते.
६) कार्यपद्धतीत सुधारणेसाठी वाव मिळतो.
७) कायदेविषयक आणि नियामक आवश्यकता पूर्ण करण्यात मदत होते.

निष्कर्ष : धोरणे आणि कार्यपद्धती कामाच्या जागेचे वातावरण, संस्कृती, पद्धती यांचे एक चांगले राजदूत आहेत. जर का व्यवस्थित पालन केले, तर कामात सुसंगतता आणि सुधारणा दोन्ही व्हायला मदत होते.

– सीए. जयदीप बर्वे
9820588298
cajaideepbarve@gmail.com

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!