Advertisement
उद्योगोपयोगी

उद्योजकास अत्यंत महत्त्वाचे आर.टी.पी. विश्लेषण

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


यशस्वी उद्योजकाने निर्णय घेण्यात खूप वेगवान आणि अचूक असणे आवश्यक आहे; पण हे निर्णय गुणवत्ता, आश्वासन, आर्थिक विश्लेषण, उत्पादन आणि ऑपरेशन्स आणि इतर बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते. त्यातील महत्त्वाच्या तीन गोष्टी म्हणजे संशोधन, ट्रेंड्स (ग्राहकाचा कल) आणि खरेदी-विक्रीचा अंदाज (म्हणजे Research, Trends आणि Prediction).

RTP म्हणजे काय आणि त्याचे विश्‍लेषण कसे करावे. Research, Trends आणि Prediction म्हणजे काय हे आपण पहिले समजून घेऊ.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

संशोधन (Research) : संशोधन ही व्यवसायाच्या सर्व क्षेत्रांची तपशीलवार माहिती मिळवण्याची आणि व्यवसायाची विक्री आणि नफा वाढवण्यासाठी अशी माहिती वापरण्याची प्रक्रिया आहे. आपण करत असलेल्या किंवा करू इच्छिणार्‍या व्यवसायाविषयी सर्व उपलब्ध माहिती मिळवणे.

याच माहितीद्वारे आपण आपल्या व्यवसायाचे स्वरूप आणि विक्रीचा मार्ग ठरवू शकता. आता हे संशोधन कसे करायचे? याच्या अनेक पद्धती आहेत; पण त्याची सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे माहितीसंग्रह, सर्वेक्षण, यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती, त्यांच्या व्यवसायातील घटनांचा अभ्यास आणि वेबसाइट्स. यातून आपणास विशिष्ट व्यवसायाच्या पद्धती, प्रक्रिया, जोखमी आणि अपेक्षित समस्या यांची पूर्वकल्पना येते आणि त्यानुसार आपणास पुढील योजना आखता येते.

ट्रेंड्स (Trends) : दिवसेंदिवस व्यवसायाचे स्वरूप बदलत आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ग्राहकाचा कल बदलत चाललाय. हा कल व्यवसायास कधी अनुकूल असतो तर कधी प्रतिकूल. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा व्यवसाय चांगला करण्यासाठी आपल्याला आजचा ट्रेंड जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहेत.

हे जाणून घ्यायची अत्यंत सोपी पद्धत म्हणजे काळासोबत आपण चालले पाहिजे. ते कसे? थीमकडे लक्ष द्या. एक मॅक्रो आणि सूक्ष्म दृष्टिकोन घ्या. आपल्या संकल्पनेबद्दल विचार करा. कोणतेही उत्पादन अमलात आणताना आपला ब्रॅण्ड विचारात घ्या. मोठ्या ट्रेंड आणि ट्रेडी आयटमदरम्यान फरक करा. भूतकाळाकडे लक्ष द्या.

आपले स्वत:चे ट्रेंड करा. आपल्या ग्राहकांशी बोला. आपण जरी विक्री करत असलो तरी खरेदी करताना ग्राहकाला काय अडचणी येतात ते जाणून घ्यावे लागेल आणि त्या पद्धतीने आपल्या पद्धतीत बदलसुद्धा करावेत.

अंदाजपत्रक (Prediction) : व्यवसायात अंदाज फार महत्त्वाचे आहेत. अंदाजपत्रक हे ऐतिहासिक माहितीचा वापर भविष्यातील ट्रेंड्सच्या दिशेने निर्धारित करण्यात येणारे सूचित अनुमान काढण्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळे हे अंदाज काल्पनिक असू नये. ते यथार्थवादी असावे हे वास्तविकतेला धरून असावे.

व्यावसायिकाच्या पद्धती आणि प्रक्रिया ह्या अंदाजावरच अवलंबून असते. आपल्या व्यवसायाच्या पद्धती, प्रक्रिया, जोखमी आणि अपेक्षित समस्या याचा अंदाज आपल्याला असणे खूप आवश्यक आहे. याकरिता थोडी आकडेवारी करावी लागेल.

हे पत्रक खर्चांपासून प्रारंभ करा. त्यानंतर निश्चित खर्च/ओव्हरहेड, कमी-जास्त होणारी किंमत, पुराणमतवादी केस आणि आक्रमक केस दोन्ही वापरून अंदाज कमाई, अनुमान आणि प्रमाण ध्यानात घ्या. एकूण मार्जिन, ऑपरेटिंग नफा मार्जिन, प्रत्येक क्लायंटची एकूण संख्या, या सर्व गोष्टींचे गणित मांडा. खूप चांगला परिणाम दिसून येईल आणि व्यवसायात आत्मविश्वास वाढण्यास नक्कीच मदत होईल.

संशोधन, ट्रेंड्स आणि अंदाज या गोष्टी मांडताना कोणते घटक विचारात घ्यायचे हे खूप महत्त्वाचे आहेत. हे विश्लेषण जर कठीण वाटत असेल तर फक्त खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतात का हे बघा.

 • माझा व्यवसाय मी कसा, कुठे, कधी व कोणाबरोबर करणार?
 • या व्यवसायात उतरण्याचा माझा प्राथमिक हेतू काय?
 • हाच व्यवसाय आणखीन कोण कोण करतोय? (भौगोलिक क्षेत्रसुद्धा विचारात घ्या.)
 • या क्षेत्रातील सर्वात मोठा आणि सर्वात लहान व्यावसायिक कोण? आणि त्यांची वार्षिक उलाढाल किती आहे?
 • सर्वात मोठा आणि सर्वात लहान व्यावसायिक यांची प्रक्रिया व पद्धती काय आहे?
 • तुमच्या दृष्टिकोनातून दुसर्‍या व्यावसायिकाची प्रक्रिया व पद्धती कशी आहे? चांगली की वाईट? (तुलनात्मक विश्लेषण करावे.)
 • या क्षेत्रातील उद्योजकांच्या भेटीगाठी आपण घेतल्या का?
 • या व्यवसायातील ठळक घडामोडींचा अभ्यास केलाय का?
 • आपल्या व्यवसायाचे स्वरूप काय असेल?
 • आपला व्यवसाय कालानुरूप आहे का?
 • आपण ग्राहकाची गरज ओळखली आहे का? त्यांच्या अडचणी-समास्या अभ्यासल्या आहेत का? असल्यास त्यांची यादी करा.
 • ग्राहकांचे वर्गीकरण केले आहे का?
 • नवीन तंत्रज्ञान आपण आत्मसात केले आहे का? कोणते? केले नसल्यास का नाही?
 • नवनवीन साधने आणि तंत्र आपण वापरतो का? कोणते? त्याचे फायदे?
 • माझ्या व्यवसायाला लागणारा एका वर्षाचा प्रास्ताविक खर्च किती? (उत्पन्न वा नफा धरू नये. निव्वळ खर्च मांडावा).
 • यातील किती खर्च उत्पादनव्यतिरिक्त आहे? जसे जाहिरात, विपणन, वाहतूक, कायदेशीर शुल्क वा इतर.
 • गेल्या काही वर्षांतील कमी-जास्त होणारी किंमत आणि उत्पादन खर्च याची कल्पना आहे काय? याची आकडेवारी आहे का?
 • आपल्या क्षेत्रातील संभाव्य ग्राहक व प्रतिस्पर्धी यांची संख्या किती?
 • उत्पादन खर्च, संभाव्य उत्पन्न यावरून एकूण मार्जिन आपण ध्यानात घेतली आहे का?
 • उत्पादन खर्च, संभाव्य उत्पन्न यात तूट असल्यास काय उपाययोजना कराल?

उत्तरे जर सकारात्मक मिळाली तर हे विश्लेषण पूर्ण झालेच म्हणून समजा. कारण या विश्लेषणाची सगळी धडपड या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याकरताच आहेत. पुन्हा एकदा नवीन उत्साहाने प्रयत्न करा. यश तुमचेच आहे.

– मयूर देशपांडे
७७२१००५०५१


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!