ऑनलाइन मार्केटिंगमध्ये उपयुक्त असते शॉर्ट लिंक

शॉर्ट लिंक म्हणजे काय?

इंटरनेटवरील कोणत्याही पानाचा एक वेब ऍड्रेस असतो. यालाच लिंक किंवा यु.आर.एल. म्हणतात. आपण एखाद्या वेबसाईटची लिंक बघितली तर ती खूप साधी आणि सोपी असते.

जसं amazon.com, udyojak.org, इत्यादी. पण आपण जसजसे एखाद्या वेबसाईटवरील वेगवेगळ्या लेखांना, प्रॉडक्ट्सना भेट देतो तसतशी ती लिंक मोठी होत जाते. त्यामुळे शॉर्ट लिंक करणे म्हणजे एखाद्या लिंकला छोट्या लिंकमध्ये रुपपांतरित करणे.

शॉर्ट लिंक करण्याचे फायदे काय?

१. लहान लिंक- आपण एखादी लिंक जेव्हा मेसेज मार्फत लोकांना पाठवत असतो तेव्हा मोठी लिंक मेसेज मध्ये चांगली दिसत नाही आणि शिवाय ती लिंक बरीच जागा घेते. तसंच नको असलेली माहितीसुद्धा त्या लिंकमध्ये दिसते. त्यामुळे त्या ऐवजी शॉर्टलिंक केली तर ती सुटसुटीत होतेच शिवाय ती जागा सुद्धा कमी घेते.

२. आपल्याला हवे ते नाव दाखवणे-  शॉर्ट लिंक करताना त्या लिंकचे नाव आपण ठरवू शकतो. त्यामुळे समजा आपण दिवाळी साठी एखादा सेल ठेवला असेल तर आपल्या प्रॉडक्टची भलीमोठी लिंक देण्यापेक्षा / DiwaliSale किंवा / DiwaliSpecialOffer असे नाव देऊ शकतो ज्याने नसत लोक त्या लिंक वर क्लिक करतील.

३. लिंक ट्रॅकिंग – लिंक लहान करून देणारी जवळपास सगळीच टूल्स त्या लिंकवर कोणत्या ठिकाणाहून लोक आले, किती लोक आले, कोणत्या वेळी आले अशी सगळी माहिती आपल्याला देतात. यावरून आपण कुठे कुठे लिंक शेअर केली होती आणि त्यातून किती लोकांनी लिंक क्लिक केली हे समजते. याचा अभ्यास करून आपण लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकतो.

आपण कोणत्या लिंकची शॉर्ट लिंक बनवत आहोत, कशासाठी बनवत आहोत यानुसार याचे इतर अनेक फायदे आपल्याला दिसून येतात.

शॉर्ट लिंक कशी तयार करतात?

शॉर्ट लिंक तयार करण्यासाठी अनेक ऑनलाईन टूल्स आणि ऍप्स आहेत. त्यातील काही फ्री टूल्स ही आहेत :

  • बिटली (https://app.bitly.com/)
  • शॉर्ट यु.आर.एल (https://www.shorturl.at/)
  • रीब्रान्डली (https://www.rebrandly.com/)

– शैवाली बर्वे 
shaivalibarve@gmail.com

 

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

    View all posts
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?