प्रगतिशील उद्योग

उद्योजकतेत संतसेवेचे महत्त्व

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रत्येक गोष्ट घडण्यामागे कोणती ना कोणती गोष्ट कारणीभूत असते. ही सर्व भारतीय प्राचीन शास्त्रे शिकण्यामागेही एक गोष्ट कारणीभूत होती. माझ्या आयुष्यात उद्भवलेल्या सर्व अडथळ्यांची उत्तरे मला या सर्व भारतीय प्राचीन शास्त्रांमधून मिळाली आणि सरतेशेवटी निष्कर्ष असा निघाला की, आपल्या त्रासातून सुटका होण्यासाठी ‘संत सेवे’शिवाय कोणताही पर्याय नाही.

श्री गजानन महाराज चरित्र वाचत गेलो, शेगावला जाऊ लागलो आणि बघता बघता गजानन महाराजांनी माझे आयुष्यच बदलून टाकले. प्रपंचरूपी गाडीची चार चाके; शिक्षण, व्यवसाय, विवाह आणि आरोग्य. प्रपंचरूपी गाडी भरधाव वेगाने पळण्यासाठी ही चार चाके सुस्थितीत असणे आवश्यक आहे; पण प्रारब्ध भोगरूपी रस्त्यावरून प्रवास करत असताना अचानक आलेल्या खड्ड्यांमुळे यापैकी एक चाक किंवा चारही चाके ‘पंक्‍चर’ होतात आणि आपली प्रपंचरूपी गाडी तिथेच अडकून पडते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

आपल्या आयुष्यात नेमके काय चाललेय हेच कळेनासे होते. प्रत्येक वेळेला हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. चूक आपली नसते; पण नुकसान मात्र आपल्यालाच सहन करावे लागते. जगात प्रत्येक माणूस हा सामान्य म्हणूनच जन्माला येतो आणि जगातील ९५ टक्के लोक सामान्य आयुष्य जगूनच या जगाचा निरोप घेतात. संशोधन असे सांगते की, जगातील ५ टक्के लोकच खर्‍या अर्थाने असामान्य आयुष्य जगतात.

मध्यंतरी माझ्या असे वाचनात आले की, स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झुकरबर्ग भारतात येऊन देवळात बसून प्रेरणा घेऊन जातात आणि आपल्या आयुष्यात उत्कृष्ट कामगिरी करतात. यावरून आपण सर्वांनी बोध घ्यावा असे मला वाटते. सामान्य व्यक्तिमत्त्वाचे असामान्य व्यक्तिमत्त्वात रूपांतर करण्याचे सामर्थ्य फक्त अध्यात्मात आहे. आयुष्यात विलक्षण, अप्रतिम अशी एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर संतसेवेला पर्याय नाही.

तुम्हां आम्हां कारणे।
जे का धाडिले ईशानें।
तेच आहे आपणां करणे।
निरालसपणें भूमिवरी।
अ. ६/७५।

(संदर्भ – श्री. गजानन विजय)

वरील श्‍लोकातून गजानन महाराज आपणास आपल्या आयुष्यातील ध्येयाची जाणीव करून देत आहेत. आपल्याला परमेश्‍वराने ज्या कामासाठी पृथ्वीवर पाठवले आहे तेच काम आपल्याला आयुष्याच्या शेवटपर्यंत निरालसपणे करणे आवश्यक आहे. आता आपल्याला नेमके कोणते काम करायचे आहे हे ओळखण्यासाठी भारतीय प्राचीन शास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्राची मदत घेणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्राची मदत घेऊन तुम्ही स्वत:ला ओळखणे अपेक्षित आहे. स्वत:ची पत्रिका न बघता स्वत:ला कसे ओळखायचे हे आपण पुढील तक्त्याद्वारे पाहू –

  • रवी Administration
  • मंगळ Leadership
  • बुध Practical
  • गुरू Counsellor
  • चंद्र Emotional
  • शुक्र Creative / Innovative
  • शनी Critic
  • हर्षल Out of the box mentality
  • नेपच्यून Intuition
  • फ्लुटो Networking

मित्रांनो, प्रत्येक ग्रहाचा एक विशिष्ट गुण सांगितला आहे. तेव्हा तुमच्यामध्ये कोणते कोणते गुण आहेत हे एव्हाना तुमचे तुम्हाला समजले असेलच.

श्री गजानन महाराज

तुझी कृपा झाल्या पाही।
तो सर्वदा होतो विजयी।
जें जें इच्छील तें तें नेई।
काम आपलें तडीला।
अ ७/३।

(संदर्भ – श्री. गजानन विजय)

आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचेय. त्यासाठी प्रत्येक जण मेहनत करतच असतो आणि ते आवश्यकच आहे. मेहनतीशिवाय यश मिळणे अशक्यच आहे; पण मेहनतीबरोबर तुमच्या आराध्य देवतेचे आणि कुलदेवतेचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणे हेदेखील तेवढेच आवश्यक आहे.

जमीन नांगरणे हे शेतकर्‍याच्या हातात आहे; पण योग्य वेळी पाऊस पाडणे हे फक्त परमेश्‍वराच्या हातात आहे.

संतांनी हातीं धरिलें ज्याला।
तो पाहुणा हरीचा।
अ ११/१२०।

(संदर्भ – श्री. गजानन विजय)

किती सुंदर उपमा दिली आहे. संतसेवेचे महत्त्व किती अगाध आहे हे वरील श्‍लोकातून आपणास समजते. संतांच्या कृपाशीर्वादामुळे Complete Life Transformation होते. म्हणजे नेमके काय घडते; असा प्रश्‍न तुम्हाला पडला असावा. कसे आहे, We struggle and work hard for what we desire to have but because of blessings of saints in abundance, we get what we deserve.

उदा. आपण मुंबईहून नागपूरला स्लिपर डब्यातून प्रवासाला निघालोय, पण गाडीत तिकीट निरीक्षकाकडून आपल्याला समजते की, आपल्याला वातानुकुलित डब्यामध्ये ‘Upgrade’ केलं आहे. यालाच म्हणतात, संतकृपा! आपल्या अपरोक्ष अनपेक्षितपणे आपल्या आयुष्याचे झालेले Upgradation! प्रत्येक माणूस हा जगात सामान्य म्हणूनच जन्माला येतो; पण संतकृपेमुळे अनपेक्षितपणे आपल्याला ‘असामान्य’ आयुष्य जगण्याची संधी मिळते.

एकदा तरी वर्षातून।
घ्यावें गजाननाचें दर्शन।
एकदा तरी पारायण।
करा गजानन चरित्राचें।
अ. २१/२१६।

(संदर्भ – श्री. गजानन विजय)

संतसेवा कशी करावी?

त्यासाठी गजानन महाराज आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. कमीत कमी वर्षातून एकदा तरी शेगावला जाऊन गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यावे. तिकडे पारायण हॉलमध्ये बसून मनातील इच्छा व्यक्त करून हजार-दोन हजार वेळा ‘गण गण गणांत बोते’ या मंत्राचे नामस्मरण करावे.

आरतीला उपस्थित रहावे. तसेच महाप्रसादाचे सेवन करावे. त्याचबरोबर संतकविश्री दासगणू महाराजकृत ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे दशमी, एकादशी, द्वादशीला एका जागी आसनस्थ होऊन पारायण करावे. केवळ या दोन गोष्टी केल्यामुळे संतकृपेची प्रचीती आपल्याला निश्‍चितच येते.

श्री गजानन विजय नामें ग्रंथ।
नौका होवो भाविकांप्रत।
भवसिंधु तरावया।
अ. २१/२५३।

(संदर्भ – श्री. गजानन विजय)

‘श्री गजानन विजय’ या ग्रंथामध्ये माणसाला पडलेल्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर दिलेले आहे. तेव्हा प्रपंचरूपी समुद्रात गटांगळ्या खाण्यापेक्षा गजानन महाराजांचे पाय धरणे, त्यांची सेवा करणे हे समुद्रात बुडत असलेल्या माणसाला नौका मिळण्यासमान आहे.

– डॉ. निखिल डोळस
८०८०२४४४१२


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!