व्यवसाय मोठा होतो तो ‘टीमवर्क’ने

‘टीमवर्क’ म्हणजे एक विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी मिळून त्या ध्येयासाठी झटणार्‍यांचा समूह होय! टीमबरोबर काम करताना सर्व लोकांशी नातेसंबंध जोपासून त्यांच्याकडून आपल्याला हवे असणारे काम त्यांच्या मर्जीनुसार आणि आवडीनुसार करून घेणे म्हणजेच टीमवर्क.

teamwork

T.E.A.M. या शब्दाचा अर्थ…

T = Together
E = Everyone
A = Achieve
M = More


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

आपण आज सांघिक कार्य व स्नेहसंबंध जोपासून कशाप्रकारे चांगले व मोठे काम उभे करू शकतो हे पाहणार आहोत.

टीमवर्कचे उत्तम उदाहरण म्हणजे गोविंदा-दहीहंडी यामध्ये एकावर एक थर लावून सर्वात वरच्या थरावरील माणूस दहीहंडी फोडतो. त्या वेळेस हंडी फोडणारा माणूस आपल्याला दिसतो, परंतु त्याला वरपर्यंत जाण्यासाठी मदत करणारे खाली असणारे सहा ते सात थर हे खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्यामुळेच सर्वात वरील माणूस ती हंडी फोडतो.

कोणतंही मोठं कार्य, मोठी संस्था, कंपनी, संघटना आपण पाहतो त्याच्या यशामध्ये संपूर्ण टीमचा मोठा हातभार असतो. त्यामुळेच ती संस्था मोठी होत असते. सहकार क्षेत्र याचे उत्तम उदाहरण आहे, ज्यामुळे अनेक लोक एकत्र येऊन एकमेकांना मदत करून एखादी संस्था, बँक, संघटना चालवतात आणि लाखो लोकांचा त्यामुळे फायदा होतो. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे मुख्य कारण म्हणजे सांघिक कार्य होय.

खो-खो, क्रिकेट, फुटबॉल या खेळांमध्येदेखील टीमवर्कला खूप महत्त्व आहे, हे आपण पाहत आलेले आहोत. टीमवर्कमुळे मोठ्यात मोठं काम सहज शक्य होतं. कोणतेही काम हे संघटन केल्याशिवाय होणे अशक्य जरी असले तरी त्या टीममधील सर्व घटकांनी कोणाचीही वाट न पाहता जर जोर लावून, योग्य नियोजन, सातत्याने कठीण परीश्रम करून काम केल्यास ते निश्चितच पूर्ण होते.

सांघिक काम करताना प्रत्येक टीममध्ये एखादा लीडर असावा लागतो, जो आपल्या टीमकडून काम करून घेत असतो. एखादे कार्य यशस्वी झाल्यानंतर त्याचे श्रेय उत्तम लीडर हा आपल्या टीमला देत असतो. त्यामुळे त्याची टीम नेहमी त्याच्या सोबत राहून पुढील कार्यही चांगल्या प्रकारे पार पाडत असते.

सांघिक कार्य ही संस्थात्मक कामाची मूलभूत गरज आहे. आपल्या टीमकडून चांगल्या प्रकारे काम करून घेण्यासाठी खालील गोष्टी अमलात आणाव्यात.

  • टीममधील व्यक्तीने अन्य सहकार्‍यांबरोबर एकत्रितपणे काम करण्याची कला अवगत करून घ्यायला हवी. टीममध्ये राहून आपले वेगळेपण टिकवणे हेही एक कौशल्य आहे.
  • आपल्या टीममधील लोकांशी समोरासमोर भेटून संवाद साधा किंवा व्हिडीओ कॉल करा. समोरासमोर बोलण्यानं आपण किती सहजतेनं बोलू शकतो हे समजतंच. त्याचबरोबर त्यांच्या प्रतिक्रियादेखील जाणून घेण्याची चांगली संधी मिळते.
  • केवळ स्वत:च्या आवडीच्या नाही तर विविध विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करा. समजा दुसर्‍या विषयांबाबत जास्त माहीत नसेल तर निराश होऊ नका, माहितीसंग्रह वाढवण्यासाठी उत्सुक राहा. दुसर्‍यांकडून नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.
  • लोकांशी चर्चेत सामील व्हा. स्वत:च्या बोलण्याच्या पद्धतीबाबत आत्मविश्वास निर्माण होईल.
  • तुम्ही बोलायला उत्सुक आणि तयार आहात असे तुमच्या वागण्यातून दाखवून द्या. यामुळे दुसर्‍यांना तुमच्याशी बोलणं सोपं जाईल.
Infosys founders
‘इन्फोसिस’ कंपनीची स्थापना केली ती टीम
  • बोलताना नेहेमी समोरच्या व्यक्तीकडे बघून बोला.
  • टीमशी संभाषण सुरू ठेवण्यासाठी त्या संबंधित प्रश्न विचारात राहा.
  • टीमशी संवाद साधणं हे जरी त्रासदायक किंवा कंटाळवाणं वाटलं तरीसुद्धा सहज हार मानू नका. सध्याचे जग हे वेगवान आहे आणि लोकांच्या आठवणीदेखील अल्पकालीन आहेत. त्यामुळे वारंवार टीमबरोबर संवाद करत राहा.
  • टीमबरोबर काम करताना योग्य संवाद साधणं गरजेचं असतं. संवाद साधणं हे एक कौशल्य असून हे कौशल्य विकसित होण्यासाठी बराच कालावधी लागतो.
  • चर्चेदरम्यान आपले मत मांडताना उद्धटपणा आणि आक्रमकपणा यांमधील सीमारेषा धूसर आहे, हे लक्षात ठेवा.
  • आपले म्हणणे अतिशय प्रभावीपणे लिहून द्या. त्यावर टीममधील सहकार्‍यांचा प्रतिसाद कसा आहे याचेही निरीक्षण करा.
  • विशिष्ट कार्ये करण्यासाठी प्रत्येक संस्थेची अनेक संघांमध्ये विभागणी केली जाते.

  • समोरच्यांचे मत ऐकून आपले मत (जर आपण त्यावर ठाम असू तर) बदलू नका.
  • टीममध्ये चर्चा होत असताना तसेच दुसरे लोक बोलत असताना मोबाइल, लॅपटॉप यावर आपली कामे करू नका.
  • राग येणे, संतप्त होणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र, रागावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. रागामुळे आपले खूप मोठे नुकसान होऊ शकते. टीममध्ये काम करत असताना शांतपणे विषय समजून घेणे आणि रागावर नियंत्रण मिळवणे खूप गरजेचे असते.
  • कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी टीमवर्कला सर्वाधिक महत्त्व असते. त्याशिवाय ध्येय गाठता येत नाही.
  • आपण स्वत: म्हणजेच एक टीम आहे असे समजून व प्रत्येक सहकार्‍यांबरोबर स्वत: पुढे होऊन कार्य केल्यास बरोबर असणार्‍यांचाही आत्मविश्वास वाढत असतो.
  • टीममधील इतरांना यश मिळाल्यास त्याचाही आनंद व्यक्त करा. सहकार्‍याला अपयश आल्यास त्याला धीर द्या. त्याचं मनोधैर्य वाढवा.
  • लोकांना प्रोत्साहन द्या, प्रेरणा द्या, प्रशिक्षण द्या, शाबासकी द्या! यामुळे टीममध्ये उत्साहाचे वातावरण तयार होत असते.

– डॉ. संतोष कामेरकर
7303445454

Author

  • डॉ. संतोष कामेरकर हे एक प्रतिथयश उद्योजक, प्रसिद्ध वक्ते व प्रशिक्षक आहेत. त्यांनी स्वतःला शून्यातून उभं करून आज करोडोंमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक नाउमेद तरुणांना प्रेरणा देणारा आहे. संपर्क : 7303445454

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?