व्यापार चिन्ह व त्याचे महत्त्व


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपण जी काही वस्तू किंवा सेवा विकतो त्यावर आपले किंवा आपल्या संस्थेचे नाव आणि चिन्ह असते. या ठरावीक नावाला आणि चिन्हाला व्यापार चिन्ह म्हणतात.

व्यापार चिन्ह नोंदणीचे महत्त्व :

कायदेशीर हक्क : ज्या व्यापार नावाची आणि व्यापार चिन्हांची नोंदणी केली जाते त्यावर आपला कायदेशीर हक्क निर्माण होतो. नोंदणी केल्यामुळे कोणीही दुसरा माणूस त्याच नावाने किंवा चिन्हाने त्याच वस्तू किंवा सेवा त्याच्या नावाने विकू शकत नाही. तसे केल्यास त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई करू शकतो.

बौद्धिक संपदा (Intellectual Property) : व्यापार चिन्ह ही एक बौद्धिक संपदा आहे. आपल्या व्यापाराचे बाजारपेठेत स्थान निर्माण झाले असल्यास आणि त्याआधीच आपण त्याची नोंदणी केली असल्यास, ही बौद्धिक संपदा आपण आपल्या व्यवसायात मालमत्ता म्हणून दाखवू शकतो.

बेकायदेशीर वापरावर प्रतिबंध : बऱ्याचदा व्यापाऱ्यांना अनुभव येतो की, आपण जो माल किंवा सेवा विकतो आहोत त्याच कोणी तरी दुसरा माणूस त्याच नावाने किंवा चिन्हाने बनवून आहे. यामुळे त्यांना बरेच नुकसान सोसावे लागते. जर आपण आपल्या व्यापार चिन्हाची नोंदणी आधीच केली असेल तर अशा बेकायदेशीर वापरावर आपण प्रतिबंध घालू शकतो व कोणी बेकायदेशीर उपयोग केल्यास त्यावर वेळीच योग्य ती कायदेशीर कारवाई करू शकतो.

व्यापार चिन्हांचे खालीलप्रमाणे नोंदणी करता येते :

व्यापाराचे नाव व्यापाराचे चिन्ह व्यापार चिन्हाचा रंग व्यापार चिन्हाचा आवाज वस्तूचा आकार या क्षेत्रात बरीच वर्षे काम केल्यावर मला एक गोष्ट जाणवली, की बरेच लोक आपल्या व्यापार चिन्हाच्या नोंदणीसाठी अर्ज करतात पण यानंतर नोंदणी दाखला मिळेपर्यंत काही कालावधी जातो.

या कालावधीत आपल्या अर्जाचे काय झाले आहे, तो कुठल्या नोंदणीच्या पायरीवर याबाबत लोकांना काहीच माहीत नसते. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेत नक्की काय चालले त्याची त्यांना काहीच कल्पना नसते. बरेच जण याबद्दल अज्ञानी असतात. त्यामुळे मला तुम्हाला सांगायला आवडेल की, व्यापार चिन्ह नोंदणीची माहिती कशी मिळवायची?

नोंदणीची माहिती मिळवण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात :

  • www.ipindia.nic.in या साइटवर जा. त्यामध्ये Trade Mark (व्यापार चिन्ह) या भागामधील related links section मधील Trade Mark Status वर Click करा.
  • Trade Mark Application/Registered Mark भागावर National/IRDI Number भागावर Click करा.
  • Trade Mark Application Number टाकून View Button वर Click करा.

वरील माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या व्यापार चिन्ह नोंदणीची माहिती मिळवू शकतात आणि आपल्या वकिलाला त्यावर प्रश्ना विचारू शकता.

– सचिन तोरसकर
9833609055
(लेखक कंपनी सेक्रेटरी आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?