तुमच्या व्यवसायाची वेबसाइट असण्याचे आहेत इतके फायदे


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


वेबसाइट ही आज प्रत्येक उद्योजकाची गरज झाली आहे. त्याची अनेक कारणं आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आलं आहे आणि त्यामुळे प्रचंड स्पर्धाही वाढली आहे. आपलं प्रॉडक्ट, आपली सेवा, त्याची माहिती ही २४ तास लोकांसाठी उपलब्ध असेल तर उद्योगाला त्याचा फायदाच होतो.

अनेकांना प्रश्‍न पडतो की वेबसाइट म्हणजे काय? याचं सोप्प उत्तर दयायचं झालं तर पुस्तकात जशी वेगवेगळी पानं एकत्र केली जातात व ती एकत्र बांधून त्याचे पुस्तक तयार केले जाते तसेच अनेक वेबपेजस मिळून एक वेबसाईट बनवली जाते.

तुमच्या कंपनीविषयीची माहिती वेगवेगळया माध्यमातून एकत्र जोडली जाते. मजकूर, चित्र, फोटो, आकर्षक रंगसंगती, ध्वनीफित, या सगळयांच्या एकत्रिकरणाने आकर्षक माहिती संकलक वेबसाईट तयार करता येते. तुमच्या कंपनीचं ते एक प्रकारे ब्रोशरच असते.

उद्योजकाची गरज, त्याच्या कल्पना अणि त्याच्याकडे उपलब्ध माहिती अशा अनेक गोष्टींचा विचार करता वेबसाइट ही अगदी एका वेबपेजपासून शेकडो वेबपेजेसची असू शकते.

आजच्या काळात इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार खूप सोपा झाला आहे. उद्योजकाचा या संधीचा फायदा घेऊन स्वतःला जागतिक बाजारपेठेत दार उघडण्यासाठी २४x७ ऑफिस म्हणजे वेबसाइट. म्हणून प्रत्येक कंपनीची, व्यवसायाची वेबसाईट ही असायलाच हवी.

वेबसाइटचे फायदे

ग्राहक वाढ : वेबसाईट जगभरातून कुठूनही, कोणीही, केव्हाही पाहू शकतं. त्यामुळे जर आपली वेबसाईट असेल तर अन्य शहरातून, राज्यातून किंवा देशातूनही आपल्या उत्पादनाला ग्राहक मिळतो. त्यासाठी वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नसते. वेबसाईट असण्याचा खूप मोठा फायदा म्हणजे आपण वेगवेगळया पातळयांवर पैशांची बचत करू शकतो.

रिटार्गेटिंग : तुमच्या वेबसाइटवर एकदा येऊन गेलेल्या म्हणजे तुमच्या वेबसाइटला भेट दिलेल्या लोकांना तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून टार्गेट करू शकता. त्यांना सोशल मीडिया किंवा गुगल इत्यादींवर तुमच्या जाहिराती दाखवू शकता. याला तांत्रिक भाषेत रिटार्गेटिंग म्हटले जाते.

ऑनलाइन विक्री : तुम्ही वेबसाइटवर स्वतःचे शॉप निर्माण करून तुमची प्रॉडक्ट्स व सेवा त्याद्वारे विकू शकता. तुमच्या वेबसाइटला एकदा भेट दिलेल्या प्रेक्षकांना तुम्ही रिटार्गेट करून तुमची प्रॉडक्ट्स किंवा सेवा दाखवू शकता.

कमी खर्चिक : प्रिंट अथवा टेलिव्हिजनवर आपल्या उत्पादन अथवा सेवेची जाहिरात करायची असल्यास आपल्याला प्रत्येक ओळ अथवा सेकंदानुसार अमाप पैसे मोजावे लागतात. याउलट वेबसाईटवर अत्यल्प खर्चात तुम्हाला जाहिरात करता येते आणि जिचा प्रसारही अन्य माध्यमांपेक्षा जलद गतीने होतो.

ब्रॅण्ड इमेज : इंटरनेट हे एक असं माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची तुम्हाला हवी तशी इमेज तयार करू शकता. प्रोफेशनल वेबसाईट बनवून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यत स्वतःची ब्रॅण्ड इमेज तयार करू शकता. तुमचा व्यवसाय किती छोटा आहे याच्याशी काही संबंध नसतो. तुम्ही वेबद्वारे स्वतःचा ब्रॅण्ड तयार करता.

एसइओसाठी उपयुक्त : सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजेच एसइओ द्वारे गुगल किंवा अन्य सर्च इंजिनवर तुमच्या व्यवसायाचे स्थान निर्माण करणे. लोक सर्च इंजिनवर वेगवेगळ्या गोष्टी शोधात असतात, त्यात तुमची प्रॉडक्ट्स किंवा सेवा याबद्दल काही असेल तर त्यांना तुमची माहिती मिळायला हवी. हे काम तुमची वेबसाइट करू शकते.

तुम्ही जेव्हा ऑनलाइन व्यवसाय करता, त्यावेळी जास्त मनुष्यबळाची गरज लागत नाही. तसेच साधनसंपत्तीसुद्धा कमी लागते. तुम्ही तुमच्या ग्राहकाला सर्व गोष्टी एकाच जागी उपलब्ध करून देत असल्यामूळे इतर गोष्टीसांठी लागणारा खर्चही कमी होतो.

तुमच्या ग्राहकाला समाधानकारक सेवा देण्यासाठी वेबसाईट खूप मोठी भुमिका पार पाडते. वेबसाईटच्या माध्यमाद्वारे तुम्ही ग्राहकाला तात्काळ ऑनलाइन मदत करू शकता. आपल्या उत्पादन अथवा सेवेविषयी ग्राहकांकडून सूचना, बदल, सुधारणाविषयक माहिती देऊ आणि घेऊ शकता.

तुम्ही रिअल इस्टेट एजंट आहात किंवा तुमचा बांधकाम व्यवसाय असेल अथवा ब्युटी पार्लर असो तुम्ही तुमचं काम इतरांना पाहण्यासाठी तुमच्या वेबसाईटवर पोर्टफोलिओ तयार करू शकता. एखादयाला तुमचे काम पाहायचं असेल तर तुमच्या वेबसाईटवर तो ग्राहक ते लगेच पाहू शकतो.

– शैलेश राजपूत

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?