Advertisement
उद्योगसंधी

Affiliate Marketing (भाग १)

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रकार : पूर्ण ऑनलाईन
कॉम्प्युटरचे ज्ञान : मध्यम
गुंतवणूक : नाही
शिकून कमवण्यासाठी वेळ : १-६ आठवडे

मार्केटिंग, विक्री करण्यामध्ये पैसे आहेत. आपण बरीच जाहिरात, प्रसार करून आपला ऑनलाईन Affiliate Marketing व्यवसाय करून उत्पन्न मिळवू शकतो. तो वाढवण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ देण्याची आणि प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

Affiliate Marketing ही एक ऑनलाईन विक्रीची पद्धत आहे, ज्यात कंपनी ऑनलाईन विक्रेत्यामर्फत प्रसार, प्रचार घडवून, उत्पादनाची विक्री करते. जगभरात हजारो Affiliate अशा कंपन्यांची विक्री करतात आणि कमीशन मिळवतात. प्रत्येक ग्राहक हा Affiliate च्या स्वतःच्या प्रसार, प्रचारातून आणला जातो.

Affiliate Marketing मधून तुम्ही इतर लोकांच्या (कंपनीच्या) उत्पादनास प्रसिद्धी देऊन त्याची विक्री करता आणि कमीशन कमावता. त्यासाठी प्रथम तुम्हाला त्या कंपनीचे Affiliate म्हणून नोदणी करायची असते. त्यावेळी तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर, ई-मेल एवढीच सामान्य माहिती द्यायची असते.

नंतर, तुम्ही त्याच वेबसाईट असलेल्या त्यांच्या उत्पादनाचा अभ्यास करून, त्याचा प्रसार, प्रचार कुठे, कसा करायचा ते ठरवायचे. ज्या उत्पादनाचा आपण प्रसार करू इच्छिता, त्याची affiliate लिंक बनवण्याचे एक बटण त्याच ठिकाणी असते, ते वापरून मिळणारी लिंक, ही तुमची त्या प्रॉडक्टची affiliate लिंक असते, ती कॉपी करून ठेवावी.

आपण केवळ आपल्याद्वारे वापरल्या जाणार्‍या affiliate कोडसह एक विशेष affiliate लिंक तयार करून, ती वापरून त्या उत्पादनास ऑनलाइन प्रसिद्धी द्यायची असते. जर कोणी तुमची लिंक वापरून ते उत्पादन किंवा सेवा विकत घेतले, तर ती कंपनी त्यांच्या प्रणालीद्वारे तुम्हाला कमीशन देते. हे सर्व काम ऑनलाईन सिस्टिमद्वारे होते. तुम्हाला तुमचे कमिशनचे पैसे बँकेत ऑनलाईन ट्रान्स्फरच्या मार्फत मिळतात किंवा Paypal खात्यात मिळतात.

आपण आपल्या छंद किंवा आवडत्या विषयासह, येथे कौशल्यासह कार्य करू शकता, कारण ते करताना आपण आपले सर्वोत्तम देऊ शकता. असे विषय अन्न पदार्थ, प्रवास, वाचन, वित्त, विपणन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, खेळ, राजकारण, आरोग्य, व्यापार आणि गुंतवणूक, साहित्य, तत्त्वज्ञान किंवा काहीही असू शकतात.

तुमची आवड, ज्ञान, अनुभव ह्याप्रमाणे कंपनी, उत्पादन, पुस्तक, सॉफ्टवेअर, कोर्सेस किंवा सेवा इ. निवडा आणि त्यासंबंधी मजकूर साहित्य, लेख, जाहिराती, वैशिष्ट्य यादी, तिचे फायदे, प्रतिमा, व्हिडिओ इत्यादी तयार करा आणि त्यांना इंटरनेटवर ठेवा.

आपल्या Affiliate लिंकची जाहिरात, प्रसार विविध पद्धतींनी करा आणि त्यामुळे कोणाशीही न भेटता किंवा बोलल्याशिवाय आपण जगभर, ते उत्पादन विकू शकता. विक्री झाल्यावर, ग्राहकाला बिल देणे, त्याच्याकडून किंमत घेणे, उत्पादनाचे वितरण वगैरेची काळजी कंपनीचं घेईल आणि आपल्याला आपले कमिशन मिळेल. ह्याचा सर्व हिशोब तुमच्या Affiliate खात्यात तुम्हाला मिळतो.

Affiliate Marketing कसे करावे?

तुम्हाला योग्य वाटेल ते उत्पादन/सेवा ठरवा, निवडा. उदा. तुम्हाला पदार्थ/ पाक कृतीची आवड असेल तर तुम्ही त्याविषयी पुस्तके, उत्पादने विकू शकता. तुम्हाला क्रीडा, प्रवास ह्याची आवड असेल, तर तुम्ही त्यातील प्रॉडक्ट, कोर्सेस, सहली, गेम वगैरे विकू शकता. ते विकणारी कंपनी निवडा. जसे की Clickbank, Amazon, फ्लिपकार्ट, BigRock, DGMINDIA, Ayurvedclinic इत्यादी.

प्रसार, प्रचार साहित्य/Affiliate लिंक तयार करा. बरीचशी माहिती त्याच वेबसाईट वर असते. त्याशिवाय, त्या प्रॉडक्टचे उपयोग, फायदे, वैशिष्टे ह्याचे वर्णन तुम्ही स्वतःही लिहू शकता. प्रोडक्टच्या माहितीसह, आपल्या लिंकची भरपूर ऑनलाईन जाहिरात करा.

Affiliate Marketing चे फायदे

  • आपले स्वतःचे उत्पादन असण्याची आवश्यकता नाही.
  • कोणतेही उत्पादन खरेदी करून त्याचा साठा करायचा नाही.
  • ग्राहकाकडून पैसे घेणे आणि वितरणाची काळजी कंपनी घेते.
  • कोणतीही गुंतवणूक नाही.
  • कोणत्याही कंपनीची, कितीही उत्पादने विक्री करा, परंतु, प्रत्येकाच्या भरपूर प्रचाराचे काम करावे लागते, हे लक्षात ठेवा.
  • प्रसार, विक्री जगभर करू शकता, ती होऊ शकते, तेही २४ x ७ x ३६५.
  • सर्व काम ऑनलाईन असते, त्यामुळे कोणाशी बोलायचे नाही आणि भेटायचे नाही, तुम्ही ग्राहकाला किंवा ग्राहक तुम्हाला ओळखण्याची गरज नसते.

Affiliate Marketing प्रसार पद्धती

  • आपला ब्लॉग, वेबसाइट तयार करा.
  • सोशल नेटवर्क, लेख लिहिणे आणि प्रसार करणे.
  • प्रॉडक्टसंबंधी व्हिडिओ तयार करा.
  • संबंधित ग्रुपमध्ये सामील व्हा.
  • ई-मेल यादी तयार करा आणि त्यातर्फे प्रसार करा.
  • Classified जाहिराती ऑनलाईन पोस्ट करा

बर्‍याच कल्पना, उत्पादने, प्रोग्रॅम, वेबसाइट आहेत, ज्यांच्याबरोबर आपण काम करू शकता, पण गोंधळ होऊ देऊ नका. एक-दोन कल्पना/उत्पादने निवडा, त्यांच्यासह पूर्णपणे कार्य करा, विविध पद्धतींनी प्रसार, प्रचार करा, विक्री करा, अनुभव घ्या आणि नंतर बर्‍याच उत्पादनांसाठी हीच पद्धत वापरून काम करा. ते सोपे होईल आणि असे तुम्ही कितीही कंपन्या आणि प्रॉडक्टसाठी करू शकता.

Affiliate Marketing कसे करावे त्यासाठी काही मार्गदर्शक लिंक :

(गूगल शोध वरून अधिक माहिती मिळवू शकता)

Clickbank: https://youtu.be/Fu9HketvgoQ
Amazon: https://youtu.be/yTR4Khe0sqk
Flipkart: https://youtu.be/hXN8sGsXfIs
Five programs Intro: https://youtu.be/_R5WuTh3WYc

ह्या विषयाकडे गंभीरतेने बघून, तुमचा वेळ ह्यामध्ये द्या. उत्पादनविषयक साहित्यनिर्मिती, लिखाण, प्रचार ह्याचा चांगला सराव करा. ह्यात एकदा केलेली मेहेनत, पुढे सतत भरपूर उत्पन्न देऊ शकते.

Affiliate Marketing (भाग २)

Affiliate Marketing मुळे एक प्रचंड मोठे शक्यतांचे दालन तुमच्या समोर उघडले आहे, शक्यता प्रत्यक्षात आणण्याचे मात्र तुमच्या हातात आहे.

– सतीश रानडे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!