स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
केंद्रीय लघुउद्योग (MSME) मंत्रालयाने लघुउद्योजकांसाठी विद्यमान कार्यरत असलेली क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस (CGTMSE) या योजनेअंतर्गत लघुउद्योजकांना मिळू शकणाऱ्या कर्जाची मर्यादा १ एप्रिल २०२३ पासून २ कोटींवरून वाढवून ५ कोटी करण्यात आली आहे.
२०२३-२४ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी लघुउद्योग (MSME) मंत्रालयाने केली आहे. सर्व बँका आणि वित्तसंस्था, ज्या CGTMSE योजनेद्वारे कर्जवाटप करतात त्यांना अधिसूचना जारी करून याची माहिती देण्यात आली आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
CGTMSE योजना काय आहे?
सूक्ष्म आणि लघू उद्योजकांना वित्तपुरवठा करण्यासाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय आणि लघुउद्योग विकास बँक (सिडबी) यांनी एकत्र येऊन “Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises’ (CGTMSE) या न्यासाची स्थापना केली. सूक्ष्म व लघू उद्योगांना तारण राहणे हेच या न्यासाचे मुख्य काम आहे. २००६ पासून ही योजना अस्तित्वात आहे.
पहिल्या पिढीतील उद्योजकांना आपली उद्योजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. त्यांची ही गरज बँक वा वित्तसंस्थांकडून कर्जरूपी भांडवल उभे केल्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मात्र बँक वा अन्य वित्तसंस्था या तारण वा जामीन मिळाल्याशिवाय कर्ज देत नाहीत.
अशावेळी CGTMSE योजनेअंतर्गत हा न्यास त्या बँक वा वित्तसंस्थेला तारण म्हणून राहतो. सुरुवातीला CGTMSE योजनेद्वारे १ कोटी पर्यंत कर्ज विनातारण देण्याची तरतूद होती. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर ही मर्यादा २ कोटी करण्यात आली. आता त्यात वाढ करून ती ५ कोटीपर्यंत करण्यात आली आहे.
महिला उद्योजक आणि पूर्वोत्तर राज्यांतील उद्योजकांसाठी या योजनेत विशेष तरतुदी आहेत. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नवीन वा सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म व लघु उद्योजक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
CGTMSE योजना ही देशभरातील शंभरहून अधिक बँक वा वित्तसंस्थांमध्ये उपलब्ध आहे. या संस्थांची सूची खाली जोडत आहे. या सूचीपैकी आपल्या जवळच्या बँक वा वित्तसंस्थेत आपल्याला प्रक्रिया व अन्य गोष्टींबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.
योजनेच्या सत्यतेबाबत पुरावा म्हणून भारत सरकारच्या संकेतस्थळाची लिंक खाली जोडत आहे. अधिक माहितीसाठी Toll Free No. : 1800222659/ (022) – 6143 7805 यावर संपर्क करू शकता.
CGTMSE योजना उपलब्ध असलेल्या बँक
स्टेट बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ इंडिया
अॅक्सिस बँक
पंजाब नॅशनल बँक
पंजाब अॅड सिंध बँक
कॅनरा बँक
स्टेंट्रल बँक ऑफ इंडिया
स्मॉल इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया
स्टॅण्डर्ड चार्टड बँक
डॉईश बँक
डेव्हलपमेंट क्रेडिट बँक
एर्क्स्पोट-इर्म्पोट बँक ऑफ इंडिया
एचडीएफसी बँक
आयसीआयसी बँक
आयडीबीआय बँक
फेडरल बँक
इंडियन बँक
रत्नाकर बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
कोटक महिंद्रा बँक
येस बँक
महाराष्ट्र ग्रामीण बँक
अलाहाबाद युपी ग्रामीण बँक
आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक
नैनिताल-अलमोरा क्षेत्रीय ग्रामीण बँक
आंध्र प्रदेश स्टेट फायनॅन्शियल कॉर्पोरेशन
नर्मदा माळवा ग्रामीण बँक
आंध्र प्रगती ग्रामीण बँक
नॅशनल स्मॉल इंडस्ट्रिज कॉर्पोरेशन
आर्यवर्त ग्रामीण बँक
लिलांचल ग्राम्य बँक
आसाम ग्रामीण विकास बँक
नॉर्थ-ईस्टर्न डेव्हलपमेंट फायनॅन्शियल कार्पोरेशन
नॉर्थ मलबार ग्रामीण बँक
बैतरनी ग्रामीण बँक
बलिया इटावा ग्रामीण बँक
पल्लवन ग्रामीण बँक
बांगीया ग्रामीण विकास बँक
पांड्यन ग्राम्य बँक
बँक ऑफ बरहान अॅण्ड कुवेत
पर्वतीय ग्राम्य बँक
प्रगती ग्रामीण बँक
प्रथम बँक
पुदुवयी भारतीआर ग्राम्य बँक
बारक्लेस बँक
बडोदा गुजरात ग्रामीण बँक
पंजाब ग्रामीण बँक
बडोदा राजस्थान ग्रामीण बँक
बडोदा उत्तर प्रदेश ग्रामीण बँक
पूर्वांचल ग्रामीण बँक
राजस्थान ग्रामीण बँक
बिहार क्षेत्रीय ग्रामीण बँक
रेवा सिद्धी ग्रामीण बँक
ॠषीकुल्य ग्राम्य बँक
कॅथलिक सिरीयन बँक
समस्तीपूर क्षेत्रीय ग्रामीण बँक
कावेरी कल्पतरू बँक
सप्तगिरी ग्रामीण बँक
सर्व युपी ग्रामीण बँक
चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक
सातपुडा नर्मदा क्षेत्रीय ग्रामीण बँक
छत्तीसगड ग्रामीण बँक
सौराष्ट्र ग्रामीण बँक
चिकमंगलुर-कोडागू ग्रामीण बँक
शारदा ग्रामीण बँक
सिटी युनियन बँक
श्रेयस ग्रामीण बँक
डेक्कन ग्रामीण बँक
साऊथ मलबार ग्रामीण बँक
दिल्ली फायनॅन्शियल कॉर्पोरेशन
दुर्ग राजानंदगाव ग्रामीण बँक
गुडगाव ग्रामीण बँक
सूरगुजा क्षेत्रीय ग्रामीण बँक
हडोती क्षेत्रीय ग्रामीण बँक
सतलज ग्रामीण बँक
हरियाणा ग्रामीण बँक
तामिळनाडू मर्कलटाइल बँक
जम्मू अॅण्ड काश्मीर बँक
करूर व्यासा बँक
नैनिताल बँक
आयएनजी व्यास्या बँक
जयपुर थर ग्रामीण बँक
साऊथ इंडियन बँक
हिमाचल ग्रामीण बँक
तामिळनाडू इन्डस्ट्रियल कॉर्पोरेशन
जम्मु अॅण्ड काश्मीर डेव्हलपमेंट फायनॅन्शियल कार्पोरेशन
त्रिपुरा ग्रामीण बँक
जम्मु अॅण्ड काश्मीर ग्रामीण बँक
त्रिवेणी क्षेत्रीय ग्रामीण बँक
झारखंड ग्रामीण बँक
कर्नाटका बँक
कर्नाटका विकास ग्रामीण बँक
काशी गोमती संयुक्त ग्रामीण बँक
केरळा फायनॅन्शियल बँक
कृष्ण ग्रामीण बँक
लक्ष्मी विलास बँक
लंगपी देहंगी रुरल बँक
मध्य भारत ग्रामीण बँक
मध्य बिहार ग्रामीण बँक
महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक
माळवा ग्रामीण बँक
वैनगंना क्षेत्रीय ग्रामीण बँक
मेघालया रुरल बँक
एमजीबी ग्रामीण बँक
मिझोराम रुरल बँक
उत्तरांचल ग्रामीण बँक
उत्तर बिहार ग्रामीण बँक
उत्तरांचल क्षेत्रीय ग्रामीण बँक
वनांचल ग्रामीण बँक
विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक
भोपाल क्षेत्रीय ग्रामीण बँक
विश्वेश्वर्य ग्रामीण बँक
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.