Advertisement
संकीर्ण

कसे असेल होऊ घातलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ?

‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्ती शुभारंभ ऑफर
WhatsApp द्वारे संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd

मुंबईच्या निवासी, दळणवळण, व्यापारी, शैक्षणिक व पायाभूत सुविधांवर येणारा ताण कमी करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहर वसविण्यात आले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगाने होणाऱ्या जागतिकीकरणामुळे हवाई रहदारीवर जो ताण पडतो आहे. त्याला पर्यायी विमानतळाच्या जागेसाठी नवी मुंबई हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे ओळखून विमानतळ उभारण्याचा निर्णय झाला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने नोव्हेंबर २०१० मध्ये परवानगी दिली. आणि प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन १८ फेब्रुवारी रोजी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.

नवी मुंबईच्या अद्वितीय विकासामागील प्रेरकाची भूमिका बजावण्याचे काम सिडकोने केले. नागरिकांच्या निवास, शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यवसायविषयक व सामाजिक-सांस्कृतिक गरजांची पूर्तता करू शकेल अशा पायाभूत भौतिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या पर्यावरणपूरक आदर्श नगराची निर्मिती केली आहे. नवी मुंबईच्या अद्वितीय विकासामागील प्रेरकाची भूमिका बजावणारी सिडको देशातील अग्रगण्य नगर विकास संस्था म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यात यशस्वी झाली आहे. सिडको केवळ नवी मुंबईच नाही तर सबंध महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामागील ऊर्जास्त्रोत आहे.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी विमानतळ विकसित करण्यासाठी स्थापन झाली आहे. या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. सिडको आणि राज्य शासन हे एनएमआयएएलचे भागीदार आहेत. एकूण २,२६८ हेक्टरवर उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचे गाभा क्षेत्र १,१६१ हेक्टर इतके आहे.

भारतातील विमान वाहतूक क्षेत्र हे सर्वांत वेगाने विस्तारत आहे. देशांतर्गत हवाई वाहतुकीचे प्रमाण विचारात घेता अमेरिका आणि चीननंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २०००-०१ या वर्षी १.४ दशलक्ष इतकी होती. २०१६-१७ मध्ये त्यात वाढ होऊन ती २६५ दशलक्ष इतकी झाली. २०३०-३१ पर्यंत ही संख्या ८५५ दशलक्ष इतकी असेल, असा अंदाज आहे. २०३४ पर्यंत मुंबई महानगर क्षेत्रातील विमान प्रवाशांची संख्या १०० दशलक्ष इतकी असेल असा अंदाज राष्ट्रीय हवाई वाहतुकीबाबत वर्तवण्यात आला आहे.

Subscribe ‘Smart Udyojak’ Magazine

स्वातंत्र्यानंतरचे भारतातील सर्वांत मोठे ‘ग्रीनफिल्ड’ विमानतळ असा लौकिक असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रति वर्ष ६० दशलक्ष प्रवासी संख्या हाताळू शकेल. या विमानतळाच्या उभारणीनंतर देशातील सर्वांत पहिली नागरी क्षेत्रातील बहुपर्यायी विमानतळ व्यवस्था मुंबई महानगर क्षेत्रात निर्माण होईल. योगायोगाने, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करणारी हैदराबादस्थित जीव्हीके इंडस्ट्रीज हीच सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही कामकाज पाहात आहे. ही दोन्ही विमानतळे शेअर्ड टील बेसिस तत्त्वावर कार्यान्वित होतील.

मुंबईतील विमानतळावरील वाढत जाणाऱ्या हवाई रहदारीच्या अतिरिक्त ताणाला मुक्त करण्याचा उद्देश असणारा हा प्रकल्प सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून उभारला जातो आहे. स्थानिक जनतेचे सहकार्य आणि महाराष्ट्र शासनाने दाखवलेली गती यातून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्प २,२६८ हेक्टर जमिनीवर उभारणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही दोन्ही शहरे मेट्रोने लवकरच जोडली जातील. त्यामुळे एकूणच या प्रकल्पामुळे नवी मुंबई शहराचे अर्थकारण बदलणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीचे पुढचे पाऊल आहे. कार्गो आणि प्रवासी वाहतुकीचे नवे पर्व या निमित्ताने सुरू होतेय.

स्रोत : महान्युज


Smart Udyojak | e-Magazines | All Issues


स्मार्ट उद्योजक व्हॉट्सअ‍ॅप न्युजलेटर

उद्योजकता व व्यवसायविषयक बातम्या व उपयुक्त लेख रोज आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये जतन करा व ‘स्मार्ट उद्योजक न्युजलेटर’ असे टाइप करून आपल्या नाव, जिल्हा व तालुक्यासह या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप करा.


Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: