उद्योगात सर्जनशीलता आवश्यक


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


इनोव्हेशन हा शब्द जरी छोटा असला तरी ही एक खूप व्यापक संकल्पना आहे. कोणत्याही छोट्या उद्योगाला मोठ्या उद्योगांना टक्कर द्यायची असेल, आपल्याला कस्टमर बेस वाढवायचा असेल, सध्याचे कस्टमर retain करायचे असतील किंवा नवीन बाजार क्षेत्रात प्रवेश करायचा असेल, तर इनोव्हेशन ही प्रक्रिया वापरावी लागते.

सुरुवातीला इनोव्हेशन म्हणजे काय ते समजावून घेऊ. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर इनोव्हेशन म्हणजे अशा गोष्टी असतात ज्यांचा अवलंब केल्याने उद्योगाला भांडवलाचा कमी वापर करून स्पर्धात्मकता साधता येते. यामध्ये त्या गोष्टींचा वापर झालेला असतो ज्या स्पर्धक उद्योगाकडून दुर्लक्षित झालेल्या असतात किंवा कमजोर असतात.

उदाहरणादाखल आपण कॅटरपिलर उद्योगाला घेऊत कॅटरपिलर ही कंपनी अर्थ moving machinery चे उत्पादन घेते. कॅटरपिलरचे स्पर्धक उद्योजक उदाहरणार्थ न्यू हॉलंड, class, क्रॉसवर्ड अॅग्रो कंपनी, या कंपन्यासुद्धा मशीनरीजचेच उत्पादन करतात; पण कॅटरपिलर आणि इतर उद्योगांमध्ये मुख्य फरक हा असतो की, कॅटरपिलर आपला कस्टमर retain करण्यासाठी वेगवेगळ्या आफ्टर सेल्स योजना राबवते.

यामध्ये जरी ट्रॅक्टरची किंमत अधिक असली तरी ग्राहक quality, आफ्टर सेल्स सर्व्हिस या गोष्टींकडे आकर्षित होतात आणि ट्रॅक्टर किंवा इतर मशीनरी खरेदी करतात. कोणत्याही कंपनीचा innovation ओळखण्यासाठीचा मुख्य मुद्दा हा असतो की, त्या कंपनीची value delivery system इतर उद्योगांपेक्षा वेगळी झालेली असते, त्यांच्या ग्राहकांना मिळवण्याचा/टिकवण्याचा बिझनेस मॉडेल इतरांपेक्षा भिन्न असतो.

यामध्ये ती कंपनी इतर कंपन्यांपेक्षा वेगळे अधिक काही तरी योग्य नफ्याच्या बदल्यात ग्राहकांना पुरवते. Innovation केल्यामुळे कंपनीची वेगळी ओळख निर्माण होऊन कंपनीचा ग्राहक वर्ग विस्तारण्यास मदत होते. इनोव्हेशनचा वापर करून non value adding processes वजा करता येतात, यामुळे उद्योगांच्या स्पर्धकतेला वेगळीच धार मिळते.

वर दिलेल्या फायद्याप्रमाणेच इनोव्हेशनचे निश्चितच काही तोटेदेखील असतात. मुख्य तोटा हा असतो की, फिजिबिलिटी स्टडी आणि रिसर्च यांमध्ये पैसा गुंतवावा लागतो. इनोव्हेशन implement करताना सध्याचा ग्राहक वर्ग दुरावला जाऊ शकतो.

आता आपण innovation कशा प्रकारे कंपनीमध्ये आणला जातो ते पाहू. यासाठी आपल्याला आपल्या कंपनीच्या बिजनेस मॉडेलचा, ग्राहकांच्या पसंतीचा, स्पर्धक कंपन्यांच्या बिजनेस मॉडेलचा परिपूर्ण अभ्यास करावा लागतो.

यामध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडीवर, कंपनीच्या value delivery system वर आणि स्पर्धकांच्या value delivery सिस्टीमवर रिसर्च केला जातो आणि अशी पद्धत निर्माण केली जाते ज्याद्वारे ग्राहक आणि कंपनी यांचे अधिकाधिक हित जोपासले जाईल.

– रिहाज शेख
7378926295

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?