स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
कोरोनाच्या संकटाने तडाखा दिला नाही, असं एकही क्षेत्र नाही. याला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रसुद्धा अपवाद नाही. त्यामुळेच भारत आता हळूहळू पूर्वपदावर येत असला तरी एमएसएमइ क्षेत्राचे मात्र बरेच मोठे आणि भरून न निघणारे नुकसान होत आहे, इतकं की उद्योग बंद पडत आहेत आणि बेरोजगारीमध्येही मोठी भर पडत आहे.
म्हणूच सरकार एमएसएमइ क्षेत्राबद्दल संवेदनशीलतेने विचार करत ‘एमएसएमइ इनोव्हेशन’ पोर्टल विकसित करत आहे. या पोर्टलचा डोमेन ideas.msme.gov.in हा असणार आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
कमी काळात मोठया प्रमाणत वाढत असलेल्या बेरोजगारीशी लढण्यासाठी आणि नवीन उद्योगांना माहिती-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रमोट करण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने ‘एमएसएमइ इनोव्हेशन’ पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर उद्योजकांना कल्पना, नाविन्यपूर्ण संशोधन मांडता येईल आणि ते लाँच करण्यापूर्वी त्याबद्दल लोकांची मतं जाणून घेता येतील.
एमएसएमइ इनोव्हेशन पोर्टलची वैशिष्ट्ये :
- या पोर्टलच्या माध्यमातून उद्योगांत भांडवली गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लघुउद्योगांशी जोडले जाणे सोपे जाते. यामध्ये आपली कल्पना गुंतवणूकदारासमोर मांडताना उद्योजकाकडे पेटंट असणे आवश्यक आहे.
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर हे पोर्टल केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व एमएसएमइ संबंधित तपशीलवार माहितीसाठी एक-थांबा-दुकान म्हणून काम करेल. ग्रामीण आणि निमशहरी भागात असलेल्या उद्योगांच्या गरजा पूर्ण करणे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे.
- नोंदणीकृत वापरकर्ते वेगवेगळ्या उद्योजकीय कल्पनांचे मूल्यमापन करू शकतात. भांडवली गुंतवणूकदार उद्योजकीय कल्पना मांडणाऱ्या, सर्जनशील दृष्टी आणि संशोधन असणाऱ्या वापरकर्त्यांशी संपर्क करू शकतात. कृषी क्षेत्राला समोर ठेऊन या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे.
– टीम स्मार्ट उद्योजक
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.