२ लाख २० हजार कोटींचं मार्केट असलेल्या पारंपारिक Laundry व्यवसायात बदल घडवून आणणारे युवा उद्योजक


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


प्रत्येक विद्यार्थी हा उद्योजक होऊ शकत नाही, पण प्रत्येक उद्योजक हा विद्यार्थी असल्यापासूनच उद्योजक होण्याची स्वप्न जरूर पाहत असतो. असेच दोन विद्यार्थी आणि आताचे गणेश पवनकर आणि वैभव होळसंबरे यांच्या कामगिरीबद्दल आणि व्यवसायाबद्दल आपण जाणून घेऊ.

पुण्यातील सुप्रसिद्ध अश्या MIT कॉलेजमधून B. Tech केल्यानंतर कॅम्पसमधूनच चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, पण नोकरी करत असताना मनात एकच गोष्ट सारखी सलत होती, ती म्हणजे आपल्याला कोणता तरी व्यवसाय करायचा आहे. कारण नोकरीतून फक्त गरजा पूर्ण होतील, पण व्यवसायातून स्वप्न पूर्ण होतील.

हा विचार घेऊन दोघांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि गरजांमध्ये मदत होईल असा कोणता तरी व्यवसाय करायचा हे ठरवलं. त्यासाठी त्यांनी बऱ्याच लोकांची भेट घेतली, काही मोठ्या उद्योजकांना ते भेटले, नवनवीन कल्पना सुचू लागल्या, बऱ्याच गोष्टी नव्याने समजू लागल्या.

एक ठरलं होतं की, आपल्याकडून ग्राहकाने रोज ती वस्तू किंवा सेवा घेतली पाहिजे, ज्यातून ग्राहकालासुद्धा मदत होईल आणि आपला व्यवसायसुद्धा वाढेल याच हेतूने दोघांनीही आपले प्रयत्न चालू ठेवले.

दैनंदिन गरजांच्या यादीमध्ये, दुधाचा व्यवसाय डोळ्यासमोर दिसत होता, पण त्यासाठी भांडवलसुद्धा जास्त लागणार होतं आणि त्या व्यवसायात आधीपासूनच खूप मोठे प्लेअर आहेत हेदेखील माहीत होतं. मग त्यांनी स्वतःच्या दिनचर्येत येणाऱ्या समस्या शोधायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांना हे लक्षात आलं की आपल्याला कपडे धुण्यापासून ते इस्त्री करण्यापर्यंत असा कोणता योग्य मार्ग नाही जिथे आपले कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून जसेच्या तसे आपल्याला परत मिळतील.

ही समस्या बॅचलर जीवनात सगळ्यांनी अनुभवली आहे. अजूनही संपूर्ण भारतात पारंपरिक पद्धतीने laundry चा वापर केला जातो. जागतिक लोकसंख्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या देशात, मूलभूत गरजांपैकी एक असणाऱ्या वस्त्रांची सफाई नियमितपणे आणि वेळेवर होणे ही एक मोठी समस्या आहे हे त्यांना समजले आणि दोघांनीही निर्णय घेतला की आपण laundry व्यवसायात बदल घडवून आणायचा.

सलग आठ-नऊ महिने त्यांनी भारतातील laundry क्षेत्राचा परिपूर्ण अभ्यास केला. सद्यपरिस्थितीत कार्यरत असलेल्या laundry कशा प्रकारे काम करतात? त्यातून लोकांना हवी त्याप्रकारे सेवा मिळतीये का? लोकांचे काम हलके होत आहे का? लोकं समाधानी होत आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ हीच होती.

२ लाख २० हजार कोटींचे मार्केट असलेल्या या laundry व्यवसायात अजूनही लोकांचे प्रश्न सुटत नाहीयेत, त्यांचं काम हलकं होत नाहीये आणि सगळ्या गोष्टींकडे त्यांनाच लक्ष द्यावे लागत आहे. या सगळ्यातून गणेश आणि वैभव यांना हे समजलं की आपल्याला यात खूप मोठी संधी आहे. खूप मोठा बदल आपण घडवून आणू शकतो आणि त्यासाठी दोघांनीही नव्या युगातील तंत्रज्ञानाचा वापर करून एक laundry चा मॉडेल तयार करायला सुरुवात केली.

२०१८ मध्ये ती आठ ते नऊ महिन्यांची मेहनत यशस्वी ठरली, जेव्हा त्यांनी त्यांची पहिली शाखा INNOVATIVE LANUDRY BASKET (ILB) या नावाने पुण्यात खराडीमध्ये सुरू केली.

आजूबाजूच्या लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागला, कारण पारंपरिक पद्धत मोडत दोघांनीही laundry व्यवसायात खूप नावीन्य आणलं होतं. प्रामुख्याने SOP तयार केली म्हणजेच व्यवसाय कसा चालेल याची एक प्रक्रिया बनवली. कपडे laundry मध्ये आल्यापासून ते ग्राहकांना मिळेपर्यंत संपूर्ण जबाबदारी आपली आहे, हे त्यांनी सर्व कामगारांना सांगितले, कामगारांसाठी काम करण्याचे मॅन्युअल तयार केले.

ग्राहकांना त्यांचे कपडे नवे असल्यासारखेच वाटावे यासाठी सर्वोत्तम मशीन्स, उच्च दर्जाचे केमिकल्स आणि कपड्यांची सतत देखरेख या सूत्राचा अवलंब त्यांनी केला. त्याचाच परिणाम असा झाला की, लोकांना त्यांची सेवा एवढी आवडली की सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांची एकही शाखा कधीच तोट्यामध्ये गेली नाही.

पहिली शाखा १.५ वर्ष यशस्वीरीत्या चालवत असताना त्यांनी अनेक गोष्टींचा आढावा घेतला आणि हा व्यवसाय संपूर्ण भारतात कसा चालेल यावरदेखील खूप विचार केला आणि त्यातूनच त्यांनी फ्रांचायसी मॉडेल तयार केला. आज INNOVATIVE LAUNDRY BASKET च्या पुण्यामध्ये १३ शाखा आहेत आणि त्या सर्व शाखा चांगल्या प्रकारे नफा मिळवत आहेत.

वैभव सर म्हणतात, आजही मला आठवतं जेव्हा आम्ही बॅचलर आयुष्य जगत होतो, तेव्हा मला नेहमी कपड्यांची मोजणी करावी लागायची मग ते तेवढेच परत मिळालेत का, कशावर डाग राहिलेत का, कुठं फाटलेत का हे सगळं बघून घ्यायला लागायचं आणि हे अजूनही बऱ्याच ठिकाणी लोकांना करावं लागत आहे. कारण संपूर्ण भारतात फक्त चारच टक्के laundry या सिस्टीमॅटिक प्रकारे काम करतात.

या सगळ्यावर विचार करूनच दोघांनीही ठरवलं की तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून असे एक सॉफ्टवेअर तयार करायचे, ज्यामध्ये सगळ्या गोष्टींची योग्य नोंद होईल, ग्राहकाला काही लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही आणि त्याला मेसेज लगेच पाठवला जाईल की तुमचे एवढे कपडे आहेत आणि एवढ्या वेळात मिळतील.

त्यातूनही आम्ही तुमच्या घरातून कपडे घेऊन घरपोच डिलिव्हरीदेखील करणार. हे सगळं इतकं सोपं करून टाकलं की आज, ILB चा लाभ घेणारे ५० हजारहुन जास्त समाधानी आणि आनंदी ग्राहक आहेत आणि ते आणखी लोकांना जरूर सांगत असतात की तुम्हीदेखील तुमचे कपडे ILB मध्येच द्या.

ग्राहकांना तर उत्तम सेवा मिळतंच आहे आणि व्यापदेखील वाढत आहे, पण त्याचबरोबर फ्रांचायसीधारकांनासुद्धा चांगल्या प्रकारे नफा पहायला मिळत आहे. लॉकडाउनमध्येसुद्धा ILB ची प्रत्येक शाखा ही ५० हजारपेक्षा जास्त नफा मिळवत होती म्हणजेच या व्यवसायाला मंदीमध्येही नफा मिळवणे माहीत आहे. म्हणूनच आज ILB ला संपूर्ण महाराष्ट्रातुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ILB ची फ्रांचायसी आपण फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण भारतात कुठेही घेऊ शकतो. SOP खूप जबरदस्त बनवल्या आहेत ज्यामुळे मोठी शहरे असतील किंवा लहान गावं असतील सगळीकडे हा व्यवसाय उत्तम प्रकारे चालेल आणि मनासारखा नफादेखील मिळवून देईल. ILB चे काही नवीन outlet लवकरच मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये सुरू होत आहेत.

गणेश स्टार्टअपची व्याख्या सांगताना म्हणतात, लोकांचे प्रश्न आणि समस्या सोडवणारी आणि सोबतच त्यांचा वेळ वाचवणारी वस्तू किंवा सेवा त्यांना योग्यदारात सहजरित्या उपलब्ध करून देणे म्हणजे स्टार्टअप होय.

ही आहे या दोन युवा उद्योजकांची कामगिरी. तुम्हालाही त्यांच्या व्यवसायाबद्दल आणखी जाणून घ्यायचे असल्यास आणि त्यांच्या या कार्यात सहभागी व्हायचे असल्यास खलील क्रमांकावर संपर्क साधू शकता – 88550 74749 / 99221 82878

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?