विमा सल्लागार


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


अगदी अत्यल्प गुंतवणुकीत आणि घरच्या घरी सुरू करण्यासाठी सर्वात सोपा व्यवसाय म्हणजे विमा सल्लागार (Insurance Adviser) होणे. विमा या गोष्टीबद्दल आपल्या देशात अजून म्हणावी तितकी जागृती झालेली नाही. त्यामुळे विम्याबद्दल सामान्य लोकांमध्ये जागृती करणे आणि त्यांचा योग्य तो विमा उतरवणे हे काम विमा सल्लागाराला करावे लागते. या विम्याच्या हफ्त्यातील काही टक्के हे विमा सल्लागाराला मोबदला म्हणून मिळतात. हीच या उद्योगातील मिळकत असते.

विमा या क्षेत्रामध्ये मुख्यत्वेकरून जीवन विमा व सामान्य विमा असे दोन भाग पडतात. जीवन विम्याव्यतिरिक्त वाहन विमा, आगीचा विमा, घर अथवा अन्य संपत्तीचा विमा, मेडिक्लेम, इ. सर्व प्रकारचे विमा हे सामान्य विमा विभागात मोडतात. भारता जीवन विमा देणार्‍या कंपन्यांमध्ये ’भारतीय जीवन विमा निगम’ (एल. आय. सी.) ही सरकारी कंपनी सर्वात पुढे आहे.

विम्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शिक्षणाची अट आहे. विमा सल्लागार हा ग्रामीण भागात किमान दहावी शिकलेला आणि शहरी भागात किमान बारावी शिकलेला असायला हवा. विमा सल्लागार होण्यासाठी Insurance Regulatory Board of India (IRDA) ची परीक्षा उत्तीर्ण झालेले असणे अनिवार्य आहे. आपले चातुर्य, मानवी संबंध, संवाद आणि विक्री कौशल्य यांच्या आधारे या उद्योगात प्रगती करता येते.

विमा सल्लागार वित्तविषयातील अधिक ज्ञान अथवा काही ‘Certified Financial Planning’ सारखे वित्त नियोजनाचे काही अभ्यासक्रम करून गुंतवणूक सल्लागार म्हणूनही काम करू शकतो, जेणेकरून त्याला आपल्या ग्राहकाच्या एकूणच आर्थिक नियोजनाचा विचार करता येतो. सोबत म्युच्युअल फंड, शेअर्स, कंपनी फिक्स डिपॉजिट, पोस्टाच्या विविध गुंतवणूक योजना इत्यादी वित्त उत्पादने विकता येऊ शकतात.

– टीम स्मार्ट उद्योजक 

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?