जागतिक बाजारपेठ कशी मिळवाल?


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


जागतिक बाजारपेठेत व्यापार करण्यासाठी संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यांस करणं आवश्यक असते. जागतिक पातळीवर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योजकाने हे करणं अत्यंंत आवश्यक आहे. अन्यथा त्याीचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

जागतिक बाजारपेठेचा विचार करणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने आपले ग्राहक कोण होऊ शकतात? त्यांची गरज काय आहे? आपण त्यांना कोण कोणत्या प्रकारची सेवा देऊ शकतो? या आणि अशा अनेक प्रश्नांवर काम करण्याची गरज असते. काटेकोर आणि सूक्ष्म निरिक्षण नोंदवणे आवश्यक ठरतं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्यवसायाची रचना ही स्थानिक बाजारपेठेनुसार केलेली असते, आंतरराष्ट्रीय पातळीवर इथले मॉडेल चालेलच असे नाही. उदा. फुड मार्केट. आपली लोकल Food Chain विदेशात तेवढी चालणार नाही किंवा काही उत्पादनांना देशांतर्गत जेवढी मागणी असते तेवढी जागतिक बाजारपेठेत असेलच असे नाही. या सर्व गोष्टींयचा आपण अभ्या स करायला हवा.

योग्य बाजारपेठेची निवड

पहिले पाऊल म्हणजे परदेशात आपल्या मालाच्या विक्रीसाठी योग्य Location शोधा. योग्य ठिकाणाची निवड कशी कराल? तर येथील सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय बाजूंनी अभ्यास करून मगच पुढचं पाऊल उचला. सुरुवातीला परदेशात ज्या भागात आपल्या मूळ वंशाचे लोकांचे वास्तव आहे असे भाग निवडा व आपल्या व्यवसायाची सुरूवात तेथून करा ज्यामुळे आपल्याला कोणत्या आणि कशा प्रकारची मागणी आहे याची कल्पना/अंदाज येईल.

बाजारपेठ समजून घेण्यासाठी दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे एखाद्या Market Research Firm ची सेवा घ्या. जी कंपनी तुमच्यासाठी योग्य बाजारपेठेचा अभ्यास करून तुम्हाला माहिती पुरवेल. या Research मुळे आपल्याला वेगवेगळे ट्रेंडस्, आपले Competitors आणि मार्केट किंमत अशा अनेक गोष्टींची माहिती मिळते. त्यामुळे आपण स्वत:चाही मार्केट रिसर्च करावयास हवा. तो करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करावा लागेल.

दोन टप्प्यांत आपण हा अभ्यास करू शकतो.

यातील प्राथमिक टप्पा म्हणजे सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून किंवा त्या भागातील आपल्या संभाव्य ग्राहकांशी टेलिफोन, इमेल, सोशल मीडिया वेबसाइट्स इ. च्या माध्यमातून संपर्क करून त्यांचा कल काय आहे, याचा अंदाज घेऊ शकतो. अथवा तिथल्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून त्यांच्याकडून नेमकी माहिती घेऊ शकतो.

दुसऱ्या टप्प्यावर तिथल्या बातम्या, लेख, trade statistics, export statistics, सरकारी अहवाल यांचा अभ्यास करावा. हा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी agencies, पुस्तकं, कन्सलटंसी मोफत उपलब्ध असतात. ज्यांची मदत आपल्याला होऊ शकते.

आपला माल विदेशात वितरीत करण्यासाठी विक्रीसाठी चांगली Team असणं गरजेचं असतं. विक्रीचा एक वेगळा Plan तयार करावा. तो करताना राष्ट्रीय आणि आंतरराष्टीय दोन्ही सरकारच्या कायदे, नियम यांचा अभ्यास करून तयार केलेला असावा.

आपल्या Industry बाबत आपण सतत माहिती करून घ्यायला हवी. आपल्या क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या संकेतस्थळांना भेटी दयाव्यात. त्यांच्या सोशल मीडियाशी जोडले जावे. त्यांचे न्यूजलेटर subscribe करू शकता. हल्ली या माध्यमामुळे जास्त लवकर लोकांशी जोडता येते.

आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये online trade खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. विदेशातील ग्राहकांना वेळ कमी असतो. ते आपल्या इथल्याप्रमाणे बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा अनेक गोष्टींची ऑनलाइन ऑर्डर देऊन त्या वस्तू घरपोच मिळवण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे आपला मालही ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असेल याची काळजी घ्यावी.

जागतिक बाजारपेठ काबिज करताना आपली मूळ बाजारपेठ हातून सुटणार नाही ना याची काळजी प्रत्येक उद्योजकाने घ्यावी. गुणवत्ता, उच्च कोटीचा दर्जा आणि व्यवहारातील प्रामाणिकता याच्या जोरावर प्रत्येक भारतीय उद्योजक हा नक्कीच जागतिक बाजारपेठेत आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करू शकतो.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?