Advertisement
संकीर्ण

योग साधना प्राचीन असली तरी आधुनिक आहे म्हणून सुंदर आहे : पंतप्रधान

कमीत कमी खर्चात जाहिरात देऊन आपला ब्रॅण्ड ५ लाख लोकापर्यंत पोहोचवायचा आहे का?
तर स्मार्ट उद्योजक दिवाळी अंकात जरूर जाहिरात द्या!

जाहिरातीची सुरुवात : फक्त रु. ५०० पासून
Book here: shop.udyojak.org/p/0046/

योगाभ्यासामुळे ताणतणाव विरहीत शांत आणि समाधानी जीवन जगता येऊ शकेल. भेदभाव न करता योगाभ्यास सर्वांना एकत्र आणतो, वैरभावाच्या जागी एकजुटीची भावना निर्माण करतो. वेदना वाढण्याऐवजी योगामुळे आराम मिळतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्तराखंडमधील देहराडून येथे वन संशोधन संस्थेच्या संकुलात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करत होते. उत्तराखंडचे राज्यपाल कृष्णकांत पॉल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत, आयुष राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक आणि उत्तराखंडचे आयुष राज्यमंत्री हरक सिंग रावत यावेळी उपस्थित होते.

योगाभ्यास हे अतिशय सुंदर आहे कारण ते प्राचीन आहे आणि तरीही आधुनिक आहे, यात आपल्या वर्तमान आणि भूतकाळाचा समतोल असून, आपल्या भविष्यासाठी आशेचा किरण मिळतो, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले. व्यक्तीला तसेच समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर योगाभ्यास हे उत्तर आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सुमारे ५० हजार उत्साही योगाभ्यास स्वयंसेवकांसह वन संशोधन संस्थेच्या आवारात योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा केली.


दरमहा संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक मिळवा तुमच्या WhatsApp वर । वार्षिक वर्गणी फक्त रु. ८०

आजच वर्गणीदार व्हा : https://imjo.in/YSMSQK


योगाभ्यास करणाऱ्या जगातील उत्साही लोकांना स्पष्ट संदेश देतांना पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण जगाने योगाभ्यासाला आपलसं केले असून, दरवर्षी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभातून याचे दर्शन घडते. उत्तम आरोग्य आणि सुखाच्या शोधात असलेल्यांसाठी योग दिन ही सर्वात मोठी लोक चळवळ बनली आहे, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात साजरा करण्यात येत असून, अनेक केंद्रीय मंत्री विविध राज्यांमधे आयोजित कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

राष्ट्रपती भवनात चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

राष्ट्रपती भवनात आज चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पाचशेहून अधिक अधिकारी, राष्ट्रपती भवनातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच राष्ट्रपती भवन परिसरातील रहिवासी यात सहभागी झाले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद सुरीनामच्या दौऱ्यावर असून, ते तिथल्या स्थानिक वेळेनुसार सात वाजता सुरीनामचे राष्ट्रपती आणि अन्य मान्यवरांसह परामारीबो येथे आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभात सहभागी होते.

आरोग्य आणि सुखासाठी योगाभ्यास ही सर्वांगिण पद्धती असून, त्याला शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक आयाम आहे, असे उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभात सहभागी झालेल्या समुदायाला संबोधित करत होते. योग धारणेचे प्राचीन विज्ञान ही भारताने आधुनिक जगाला दिलेली अमुल्य भेट आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

योगाभ्यास तत्वज्ञान सर्वप्रथम मांडणारे पतंजली ऋषींचा दाखला देत, उपराष्ट्रपती म्हणाले की, योगाभ्यासामुळे व्यक्तीला त्याच्या विचारांवर नियंत्रण मिळवण्यात तसेच मन:शांती मिळवण्यात मदत मिळते. योगाभ्यास आणि धर्माचा काहीही संबंध नाही, असे सांगून ते म्हणाले की, जीवनाच्या विविध पैलूंना जोडणारे हे सर्वांगिण विज्ञान आहे. काही लोक या प्राचीन वैज्ञानिक प्रणालीला धर्माशी जोडतात, हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

उपराष्ट्रपतींनी जनतेला आधुनिक जीवनशैलीतील आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करण्यासाठी योगासनाने दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे आवाहन केले. शाळेच्या अभ्यासक्रमात योगाचा समावेश करण्याची वेळ आली असून, आगामी काळात भारत निरोगी आणि सुखी लोकांचा देश बनेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

योगामुळे एकाग्रता वाढते असे सांगून, उपराष्ट्रपती म्हणाले की, नियमित योगाभ्यास केल्यामुळे व्यक्तीला जीवनाकडे पाहण्याचा संतुलित दृष्टीकोन प्राप्त होतो. दैनंदिन जीवनातील योगाभ्यासाचे महत्व विषद करतांना उपराष्ट्रपती म्हणाले की, सध्या अनेक युवक आपले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलतात, हे रोखण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यानधारणेची मदत होऊ शकेल.

व्यवसाय आणि उद्योजकताविषयक लेख व बातम्या आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहता तो जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: