उद्योगाचं आजचं माध्यम : इंटरनेट


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


इंटरनेट ही आता जीवनावश्यक बाब बनली आहे. केवळ संपर्काचे साधन किंवा सोशल मीडियावर चॅटिंग करण्याचे साधन न मानता त्याकडे एक उज्ज्वल भवितव्य घडविणारे साधन म्हणून पाहिले पाहिजे. इंटरनेटचा शोध लागला आणि पूर्ण जगच बदलून गेले. माहितीची उपलब्धता, आदान-प्रदान वेगाने झाले. लोक सर्व माहितीसाठी गुगल सर्च करू लागले.

फेसबुकवर, व्हॉट्सअ‍ॅपवर तरुण तासन तास वेळ वाया घालवून, तारुण्याच्या ग्रेट उमेदीतला वेळ वाया घालवू लागले. इंटरनेट ही दुधारी तलवार आहे. त्यांनी हे समजले की, त्याचा वापर कसा करायचा. ते खूप मोठे व्यावसायिक बनले, पण ज्यांना नाही समजले ते आपला अनमोल वेळ वाया घालवतात. अनेक तरुणांनी आयुष्य बरबाद करून घेतले.

इंटरनेट व्यवसायाला भांडवल लागत नाही

दुर्दैवाने खूप कमी तरुणांना माहीत आहे की, इंटरनेट हे खूप मोठ्या व्यवसायाचे साधन आहे. याद्वारे व्यवसाय केल्यास त्यासाठी कोणतेही भांडवल लागत नाही. लागते ते फक्त इंटरनेट, कॉम्प्युटर, चांगली माहिती, चांगली संकल्पना व सातत्याने व चिकाटीने काम करण्याची तयारी.

अगदी सहजपणे रुपये पाच हजार ते पंचवीस हजार दरमहा तुम्ही कमवू शकता. अशा हजारो संधी आज उपलब्ध आहेत. पाश्‍चिमात्य देशांत लाखो लोक असा व्यवसाय करत आहेत व खूप चांगली कमाई करत आहेत.

तुम्ही कोट्यवधीची कंपनी बनवू शकता

इंटरनेटच्या माध्यमातून केवळ तुम्ही छोटा व्यवसाय नव्हे, तर भविष्यात कोट्यवधीची उलाढाल होईल, अशा कंपनीचे मालकही होऊ शकता. पाहिजे ती एक भन्नाट संकल्पना, आपल्या संकल्पनेवर दृढ विश्‍वास, सातत्याने त्यावर काम करण्याची तयारी.

दोन कॉलेज-मित्रांनी सुरू केलेली गुगल आज 20 हजार कर्मचारी असणारी व वर्षाला 40 हजार कोटींचे केवळ जाहिरात उत्पन्न असणारी कंपनी आहे. एक माध्यमिक शिक्षण असणार्‍या जॅक मा यांनी अलिबाब.कॉम चीनमध्ये सुरू केली.

ती कंपनी आज जगातील सर्वात मोठी इ2इ पोर्टल कंपनी आहे. त्यांची संपत्ती 22 बिलियन डॉलर्सची असून ते आज चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या सर्वांनी एक-दोन कॉम्प्युटर्स घेऊन कंपनी सुरू केली होती. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

मराठी युवकही करू शकतात

नरेंद्र मोदींच्या रूपाने आपल्याला इंटरनेटची ताकद, माहिती व ज्ञान असणारे पंतप्रधान मिळाले आहेत. सरकारच्या बर्‍याच योजना, धोरणे बदलत आहेत. मराठी तरुण धाडसाने पुढे येऊन मेहनत, संकल्पना, गुणवत्ता या जोरावर महाराष्ट्रातही दुसरी सिलिकॉन व्हॅली तयार करू शकतात.

मराठी तरुणांच्या गुणवत्ता, मेहनत, चिकाटीवर माझा गाढा विश्वास आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व मदतीचा हात दिल्यास महाराष्ट्रातही गुगल, अमेझॉन, रूबे, विकिपीडिया, अलिबाबा.कॉमसारखे इंटरनेट ब्रँड तयार होतील. चला, एकत्र येऊ या. प्रत्येक घरात एक इंटरनेट सुरू करू या! प्रत्येक घरात जर व्यवसाय तयार झाला, तर महाराष्ट्रात एकाही शेतकर्‍याच्या घरात आत्महत्या घडणार नाही, कारण इंटरनेटच्या जगात कधीच दुष्काळ पडत नाही.

– प्रा. प्रकाश भोसले

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?