Advertisement
उद्योगोपयोगी

ओळख ‘पुरवठा साखळी’ची

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

आज पुरवठा साखळी व्यवस्थापनाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. तज्ज्ञाच्या मताप्रमाणे पुढील दशक (२०२१ – २०३०) हे ‘पुरवठा साखळी दशक’ म्हणून नावारूपास येईल. कारण येत्या दहा वर्षांत आपल्याला पुरवठा साखळी व्यवस्थापन म्हणजेच supply chain management चा जोमाने विकास होताना दिसेल. सध्याच्या करोना महारोगाच्या परिस्थितीने जागतिक स्तरावर पुरवठा साखळीचा नव्याने विचार करण्यास भाग पाडले आहे.

आता थोडं पुरवठा साखळीबद्दल जाणून घेऊ. उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल (Raw Material) तसेच इतर साहित्य हे उत्पादकाकडे वेळेवर पोहोचले पाहिजे, तसेच उत्पादन केलेली कोणतीही वस्तू ही शेवटी ग्राहकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सेवा क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष वस्तूचे उत्पादन होत नसले तरी ग्राहकांना सेवा देण्यासाठी त्यांना काही गोष्टींची आवश्यकता भासते. या सर्व गोष्टी करण्यासाठी म्हणजेच उत्पादन करण्यासाठी, उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच विविध सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी (सप्लाय चेन) अत्यंत आवश्यक असते.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

ही पुरवठा साखळी कशा पद्धतीने निर्माण करावी, तिचे व्यवस्थापन कसे करावे, तसेच यावरील खर्च कमीत कमी कसा करावा आणि एकूणच पुरवठा साखळीची कार्यक्षमता कशी वाढवावी या सर्व महत्त्वाच्या बाबी ‘पुरवठा साखळी व्यवस्थापन’ म्हणजेच ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’मध्ये मोडतात.

पुरवठा साखळीचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिकीकरणामुळे पुरवठा साखळी ही केवळ एका देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यामुळे कित्येक औद्योगिक संस्थांमध्ये असे दिसते की मालाची खरेदी एका देशामध्ये तर उत्पादन दुसऱ्या देशामध्ये आणि मार्केटिंग हे सर्व जगामध्ये. यामुळे पुरवठा साखळीमधील गुंतागुंत जरी वाढत असली तरी खर्च मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे पुरवठा साखळी व्यवस्थापनाला मोठ्या प्रमाणावर महत्त्व आले आहे.

पुरवठा साखळी व्यवस्थापन

पुरवठा साखळी ही एखाद्या व्यवसायामध्ये, मग तो उत्पादन क्षेत्रामधील असो किंवा सेवा क्षेत्रातील, अतिशय आवश्यक असते. या साखळीचा प्रमुख उद्देश असा की, निर्माण केलेली वस्तू किंवा देत असलेली सेवा ही ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. याचबरोबर एखादी वस्तू अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत म्हणजेच वेगवेगळ्या मध्यस्थांची मदत आवश्यक ठरते.

उत्पादकांकडून घाऊक व्यापाऱ्याकडे आणि नंतर किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत अंतिम ग्राहकाकडे असा पारंपरिक वितरण साखळीचा प्रकार असतो. यामध्ये वस्तू अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच, उत्पादकाकडून घाऊक व्यापाऱ्यांकडे आणि घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापाऱ्यांकडे पोचवणे हे कामही वितरण साखळीमधून केले जाते.

या दृष्टीने वितरण साखळीचे व्यवस्थापन कसे करावे की, ज्यामुळे कोणताही अडथळा न येता वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचेल. उदाहरण घ्यायचं झालं तर ‘ब्रिटनिया’ कंपनीला बिस्कीटं बनवायची झाली तर त्यासाठी लागणारा कच्चा माल मैदा, गहु, साखर, सुकामेवा source करण्यापासून तो माल प्रत्यक्ष कंपनीत पोहचेपर्यंत, तसेच त्याचे अंतिम उत्पादन निघून त्याच पॅकेजिंग होईपर्यंत व ते पुढील वर्गीकरणासाठी डिस्ट्रिब्युटर, होलसेलर, रिटेलर आणि ग्राहकाकडे जाईपर्यंतच्या प्रवासात पुरवठा साखळीचा महत्त्वाचा वाटा आहे.

वस्तू केवळ ग्राहकापर्यंत पोहचणे महत्त्वाचे नसून ग्राहकाला त्याबद्दलचा चांगला अनुभव मिळणे गरजेचे आहे. ज्याला आपण user experience असं म्हणतो. ई-कॉमर्स क्षेत्रात अमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, मिंत्रा यासारख्या अग्रगण्य कंपन्यादेखील आपला user experince सुधारण्याला प्राधान्य देतात. ज्यात ग्राहकाने खरेदी केलेली वस्तू त्याला कबूल केलेल्या दिवशी उपलब्ध करून देणे, त्यासाठी त्याला shipping tracking उपलब्ध करून देणे, नावडलेली वस्तू पुन्हा परत करण्याची सोय उपलब्ध करून देणे, यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.

पुरवठा साखळीतील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉजिस्टिक. लॉजिस्टिक मॅनेजमेंट म्हणजे काय, हे आपण समजून घेवू. वस्तू ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांची मदत घ्यावी लागते. यासाठी प्रत्यक्ष वस्तूची वाहतूक कशा पद्धतीने करावी? ती कमीत कमी खर्चामध्ये कशी होईल या बाबींची काळजी घेतली जाते. पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ती वाहतुकीच्या वेगवेगळ्या प्रकारांशी इंटिग्रेट करणे आवश्यक ठरते. उत्पादित वस्तूंबरोबर, दिल्या जाणाऱ्या सेवांचे वितरण कसे करावे या गोष्टीही लॉजिस्टिकमध्ये येतात.

– नेहा पेडणेकर-क्षीरसागर
संपर्क : 9833749799


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!