Advertisement
उद्योगोपयोगी

छोट्यातला छोटा व्यापारी आता ‘पेटीएम बिझनेस’द्वारे घेऊ शकतो डिजिटल पेयमेंट

‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्ती शुभारंभ ऑफर
WhatsApp द्वारे संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd

लहानतला लहान व्यापारी आता ‘पेटीएम बिझनेस’ या App द्वारे डिजिटल पेयमेंट स्वीकारू शकतो आणि त्याच्या बॅंक खात्यात दुसर्‍या दिवशी एकही रुपया न कापला जाता थेट जमा होणार. विजय शेखर शर्मा यांच्या ‘पेटीएम फॉर बिझनेस’ या नवीन एप्लिकेशनने ही सुविधा उपलब्ध केली आहे. २२ जानेवारी रोजी ‘पेटीएम फॉर बिझनेस’ हे नवीन एप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले.

‘पेटीएम वॉलेट’, ‘पेटीएम पेयमेंट बॅंक’पेक्षा ‘पेटीएम फॉर बिझनेस’ हे वेगळे एप्लिकेशन आहे. जर तुम्ही या आधी वॉलेट किंवा पेयमेंट बॅंक वापरत असाल, तरी तुम्हाला ‘पेटीएम फॉर बिझनेस’ हे नवीन एप्लिकेशन आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. एप्लिकेशन फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या व्यवसायाची माहिती भरून तुमची नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा QR code मिळेल, ज्याद्वारे तुम्ही Paytm ‘पेटीएम वॉलेट’ व UPI द्वारे पैसे स्वीकारू शकता.

‘स्मार्ट उद्योजक’चे सर्व अंक (एकूण ३४ अंक) डाउनलोड करा फक्त रु. ३०० मध्ये : http://imojo.in/ei26fd

‘पेटीएम फॉर बिझनेस’द्वारे स्वीकारलेले पैसे दुसर्‍या दिवशी तुमच्या बॅंक खात्यात कोणतेही शुल्क न घेता जमा होतात. छोट्या उद्योजकांसाठी हे app असल्यामुळे याद्वारे व्यवहार करण्यास तुम्हाला दिवसा रु. २०,००० व महिना रु. ५०,००० ही कमाल मर्यादा आहे. रु. ५०,००० हून अधिक व्यवहार करण्यासाठी तुम्हाला पेटीएमशी बोलावे लागेल. सहज सोपे डिजिटल पेयमेंट स्वीकारण्यासाठी ‘पेटीएम फॉर बिझनेस’ हा एक सोपा व सुरक्षित पर्याय आहे.


Subscribe ‘Smart Udyojak’ Magazine

आपण उद्योजक असाल तर 'उद्योजक सूची'मध्ये आपली नोंद करण्यासाठी येथे क्लिक करा.

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: