तुमच्या विचारात आणि कृतीत एकवाक्यता आहे का?

सामान्यतः असं आढळून येत की, आपण विचार तर चांगला करतो; परंतु आपल्या आयुष्यात फार मोठा सकारात्मक बदल मात्र घडत नाही. आपण काल जिथे होतो आणि आज जिथे आहोत, यात फारसा फरक पडलेला नसतो.

मनात अनेक विचार येतात आणि जातात, आपण मनात बरंच ठरवतो; परंतु आयुष्याच्या पदरात नवीन माप मात्र पडत नाही. आयुष्याच्या कॅलेंडरवर फक्त दिवस सरकत राहतात. वय प्रत्येक दिवशी वाढत राहतं; पण आयुष्य एका जागेवरून पुढे काही जात नाही.

मित्रहो, वरील मुद्दा जर का तुमच्याही आयुष्याचा एक भाग असेल तर घाबरू नका. निराश तर मुळीच होऊ नका. कारण तो मुद्दा सध्या अनेकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. तुम्हाला मात्र हा मुद्दा आजच निकालात काढायचा आहे. त्या मुद्द्याला तुम्हाला आत्ताच गुद्दा द्यायचा आहे; पण हे सगळं होणार आहे, तुम्ही ठरवलं तर.

आता आपण या प्रश्नाच्या मुळाशी जाऊ. अर्थात या समस्येचं मूळ आहे ‘कृती’ आणि ‘कृती’ तुम्हाला जगातल्या यशस्वी माणसांच्या समुदायात सहभागी होण्याची संधी प्राप्त करून देते. विचारात आणि कृतीत एकवाक्यता असणारे फारच थोडे लोक या जगात आहेत.

तुम्हाला तुमच्या कृतीतील आणि विचारातील एकवाक्यता या नव्या ग्रुपमध्ये सहभागी करू शकेल. अशाने तुम्हाला तुमच्यात आणि इतरांत असलेला फरक मात्र कळायला आणि दिसायला लागेल. हा फरक निसर्गतः नसतो. आपल्याला तो जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक निर्माण करावा लागतो.

तुमच्या विचार आणि कृतीतील एकवाक्यता, हे असं दुधारी हत्यार आहे, जे की अनेक अपयशांवर अचूक आणि प्रभावी वार करू शकतं. प्रत्यक्ष कृतीत कमी पडण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. जसे की –

• आळस.
• आरंभशूरता.
• इतरांकडून योग्य मदत न मिळणे.
• आजूबाजूला योग्य व्यक्तींचा अभाव.
• अपयशाची भीती.
• आत्मविश्वासाचा अभाव.
• केवळ विचार करण्यावरच भर द्यायला आवडणे वगैरे वगैरे.

लक्षात ठेवा, विचार अनेक जण करतात, मात्र कृतीत मागे पडतात. तुम्ही मात्र याचा फायदा उठवा. कृतीत अग्रेसर राहा. तीच तुम्हाला जिंकून देईल. तुमचा जयजयकार फक्त तुम्ही स्वीकारलेल्या कृतीने होईल.

तुमच्या विचारांत आणि कृतीत एकवाक्यता असणं हेच तुमच्या विजयाचं सूत्र आहे. त्याला आत्मसात करा. मग बघा तुमच्या आयुष्यात कसे चमत्कार घडतील ते. लोक चमत्कारालाच नमस्कार करतात बरं का.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?