स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
१. तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा. (शिक्षण, कामाचा अनुभव, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी)
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
माझं शिक्षण बी. एस्सी.पर्यंत झाले आहे. कामाच्या अनुभवाबद्दल बोलायचं झाल्यास गेल्या अकरा वर्षांपासून मी या कामाशी जोडले गेले आहे. पण प्रत्यक्ष व्यवसाय म्हणून गेल्या दीड वर्षापासून मी हे काम पाहत आहे. मला लग्नाअगोदरपासूनच कलाकुसरीच्या वस्तु बनवणे वगैरे याचा छंद होता.
वडिलांचा परंपरागत शेती अवजाराचा व्यवसाय असल्याकारणाने उद्योग म्हणजे काय असतो, हे मी लहानपणापासून आणि जवळून पाहिलेले असल्याकारणाने, लग्नानंतर माझ्या पतींनी माझ्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहित करून, हा ‘इंडियन आर्ट अँड क्राफ्ट’ व्यवसाय उभारण्यासाठी मोलाची मदत व सहकार्य केले.
२. तुम्हाला तुमच्या व्यवसायाची कल्पना कशी सुचली?
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण-उत्सव असतात. मला कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचा छंद असल्याकारणाने सण, उत्सव आला मी अनेक छोट्या-मोठ्या वस्तू घरांमध्ये बनवत असे. एकदा मकर संक्रांतीच्या सणानिमित्त सुगडे म्हणजे वाण हे मातीचे मोठे एक मडके आणि त्यासोबत आणखी चार छोटी मडकी आपण वापरत असतो, मी त्या मडक्यानं रंग दिला व सजवून वापरले. ते सर्वांना इतके आवडले की अनेकांनी मला त्याची मागणी केली.
त्यातून लक्षात आलं की आपण बनवलेल्या वस्तू लोकांना आवडत आहेत आणि त्याची मागणी होत आहे आणि वरचेवर मी प्रत्येक सणाला वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या वस्तू बनवत गेले आणि त्यातून माझ्या वस्तूंची मागणी वाढत गेली.
३. तुमची उत्पादने किंवा सेवा याविषयी सांगा.
‘इंडियन आर्ट अँड क्राफ्ट’च्या माध्यमातून वेगवेगळ्या सण आणि उत्सवाला लागणारे आर्ट ,क्राफ्ट, क्रिएशन ,डिझाईन, डेकोरेशन, फॅशनच्या माध्यमातून अनेक वस्तू तयार केल्या जातात आणि वितरित केले जातात.
जसे की दिवाळीनिमित्त पणत्या, दिवे ,आकाश कंदील ,शोभेच्या वस्तू ,मकर संक्रांतीनिमित्त सुगडे, करंडा, हळदी कुंकवाचे वाण, सिल्क थ्रेड बांगड्या, हेअर बंन, बॉटल वर्क, मिरर वर्क, गणपती आसन, लग्नसराईनिमित्त सप्तपदी, मोत्याचे पान, सुपारी,नारळ, फ्रेम, पेंटिंग, नेम प्लेट, की हूक अशा अनेक वॉल हँगिंग वस्तू बनवल्या जातात.
४. तुमच्या व्यवसायात वैशिष्टयपूर्ण काय आहे?
‘इंडियन आर्ट अँड क्राफ्ट’मार्फत बनवल्या जाणाऱ्या वस्तू आमच्या महिला भगिनीच्या हातातून बनत असल्याकारणाने त्याच्यातून एक प्रकारचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी प्रकट होत असते. आम्ही वस्तू बनवत असताना सतत नावीन्याची कास धरून युनिक वस्तू बनवण्याच्या प्रयत्नात असतो.
‘इंडियन आर्ट अँड क्राफ्ट’च्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाल्यास समाजामध्ये अशा अनेक माताभगिनी आहेत, ज्या दिवसभर घरी बसून असतात त्यांना काम करण्याची मनातून इच्छा असते, कारण त्यांच्याकडे अनेक कलागुण असतात ते त्यांना बसू देत नाहीत.
पण काही कौटुंबिक व सामाजिक बंधने अथवा इतर कारणामुळे त्या काम करू शकत नाहीत किंवा आपली इच्छा व्यक्त करू शकत नाहीत, अशा अनेक माता-भगिनींना इंडियन आर्टच्या माध्यमातून त्यांच्या कला गुणांना मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला जातो.
५. तुमचे व्यवसायाचे ध्येय काय आहे?
‘इंडियन आर्ट अँड क्राफ्ट’मध्ये ५ ते ७ सणानिमित्त २० ते २५ वस्तू बनवल्या जातात. भविष्यात वर्षभर चालणाऱ्या एक ना अनेक सण-उत्सव यासोबतच दैनंदिन जीवनातल्या अनेक वस्तू बनवण्याचा मानस आहे.
६. तुमच्या व्यवसायाचे vision व mission स्टेटमेंट ठरले असेल तर सांगा.
‘इंडियन आर्ट अँड क्राफ्ट’च्या माध्यमातून बनवल्या जाणाऱ्या वस्तू व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर, ट्विटर,अशा विविध प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो व विकत असतो. भविष्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या वस्तू ऑनलाइन पद्धतीने घरपोच देण्याचा मानस आहे.
७. तुमच्या व्यवसायात किती कर्मचारी काम करतात?
आज रोजी इंडियन आर्ट अँड क्राफ्टसोबत २० ते २५ महिला जोडल्या गेल्या आहेत. भविष्यात १०० ते १५० महिलांना जोडण्याचा मानस आहे.
८. तुम्हाला कधी अपयशाचा सामना करावा लागला का? आणि त्यातून तुम्ही काय शिकलात?
सुरुवातीच्या काळामध्ये व्यवसायासाठी जागा, लाईट, कामगार याबाबतीत अनेक अडचणींना सामना करावा लागला. मला माझ्या पतींची मोलाची साथ असल्याकारणाने त्यातून मार्ग निघत गेला. यातून एक गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे कोणत्याही अडचणीच्या वेळी स्वतः खंबीरपणे उभा राहिल पाहिजे. त्यातून मार्ग निश्चित निघत असतो.
९. तुम्ही केलेल्या काही सर्वात मोठ्या चुका काय आहेत? आणि त्या चुकांतून तुम्ही काय शिकलात?
नक्की चूक म्हणता येणार नाही, पण वेळेत वस्तू तयार न होणे, मार्केटमध्ये काय चालतंय याचा सतत शोध घेणे आणि ग्राहकांना सतत युनिक, नाविन्यपूर्ण वस्तू पुरवणे, ग्राहकांच्या मनाचा कल शोधणं, कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणे याबाबत अनेकदा छोटे-मोठे माझे निर्णय चुकले, पण त्यातून मार्ग काढण्याचा मी सतत प्रयत्न करत राहिले. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की आपल्या कामामध्ये सातत्य ठेवल्याने त्यात निश्चितपणे सुधारणा होत असते.
१०. नव्याने व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
मी एवढंच म्हणेन की, स्वतःला आवडेल त्या क्षेत्रात काम तर कराच, पण कितीही अडचणी आल्या तरी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवणं हे तितकच महत्त्वाचं आहे. कारण अडचणीमुळे एक दरवाजा बंद झाला असल्याचे भासत असले तरी आपल्यासोबत उपलब्ध साधनसामग्रीच्या माध्यमातून अनेक दरवाजे उघडता येऊ शकतात, हे आपण पाहिले पाहिजे ,त्याशिवाय आपण आपला पल्ला गाठू शकत नाही.
जगदेवी चिदानंद स्वामी
व्यवसायाचे नाव : इंडियन आर्ट अँड क्राफ्ट
हुद्दा : मालक
व्यवसायातील अनुभव : ११ वर्षे
जिल्हा : लातूर
व्यवसायाचा पत्ता : हाके नगर, लातूर 413512
मोबाइल : 8847766766
Business Formation: Sole Proprietary
Business Email ID: indianartltr@gmail.com
फेसबुक बिझनेस पेज : www.facebook.com/indianartltr
LinkedIn Account or page: www.facebook.com/indianartltr
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.