कथा उद्योजकांच्या

महाराष्ट्रभरात रोजगारनिर्मितीसाठी ‘जयतु इंडिया’

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेलेले दिसत होतं. गावाकडून शहरात नोकर्‍यांना जाणारी लोक परत येत होती. सर्वच प्रकारच्या उद्योगधंद्यांची वाताहत होताना दिसत होतं. अशा परिस्थितीत आपण काही केलं पाहिजे, जेणेकरून या लोकांना आपण काही मदत करू शकू; या उद्देशाने चार-पाच मंडळी एकत्र आली आणि जन्म झाला ‘जयतु इंडिया सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’चा.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

गावातून शहरात जाऊन नोकर्‍या करण्याऐवजी गावातच लोकांच्या हातात काही रोजगार देता येईल का यावर विचार सुरू होते. या विचारांचाच परिपाक म्हणजे ‘जयतु इंडिया’चं स्वरूप आहे. संस्थापक संचालक प्रवीण राठोड, दीपाली परदेशी विश्वकर्मा आणि त्यांचे सहकारी यांची आपल्या ग्रामीण समाजासाठी ठोस काही निर्माण करण्याची तळमळ आपल्याला ‘जयतु इंडिया’मध्ये पाहायला मिळते.

यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यात 24 डिसेंबर 2020 या दिवशी ‘जयतु इंडिया’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवात बीपीओ आणि केपीओच्या कामांपासून करण्यात आली. म्हणजे अनेक स्टार्टअप्स तसेच लहान-मोठ्या व्यवसायांना लागणारी विविध मनुष्यबळाची कामे ‘जयतु इंडिया’ आपल्या खांद्यावर घेऊ लागला.

जसे की बिझनेस प्रोसेसेस, कस्टमर हँडलिंग, टेली मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मेकअप अशी विविध कामे या व्यवसायांसाठी ‘जयतु इंडिया’मधून होऊ लागली. यामुळे व्यवसायांचाही विविध प्रोसेसेसवर होणारा खर्च कमी होतो.

रोजगारनिर्मिती हा ‘जयतु इंडिया’चा उद्देश असल्याने ठराविक अशा कोणत्याही एकाच कामावर कंपनी बांधील राहिली नाही, तर जसजशे नवनवीन प्रकल्प हाती घेता येतील आणि त्या माध्यमातून ग्रामीण तरुण आणि महिलांना रोजगार मिळवून देता येईल, यावर ‘जयतु’ने लक्ष केंद्रित केलं.

तरुण आणि महिलांना डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडियाचे प्रशिक्षण देऊन विविध प्रॉडक्ट्स विकायला शिकवणे आणि त्याद्वारे अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देण्याला ‘जयतु इंडिया’ने सुरुवात केली. भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक पिनकोडमध्ये एका तरी कुटुंबाला रोजगार द्यायचा, असा ‘जयतु इंडिया’चा प्रयत्न राहील.

नितीन गडकरी केंद्रिय लघुउद्योग मंत्री असताना गोधनाद्वारे तयार केलेला रंग, ज्याचे उत्पादन खादी ग्रामोद्योग करते या ‘खादी पाकृतिक पेंट’ची संपूर्ण पुणे जिल्हा आणि विदर्भातील वितरणाची जबाबदारी ‘जयतु इंडिया’ने आपल्या खांद्यावर घेतली आहे.

शैक्षणिक क्षेत्रात ‘जयतु इंडिया’कडे ‘तेज दिमाग’ या एज्युटेक कंपनीचे महाराष्ट्र आणि गोव्यात वितरण आहे. ‘तेज दिमाग’वर सध्या शालेय शिक्षणाव्यतिरिक्त नऊ वेगवेगळे कोर्स आहेत. ‘तेज दिमाग’च्या संपूर्ण विस्ताराचं काम ‘जयतु इंडिया’ पाहत आहे. महाराष्ट्रात सध्या 62 केंद्र सुरू आहेत.

‘जयतु इंडिया’ प्रो हार्वेस्ट बॅगचीही विक्री करते, जी शेतकर्‍यांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये कोणतेही धान्य, कडधान्य, सुका मेवा ठेवल्यास त्याला दोन वर्षांपर्यंत कीड लागत नाही, शिवाय चार वर्षांपर्यंत ही बॅग पुन्हा वापरता येते.

पुण्यात 300 ते 350 सोसायट्यांमध्ये ‘जयतु इंडिया’ने नेटवर्क उभं केलं आहे. शेतकरी उत्पादक संस्था किंवा स्वयंरोजगार संस्था यांना थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतात.

‘जयतु इंडिया’च्या माध्यमातून आतापर्यंत 35 हजारहून अधिक कुटुंबांपर्यंत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पोहोचले आहे, असे ‘संस्थापक प्रवीण राठोड सांगतात. महाराष्ट्रभरात तालुका पातळीवर तसेच पिनकोड पातळीवर ‘जयतु इंडिया’ आपले प्रतिनिधी नेमत आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम दिले जाईल. यासाठी इच्छूक प्रत्येकजण ‘जयतु इंडिया’ला संपर्क करू शकतात.

संपर्क – 9423432532


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!