Advertisement
कथा उद्योजकांच्या

कॅरम खेळाडूंना छंदापासून प्रोफेशनपर्यंत नेणारा उद्योजक

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


चाळी, गल्ल्यांमध्ये छंद, आवड, विरंगुळा म्हणून आपण कॅरम खेळतो. या विरंगुळ्याला आपल्याला प्रोफेशनमध्ये परावर्तित करता येईल का? तर नक्कीच हो! कॅरमच्या जिल्हा ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आयोजित केल्या जातात.

या खेळात यश मिळवणार्‍यांना क्रीडापटू म्हणून करीअरही करता येते आणि याचे प्रशिक्षण देण्यासाठीच जितेंद्र दळवी यांनी ‘क्रिएटिव्ह कॅरम अकॅडमी’ सुरू केली. जितेंद्र दळवी हे स्वतः राष्ट्रीय पातळीवर कॅरम स्पर्धेत ‘हिंदुस्तान पेट्रोलियम’चे प्रतिनिधित्व करतात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

दळवी यांनी ठाणे जिल्ह्यातील अनेक तरुणांना कॅरमचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये ते कॅरम प्रशिक्षणाचे वर्ग भरवतात. जितेंद्र दळवी स्वतः मुंबईतल्या गिरणगावातले. त्यामुळे लहानपणापासून कॅरमची आवड.

अनेकांना उत्तम कॅरम खेळता येतं, पण त्याचा स्वतःच्या करीअरसाठी किंवा अर्थार्जनासाठी उपयोग होत नाही. पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या जितेंद्र यांना ही बाब लक्षात आली आणि त्यांनी तरुणांना यामध्ये प्रोफेशनल करण्याचा निर्णय घेतला.

‘क्रिएटिव्ह कॅरम अकॅडमी’मध्ये खेळाडूंची जिल्हा पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या स्पर्धांची तयारी करवून घेतली जाते. २०१८ साली नागपूर येथे झालेल्या सामन्यांत अंडर-२१ वयोगटातील राष्ट्रीय विजेता हर्ष शाह तसेच २०१२ च्या पश्चिम भारताच्या स्तरावर झालेल्या स्पर्धेचा विजेता इरफान शेख हेही याच अकॅडमीचे विद्यार्थी.

मोलाची साथ : सत्यवान वाघमारे, हरीश जैन
मार्गदर्शक : निलेश बागवे, अरुण देशपांडे, अमृता देशपांडे-कारखानीस
तरुणांना संदेश : खेळाडूंनी संघटित होण्याची गरज आहे.

अकॅडमीमध्ये शिकलेल्या खेळाडूंना व्यावसायिकदृष्ट्या अर्थार्जन कसे करता येईल, हा विचार करून दळवी यांनी ‘क्रिएटिव्ह स्पोर्ट्स सेंटर’ सुरू केले. फेब्रुवारी २०२० मध्ये ठाण्यात झालेल्या महापौर चषकस्पर्धेत क्रिएटिव्ह कॅरम अकॅडमी आणि स्पोर्ट्स सेंटरच्या एकूण चार संघांनी भाग घेतला होता. एकूण चोवीस संघ उतरलेल्या या चषक स्पर्धेत पहिले चारही पुरस्कार जितेंद्र दळवी यांच्या संघांनी जिंकले.

अकॅडमीमध्ये सध्या पाच मुख्य प्रशिक्षक आणि पाच साहाय्यक असे दहा प्रशिक्षक आहेत. सध्या ठाणे जिल्ह्यापुरती ही अकॅडमी मर्यादित असली तरी लवकरच मुंबई उपनगरातही याचे एक केंद्र सुरू होणार आहे. याशिवाय महाराष्ट्रभरात कुठेही कॅरम प्रशिक्षणाचा उपक्रम राबवायचा असल्यास अकॅडमी सर्वतोपरी सहकार्य करायला तत्पर आहे.

कॅरमचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण जास्तीत जास्त लोकांना देता यावे यासाठी जितेंद्र दळवी ‘कॅरमशॉट्स डॉट इन’ नावाने एक संकेतस्थळ सुरू करत आहेत. यावर कॅरम प्रशिक्षणाचे बेसिक तसेच अ‍ॅडव्हान्स कोर्सेस उपलब्ध असतील. ‘क्रिएटिव्ह कॅरम अकॅडमी’च्या यूट्यूब चॅनेलवरही कॅरम प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ लोकांना पाहायला मिळतील.

जितेंद्र दळवी यांनी आपल्या स्वतःच्या आवडीला व्यवसायात रूपांतरित करून आज ते मोठं काम करत आहेत. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन अनेक तरुणही आपल्या छंदातून अर्थार्जन करतील, अशी आशा बाळगू.

संपर्क : जितेंद्र दळवी – ९७६९३८०७५०

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!