Advertisement

‘उद्योजक सूची’मध्ये समाविष्ट व्हा!

महाराष्ट्रातील उद्योजकांची जिल्हावार ‘उद्योजक सूची’ तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘स्मार्ट उद्योजक’ने हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात लहान-मोठा उद्योग करणार्‍या प्रत्येक उद्योजकाची नोंद या सूचीमध्ये करण्याचा मानस आहे. ‘स्मार्ट उद्योजक’च्या संकेतस्थळावर (www.udyojak.org) ही सूची सर्वांसाठी आहे व आगामी काळात ई-बुक रूपातही याचे जिल्हावार खंड प्रकाशित केले जाणार आहेत.

या उद्योजक सूचीमध्ये उद्योजकाचे नाव, पत्ता, त्याच्या व्यवसायाची माहिती तसेच त्याचा उद्योजकीय प्रवास आम्ही देत आहोत. म्हणजे ही उद्योजकाची एक परिपूर्ण प्रोफाइल तयार होऊ शकेल. ही वेब बेस्ड असल्यामुळे उद्योजकाच्या नावे स्वतंत्र वेबपेज (उदा. https://udyojak.org/entrepreneur-name) तयार होईल. या प्रकल्पाचा एक उद्देश मराठी उद्योजकांना समाजात अधिकाधिक visibility मिळावी हा असल्यामुळे ‘स्मार्ट उद्योजक’च्या सोशल मीडियावरूनही हे पेज प्रसारित केले जाईल, म्हणजे लाखो लोकांपर्यंत मराठी उद्योजक पोहोचू शकेल.

‘उद्योजक सूची’मध्ये जोडले जाण्याची प्रक्रिया

    • प्रथम आपल्याला Processing Fee भरायची आहे. (‘उद्योजक सूची’ तयार करण्यासाठी संपादकीय व तांत्रिक काम सांभाळण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि होस्टिंग तसेच अन्य खर्च यांचा विचार करून रु. २५० Processing Fee ठेवण्यात आलेली आहे. लहानातील लहान उद्योजकाचा विचार करून हे शुल्क रु. २५० ठेवले आहे. मात्र आपण स्वेच्छेने अधिकही देऊ शकता.)
    • Processing Fee भरल्यानंतर आपण एका वेब बेस्ड फॉर्मवर पोहोचाल. तो फॉर्म संपूर्ण भरून सोबत फोटो जोडावा.
    • यामध्ये तुमची कथा ही स्वगत रूपात लिहून पाठवा. त्यावर संपादकीय संस्कार करून ती तुमच्या सूची नोंदीमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये तुमची व्यवसायात येण्यामागची प्रेरणा, तुमची सुरुवात, तुम्हाला सुरुवातीला आलेल्या अडचणी, त्या अडचणींवर कशी मात केलीत आणि एकूण तुमचा आतापर्यंतचा प्रवास व भविष्याची स्वप्ने या मुद्द्यांवर लिहा.
    • Form भरल्यानंतर १० कार्यालयीन दिवसांत आपले प्रोफाइल ‘उद्योजक सूची’मध्ये समाविष्ट केले जाईल. आपली ही नोंद www.udyojak.org वर प्रसिद्ध होईल.
Help-Desk