‘कामत’ रेस्टॉरंटचे संस्थापक विठ्ठल कामत यांचे चिरंजीव डॉ. विक्रम कामत हेही व्यवसायात यशस्वी घोडदौड करत आहेत व आपल्यातील उद्योजकीय कौशल्याने ते व्यवसायाने नवी क्षीतिजे पादाक्रांत करत आहेत. त्यांच्याशी गप्पा मारल्यात अंजली हेगडे यांनी.
तुमच्या आतापर्यतच्या प्रवास कसा होता?
‘कामत’ म्हटल्यावर जन्मच रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये होतो. माझा प्रवास काही फारसा खडतर प्रवास नव्हता, कारण जन्मापासूनच ‘कामत फूड’ म्हणून प्रसिद्ध आहे. आमचा जन्मच आणि विचारधाराच ही आहे की लोकांना कसं छान जेवण आणि व्यवस्था देऊन खुश ठेवता येईल. आम्ही कधी दुसर्यांच्या हॉटेलमध्ये जरी गेलो तरी तिथे आम्ही बर्याच गोष्टींचे निरिक्षण करतो.

‘VITS कामत्स’ ग्रुपने अलीकडेच ‘कामत्स लेगसी’ प्रिमियम डायनिंग स्पेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)‘कामत्स लेगसी’ या विचारांतून सुरू झालं की आपण लोकांना आणखी काही तरी दिलं पाहिजे. ‘कामत’ म्हटलं की लोकांच्या मनात नेहमी उत्कृष्ट दर्जाचं चविष्ट जेवण येते. ‘कामत’ हॉटेल हे दाक्षिणात्य जेवणासाठी प्रसिद्ध आहे. त्यात वेगवेगळे, नवीन व एकदम ऑथेंटिक दाक्षिणात्य पदार्थ लोकांना मिळावेत यासाठी ‘कामत्स लेगसी’ सुरू करण्यात आलं आहे. इडली, डोसा तर सगळे नेहमीच खातात, परंतु त्यातसुद्धा खूप काही वेगळे प्रकार असतात जे आपल्याला ‘कामत्स लेगसी’मध्ये चाखायला मिळतील.
२०२३ आणि एकूणच भविष्याबद्दल काय प्लॅन आहेत?
आमच्या नवीन सुरू झालेल्या ‘कामत्स लेगसी’ या रेस्टॉरंटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन या वर्षी आमचं पूर्ण लक्ष ‘कामत्स लेगसी’ आधी मुंबई, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात होईल तेवढ्या शहरांमध्ये सुरू करायचं हे आहे; जेणेकरून ज्यांना दाक्षिणात्य खाण्यात रुची आहे, ते याचा आनंद घेऊ शकतात.
या उद्योगात यशस्वी होण्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते?
या उद्योगात यशस्वी होण्यासाठी, आवश्यक आहे की आपण माणसांना कशाप्रकारे समजू शकतो व हॅन्डल करू शकतो. कारण शेवटी हा व्यवसाय ग्राहकांवर अवलंबून आहे. तुम्ही स्वतःच्या ग्राहकाला, कर्मचार्यांना किती समजून घेता, हे या व्यवसायात खूप महत्त्वाचं आहे. याच्यात मला एक गोष्ट जोडावीशी वाटते, ती म्हणजे जेव्हा मी माझ्या वडिलांसोबत इथे तिथे कामासाठी फिरायचो, बर्याच गोष्टी बघायचो तशीच आज माझी मुलं पण मी कुठेही जातो, तेव्हा तेपण माझ्यासारखेच या व्यवसायामध्ये रस घेतात.
या क्षेत्रात येण्यार्या नव्या पिढीला काय संदेश द्याल?
नव्या पिढीला मी हाच संदेश देईन की तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा आणि थोडे सहनशील बना.
मुलाखत – अंजली हेगडे
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.