स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
आपल्या प्रगतीसाठी दुसरं कोणी, मग ते शासन, प्रशासन, राजकारणी, समाजकारणी इत्यादी कोणीही काम करेल याची वाट न पाहत बसता, आपल्यालाच आपल्यासाठी आपला वेळ, शक्ती, बुद्धी आणि सर्वस्व गुंतवले पाहिजे. किती काळ अंथरूण पाहूनच पाय पसरणार? कधी तरी अंथरूण मोठं करण्याचा विचार केला पाहिजेच ना? आणि हा नुसता विचार करून चालणार नाही, तर त्यासाठी प्रयत्न आणि मेहनतही करावी लागणार आहे.
आपल्या घरात सुबत्ता यायची असेल, तर आपल्यालाच आपली कार्यप्रवणता वाढवली पाहिजे. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’, ही वृत्ती सोडून मराठी माणसाने अधिकाधिक सुबत्ता मिळवण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे; म्हणजेच नोकरी वा कसाबसा चाललेला व्यवसाय-व्यापार याच उत्पन्नाच्या एकाच मार्गावर अवलंबून न राहता त्याच्या जोडीला काही तरी जोडधंदा केला पाहिजे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.
या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p
यातूनच आपल्याला आपली स्वप्नं पूर्ण करता येणार आहेत, संपत्ती निर्माण करता येणार आहे, गुंतवणूक करता येणार आहे. यातूनच संपूर्ण महाराष्ट्र आणि देश खर्या अर्थाने प्रगत होईल.
एक सामान्य नोकरदार आणि उद्योजक यांच्यात मूलभूत फरक हाच आहे की, नोकरदार तयार केलेल्या यंत्रणेनुसार सांगितले जाईल तितकेच काम करतो आणि उद्योजक हा स्वत:ची यंत्रणा निर्माण करतो.
उद्योजकतेची सुरुवात ही स्वावलंबनातून होते. तुम्हीही उद्योजक होण्याचा विचार करत असाल, तर नोकरदारीतील परावलंबी मानसिकता सोडून कार्यप्रवण व्हा!
– शैलेश राजपूत
स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.