1007 annual marketing

आईपण आणि उद्योजकता यांचा सुंदर समतोल – करुणा जाधव वानखेडे यांची प्रेरणादायी कथा

छत्रपती संभाजीनगर येथील करुणा जाधव वानखेडे या नवउद्योजिकेने आपल्या जिद्द, कल्पकता आणि कुटुंबाच्या पाठिंब्यावर उद्योजकतेची वाट निवडली. १३ जून १९९१ रोजी जन्मलेल्या करुणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून Master of Tourism Administration ही पदवी पूर्ण केली. शिक्षणाच्या काळातच त्यांच्यातील उद्योजकीय विचारांना सुरुवात झाली होती.

Karuna jadhav wankhedeकॉलेजमध्ये असताना विद्यार्थ्यांना नोट्स आणि प्रिंटआउट मिळवण्यासाठी खूप गर्दी होत असल्याचे त्यांनी पाहिले. प्रिंट मिळण्यासाठी अनेकदा दुसऱ्या दिवशीपर्यंत वाट पाहावी लागायची. याच समस्येतून करुणा यांच्या मनात एक छोटासा व्यवसायाचा विचार आला.

त्यांनी कॉलेजमधील नोट्स गोळा करून आपल्या वडिलांच्या ओळखीच्या झेरॉक्स मशीनवर त्या कॉपी करून विद्यार्थ्यांना कमी मार्जिनमध्ये उपलब्ध करून दिल्या. या छोट्या उपक्रमातून त्यांना त्या काळात ५० ते १०० रुपयांचा नफा मिळू लागला आणि उद्योजकतेची पहिली चुणूक दिसू लागली.

पुढील काळात करुणा या गृहिणी म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होत्या. मात्र लहानपणापासून असलेली व्यवसायाची आवड त्यांनी कधीच सोडली नाही. बाळाच्या जन्मानंतरही त्यांनी आपल्या स्वप्नांना विराम दिला नाही. कुटुंब आणि व्यवसाय यांचा समतोल साधत त्यांनी २०२३ मध्ये ‘Dream Journey Travel Agency’ या व्यवसायाची स्थापना केली.

उद्योजकीय प्रवासात सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. विशेषतः बाळाची काळजी, घरची जबाबदारी आणि व्यवसायाची सुरुवात या सगळ्यांचा समतोल साधणे हे मोठे आव्हान होते. पण करुणा यांनी समस्यांवर अडकून न राहता त्यांच्या उपायांवर लक्ष केंद्रित केले आणि सातत्याने प्रयत्न करत राहिल्या.

WhatsApp Channel Banner

या प्रवासात त्यांना आई-वडील, भाऊ आणि पती यांची मोठी साथ मिळाली. कुटुंबाच्या या पाठिंब्यामुळे त्यांना व्यवसाय पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली.

आज त्या आपल्या व्यवसायाला अधिक मोठ्या स्तरावर नेण्याची तयारी करत आहेत. बाळ थोडे मोठे झाल्यानंतर बाजारपेठेत अधिक सक्रियपणे उतरून Dream Journey Travel Agency ला पुढील उंचीवर नेण्याचा त्यांचा निर्धार आहे.

करुणा वानखेडे यांची कथा सांगते की उद्योजकतेसाठी मोठी सुरुवात आवश्यक नसते; एक छोटा विचार, सातत्य आणि कुटुंबाचा पाठिंबा असला तरी यशाचा प्रवास सुरू होऊ शकतो.

संपर्क क्रमांक : 7021942022
ई-मेल : karudreamjourney@gmail.com

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart-Udyojak-5-years-subscription