Advertisement
उद्योग कथा

त्वरित एनर्जी देणारी उत्पादने बनवणारे आहारतज्ज्ञ डॉ. कौस्तुभ गद्रे

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

मुंबईत विक्रीकर विभागात नोकरी करणार्यास एका बाईंना रोज संध्याकाळी पाय सुजण्याची व्याधी होती. इतके की पायांत चप्पल घुसत नसे. त्या डोंबिवलीत आहारतज्ज्ञ डॉ. कौस्तुभ गद्रे यांच्याकडे आल्या. डॉ. गद्रे यांनी त्यांचा आहार व दिनचर्येची माहिती घेतली. त्या बाई सकाळी खारी, दुपारी सॅण्डविच वगैरे पदार्थ जास्त खायच्या. गद्रे यांनी त्यांच्या आहारात बदल सुचवले. त्यांना प्रोटीनयुक्त नाश्ता व जेवण करायला सांगितले. पूरक आहार म्हणून त्यांनीच बनवलेली ‘गॅपोमिल’ ही पावडर खायला सांगितली.

रुग्णाची तपासणी करताना डॉ. कौस्तुभ गद्रे

आहारात तो बदल केल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे दुखणे बरे झाले. असाच किरण नावाचा गरीब शाळकरी विद्यार्थी होता. तो नेमका परीक्षेच्या तोंडावर सर्दी-खोकल्याने आजारी पडत असे. त्यालाही ‘गॅपोमिल’ पावडर मोफत दिली. त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्नी सुटले. आता तो डॉ. गद्रे यांच्या सर्वंकष व पूरक आहार देण्याच्या मिशनमध्ये सहभागी झाला आहे. व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या डॉ. कौस्तुभ गद्रे यांना आहारतज्ज्ञ म्हणूनच ओळखले जाते.

डॉ. कौस्तुभ गद्रे यांच्यात शालेय वयापासूनच संशोधक वृत्ती होती. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही तरी वेगळे करायची आवड होती. प्रख्यात आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. विनय वेलणकर यांच्या सूचनेनुसार ते 1991 साली बीएएमएस झाले. आयुर्वेदिक पंचकर्माची प्रॅक्टिस करत डोंबिवलीत त्यांनी क्लिनिक सुरू केले.

डायटिशियन मालती कारवारकर यांची आहारविषयक अनेक पुस्तके वाचून त्यांना आहारशास्त्रात रस निर्माण झाला. नेेताजी सुभाष इन्स्टिट्यूटमधून त्यांनी आहारशास्त्रात पदव्युत्तर पदविका घेतली. तिथेही ते रँक होल्डर ठरले. आयुर्वेदात अपवादात्मक पदार्थांचा वापर करून विशेष विकारांवर उपचार केला जातो. या मूळ सूत्राचा वापर करून डॉ. गद्रे यांनी सोयाबीन, अळशी, सेल कॅल्शियम व रासायनिक द्रव्यविरहित गूळ यांचा समावेश करून एक विशेष पूरक आहारद्रव्य विकसित केले आहे. सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन असते.

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या सोयाबीनला मोड आणून व ते वाळूत भाजून त्यांनी हे ‘गॅपोमिल’ हे एनर्जीबूस्टर बनवले आहे. ते रुचकर आहे. त्यात सैंधव मिठाचा वापर केला आहे. औषधे घेताना तोंड वाकडे केले जाते. गॅपोमिल चविष्ट असल्याने ते आवडीने खाल्लेआ जाते. रोेज चार वेळा 3-4 छोटे चमचे ‘गॅपोमिल’ तोंडात टाकल्यास एका प्रौढ मनुष्याच्या आहाराविषयक सर्व गरजा पूर्ण होतात. तो तरतरीत राहतो. गॅपोमिल हेे कौस्तुभ गद्रे याचे एकमेव उत्पादन नव्हे. त्यांच्या ‘श्री संदीपक’ या ब्रॅण्डखाली ते डायबीटिसचे वाढते प्रमाण आटोक्यात यावे म्हणून ‘गॅपोमिल’ डायबेटीक सपोर्ट फूड बनवतात. तसेच नैसर्गिक चणे-दाणे व डायनॅमिक सोयानटस् यांचे हेल्दी मंच म्हणजे मजेत खायचे रुचकर दाणे देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. चोकोबूस्ट हे मुलांसाठीचा पूरक आहार आहे. त्यात चॉकलेट फ्लेवरचे कोको असल्याने मुले ते आवडीने खातात. डॉ. गद्रे यांची उत्पादनेआयुर्वेदिक आणि जीवनसत्त्वांनी ठासून भरलेली आहेत. वाढत्या वयाच्या मुलांच्या सर्व पोषणविषयक गरजा ते भागवतात.

केवळ आरोग्यविषयक समस्याच नव्हेत, तर व्यसनाधीनता दूर करण्यासाठीही आहारतज्ज्ञ डॉ. गद्रे यांची उत्पादने परिणामकारक आहेत. पंजाबमध्ये गर्दसारख्या अमली पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात आहे. तेथील एक समाजसेवी संस्था व्यसन दूर करण्यासाठी डॉ. गद्रे यांची उत्पादने वापरते व तिला आश्चर्यजनक परिणाम मिळाले आहेत.

डॉ. कौस्तुभ गद्रे यांच्या या सर्व वाटचालीत त्यांच्या पत्नी केतकी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनीही आहारशास्त्राचा कोर्स केलेला आहे. त्यांनी चोकोबूस्टपासून प्रथमच आरोग्यदायी चॉकलेट विकसित केले आहे.

‘अन्न तारी व अन्न मारी’, अशी म्हण आहे. चुकीच्या आहारामुळे विविध विकार उद्भवतात. योग्य आहाराने त्यांचे निराकरण होऊ शकते. सध्याच्या स्पर्धात्मक युगात त्वरित यश-पैसा मिळवण्यासाठी शरीरावर खूप अन्याय केला जातो. अवेळी जेवण, फास्ट फूड, जंक फूड यामुळे शरीराला अनेक आवश्यक घटक मिळत नाहीत. योग्य आहाराने ही तुटी दूर होते. डॉ. कौस्तुभ गद्रे एक कळकळीचे समाजसेवक आहेत. त्यांच्या क्लिनिकमध्ये येणार्‍यांना लहान मुलांना ते प्रेमाने ‘गॅपोमिल’ चूर्ण भरवतात. फारशी जाहिरात न करता मौखिक प्रसिद्धीनेच देशाच्या अनेक राज्यांत त्यांची उत्पादने मागवली जातात. लोकांना त्यांच्या कार्याची माहिती व्हावी व त्यांनी डॉ. गद्रे यांच्या आहारद्रव्यांचा लाभ घेऊन आरोग्य प्राप्तण करावे म्हणून हा लेख प्रपंच.

संपर्क – डॉ. कौस्तुभ गद्रे
9967772305, 8169503235

मुलाखत : प्रशांत असलेकर (पॅसिफिक मीडिया सर्व्हिसेस)
भ्रमणध्वनी : 9322049083, 9689114854

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: