१००९ वेळा नकार पचवून आज जगभर विस्तारला आहे हा ब्रॅण्ड


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


उद्योगात उतरताना लगेचच यश पदरी पडावे अशी अनेकांची अपेक्षा असते. काही जण सुरुवातीच्या काळातच आलेल्या संकटांना घाबरून उद्योग बंद करतात. सातत्य आणि कामावरची श्रद्धा, विश्वास हा किती महत्त्वाचा असतो हे अनेकांना लक्षातच येत नाही. त्या प्रत्येकासाठी KFC (Kentucky Fried Chicken) ची जगभर यशस्वी चेन उभी करणाऱ्या कर्नल सँडर्स (Colonel Sanders) यांची ही गोष्ट. वयाच्या पासष्टीत उद्योगात नव्याने स्वत:ला उभं करणाऱ्या, किंबहुना उद्योगजगतात इतिहास घडवणाऱ्या अवलियाची.

प्रत्यक्ष पासष्टाव्या वर्षी नव्याने उद्योग उभारताना एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल १००९ वेळा अपयशाला सामोरे जाऊन स्वत:चं साम्राज्य उभारलेल्या उद्योजकाची ही गोष्ट खूप काही शिकवणारी आहे.

‘KFC’ चे संस्थापक कर्नल सँडर्स

सँडर्स यांचा जीवनप्रवास तसा खडतरच. आयुष्यात बरेच चढउतार त्यांनी पाहिले; परंतु कधीही त्यांनी हार मानली नाही. सँडर्स यांचा जन्म ९ सप्टेंबर १८९० साली अमेरिकेतील एका गरीब कुटुंबात झाला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या डोक्यावरून पितृछत्र हरपलं. आईला घरकामात मदत करत असताना लहानपणीच ते उत्तम स्वयंपाकी झाले.

हलाखीच्या काळात आईने दुसरा विवाह केला आणि सावत्र वडिलांशी मनाचे धागे न जुळल्याने वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी घर सोडले व ते स्वतंत्रपणे जगू लागले. त्यांच्या आयुष्यातला घटनाक्रम पाहिला तर ती त्यांच्या समोर येणार्‍या संकटांची सुरुवातच होती.

लहान वयातच शाळा सुटली. सतराव्या वर्षापर्यंत चार नोकर्‍या सुटल्या. अठराव्या वर्षी लग्न केले. पुढे काही काळ कंडक्टर म्हणून काम केले. एकोणिसाव्या वर्षी बाप झाले. पुढे बायकोही सोडून गेली. त्यांनी आर्मीतही स्वत:साठी प्रयत्न केले; परंतु तेथूनही काढले गेले.

एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून नोकरी पत्करली. काही काळाने रिटायरमेंटच्या वेळी सरकारकडून त्यांना चेक मिळाला तो फक्त १०५ डॉलर्सचा. त्यापूर्वी अनेक वेळा आत्महत्येचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला.

जागतिक मंदीच्या काळात सँडर्स रस्त्यावरच एक रेस्टॉरंट चालवत असत. त्या वेळी त्यांचा हा व्यवसाय काही चालत नव्हता. पैशांची तंगी होती. हताश सँडर्स यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येऊ लागला. त्यावेळी त्यांचे वय होते पासष्ट.

एक दिवस भूतकाळाचा विचार करत असताना आपण आयुष्यात काय केले, असा एक सहजच विचार त्यांच्या मनात आला आणि आपल्याला अजून बरंच काही आयुष्यात करायचं आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्याच क्षणी त्यांनी पुन्हा उभारी घेतली.

सँडर्स यांना स्वयंपाकाची आवड होती. ते त्यात रमत असत. त्यातही त्यांचे मसाले आणि फ्राइड चिकन ही खासियत आणि वेगळेपण होते. तेव्हाच त्यांनी आपल्या या आवडीचे यशस्वी उद्योगात रूपांतर करायचे नक्की केले. रिटायरमेंटच्या वेळी त्यांना सरकारकडून १०५ डॉलर्स मिळाले होते. सँडर्स यांनी ८७ डॉलर्स खर्च करून उद्योगासाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी केले आणि कामाचा श्रीगणेशा केला. त्यांची खासियत असलेले फ्राइड चिकन ते दारोदारी जाऊन विकू लागले. सँडर्स आपल्या फ्राइड चिकनची रेसिपी अनेकांसोबत शेअर करत असत. लोकांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असते. त्यातून त्यांना ताकद मिळे.

KFC चिकन बनवताना कर्नल सँडर्स

ते घरोघरी, विविध रेस्टॉरंट्समध्ये जाऊन आपली रेसिपी दाखवू लागले. त्यासाठी ते स्वत: गाडी चालवत अनेक मैल प्रवास करत होते. कारण त्यांना ही रेसिपी विकण्यासाठी चांगला भागीदार हवा होता. त्यांचे हे प्रयत्न अविरत चालू होते. विविध रेस्टॉरंट्सना ते भेटी देऊ लागले.

लगेच तिथल्या तिथे ते रेसिपी बनवून दाखवू लागले आणि जर रेस्टॉरंटच्या मालकांना रेसिपी आवडली तर लगेचच ते विकण्याचा करार करण्यासाठी हातमिळवणी करू लागले; परंतु असा करार होण्यासाठी म्हणजे त्यांचा पहिला करार करण्यासाठी मिळालेला ‘होकार’ त्यांना एक, दोन, तीन, चार, पाच……. नव्हे तर तब्बल १००९ वेळा नकार घेतल्यानंतर मिळाला होता.

‘अगदी बरोबर वाचलंत… १००९ वेळा त्यांनी नकार घेतला.’

रेस्टॉरंटशी करार करताना त्यांचा करार असा असे की, कर्नल सँडर्स त्यांच्या रेसिपीत वापरल्या जाणार्‍या सिक्रेट वनस्पती व मसाल्यांची माहिती त्या रेस्टॉरंटच्या मालकांना देत असत. १९६४ पर्यंत सँडर्स यांच्या ‘फ्राइड चिकन’ विक्रेत्यांच्या 600 फ्रँचायझीज होत्या. त्या वेळी त्यांनी आपली कंपनी ही 2 मिलियन डॉलर्सना विकली.

जरी त्यांनी आपली कंपनी विकली तरी ते त्या कंपनीचे नेहमीच चेहरा राहिले. म्हणूनच KFC म्हटलं की डोळ्यासमोर येते ते म्हणजे चष्मा घातलेले, पांढराशुभ्र सूट घालून त्यावर  काळा टाय बांधलेला व हातात काठी घेतलेल्या व्यक्तीचा पुतळा असलेले प्रवेशद्वार.

1976 साली कर्नल सँडर्स हे जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. हे खरोखरच विलक्षण आहे की, एखादी व्यक्ती वयाच्या पासष्टाव्या वर्षी व्यवसायास सुरुवात करते आणि आपल्या ‘फ्राइड चिकन’ या वेगळ्या रेसिपीची एक चेन जगभर उभी करून जगविख्यात साम्राज्य उभे करते. म्हणूनच ”Believe Dream, Try Succeed & Age No Bar”

 – प्रतिभा राजपूत

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?