मुलं आणि बँकांचे व्यवहार

लहान मुलांच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्याच्या उत्साहामुळे नेहमी वेगवेगळे प्रश्न पडत असतात व सतत त्यांना मोठ्यांच्या गप्पा गोष्टी ऐकण्याचीदेखील इच्छा असते. ज्याप्रमाणे, घरातील पैशाचे व्यवहार, बँकेची कामे या सार्‍यापासून लहान मुलांना त्यांच्या वयोमानाचा विचार करून बर्‍याचदा दूर ठेवले जाते.

‘हे मोठ्यांचे काम आहे, यामध्ये आपण पडू नये’, ‘मोठ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नये’, ‘तुला समजणार नाही, तू लहान आहेस’, असे सांगितले जाते. अशामुळे ती आणखी हट्टी होतात. हीच पालक व मुलं यांच्यामधील वादविवाद सुरू होण्याची चाहूल असते.

लहान मुलांना समजणार नाही अशा व्यवहारापासून त्यांना दूर ठेवणे योग्य असले तरी बँकेची कामे समजून घेण्याला कुठलेही वयाचे बंधन नाही. त्यामुळे लहान वयातच त्यांना बँकेची गुंतागुंतीची प्रक्रिया समजावून सांगण्यास सुरुवात करावी, यामुळे अप्रत्यक्षरीत्या पैशाचे महत्त्वदेखील त्यांच्या लक्षात येते.

बँकेत जाताना सोबत त्यांनाही घेऊन जावे, कारण लहान मुलांची निरीक्षणशक्ती चांगली असल्याने बर्‍याच गोष्टी फक्त निरीक्षणातून ते सहज आत्मसात करतात.

हल्ली लहान मुलांचे बचत खाते उघडता येते, त्याचा उपयोग करावा. यामुळे त्यांना खाऊसाठी दिलेली रक्कमदेखील ते मोठ्या आनंदाने साठवू लागतील आणि त्यांनी साठवलेल्या पैशातून तुम्ही त्यांनाच काही वस्तू घेण्यास सांगू शकता, ज्यामुळे तेही खूश होतील.

एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी कधी कधी मुले खूपच हट्ट करतात. अशा वेळी त्यांना ठाम नाही सांगून अनावश्यक गोष्टींपेक्षा पैशाचे महत्त्व अधिक असल्याचे समजावून सांगावे. लहानपणापासूनच जर मुलांच्या हट्टावर नियंत्रण ठेवले, तर भविष्यासाठी त्यांचा बचतीचा दृष्टिकोन घडवण्यासाठी हे उपयुक्त ठरते.

लहानपणापासून बँकेचे व्यवहार समजून घेतल्याने ते किचकट न वाटता, त्यांना सोप्पे वाटून गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा, बँकेकडून दिल्या जाणार्‍या सोयीसुविधांचा ते योग्यरीत्या उपयोग करतील.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?