बौद्धिक संपदा; वास्तव आणि संधी


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


२६ एप्रिल रोजी World Intellectual Property Orgnization (WIPO) या संस्थेची स्थापना जिनिव्हा येथे झाली होती. त्यामुळे आजचा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा दिवस म्हणून साजरा केला जातो. ही संस्था विविध बौद्धिक संपदेचे तसेच त्यासंबंधित करारांचे नियंत्रण करते.

नवनिर्मिती हा मनुष्याचा स्वभाव आहे. बुद्धी आणि मन यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या बौद्धिक संपदा या अमुर्त प्रकारच्या (Non physical property) पुर्णत: भिन्न आहेत. एकविसाव्या शतकात एक महत्त्वाची जबाबदारी या बौद्धिक संपदा बजावत आहेत.

विकसित देशांच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा हा बौद्धिक संपदांचा आहे. आजही प्रगत देशातील पेटंटच्या संख्येसमोर भारतातील पेटंटची संख्या नगण्य आहे. कोणत्याही देशाला औद्योगिक स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी बौद्धिक संपदा हक्क महत्त्वाची भूमिका बजावतात.

अमेरिकेने केलेल्या हळदीच्या पेटंटचे उदाहरण सर्वांना ठाऊक आहेच. अशाच प्रकारची इतर अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. बौद्धिक संपदेबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. तोपर्यंत ही परिस्थिती बदलू शकत नाही.

बौद्धिक संपदेचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि इंडस्ट्रीअल डिझाइन सर्वज्ञात आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नवनिर्मिती होत असूनही त्याचा हवा तसा फायदा आपल्या उद्योजकांना होत नाही. याचे मुळ कारण म्हणजे अतिदुर्लक्षीत राहिलेला हा विषय. बौद्धिक संपदेचे मुख्यत: दोन प्रकार आहेत.

औद्योगिक संपदा (Industrial property) आणि कलात्मक संपदा (Artistic property). बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights – IPR) मिळवण्यासाठी बौद्धिक संपदा कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो. प्रत्येक बौद्धिक संपदेसाठी अर्ज करण्याची पद्धत वेगळी आहे.

बौद्धिक संपदेचे हक्क निर्मात्याला देताना सरकार हे समाज आणि निर्मात्याच्य अधिकारांमध्ये समतोल ठेवण्याचे काम करते. प्रत्येक बौद्धिक संपदा ही ठराविक कालावधीसाठी संरक्षित केली जाते आणि त्यानंतर ती समाजाच्या उपयोगासाठी खुली होते.

भारतामध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथे बौद्धिक संपदा कार्यालये आहेत. बौद्धिक संपदा या कायद्याने संरक्षित केल्या जातात, म्हणून त्यांची नोंद करण्यासाठी विविध बौद्धिक संपदा कायदेतज्ज्ञ उपलब्ध आहेत. बौद्धिक संपदा नोंदवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते निर्मात्याला मदत करतात.

निर्मात्याला बौद्धिक संपदा मिळाल्यावर तो इतरांना ती वापरण्यासाठी त्याचा परवाना देऊ शकतो. दुसर्‍याला परवाना देण्याच्या बदल्यात बौद्धिक संपदाधारकाला रॉयल्टी मिळते. सर्व प्रकारच्या बौद्धिक संपदा या विकता येतात, तसेच त्या पुढच्या पिढीकडे सोपवताही येतात.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमाने जर व्यवसायांना मोठी उंची गाठायची असेल आणि स्पर्धेपासून दूर राहून एक मोठा आणि यशस्वी उद्योग उभा करायचा असेल तर बौद्धिक संपदेला पर्याय नाही.

– अभिजीत भांड
(लेखक बौद्धिक संपदा विषयाचे तज्ज्ञ आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?