रोहा तालुक्यात ग्राहक सेवा केंद्र चालवणारे स्वप्नेश किनरे

Udyojak swapnesh kinare

उद्योजकाचे नाव : स्वप्नेश राजेंद्र किनरे

व्यवसायाचे नाव : किनरे सर्व्हिसेस

व्यवसायाची स्थापना : २४ जानेवारी २०२३

मला लहानपणापासूनच व्यवसायाची आवड होती. कॉलेज संपल्यावर सगळेच कोणती नोकरी करायची या विचारात असताना मी मात्र कोणता व्यवसाय सुरू करता येईल या विचारात होतो.

मी राहतो त्या आजूबाजूच्या परिसरात सर्व कार्ड्सची कामे (Aadhaar, Pan, Voter, Etc.) एकाच ठिकाणी होतील असे ठिकाण नव्हते, तसेच लोकांना तासन तास रांगेत उभे राहावे लागत होते, कामे लगेच होत नव्हती. मग मी विचार केला की आपण ही समस्या दूर करूया. तेव्हा मी माझे ‘ग्राहक सेवा केंद्र’ (Maha E Seva Kendra) सुरू केले.

याचबरोबर मला शाळेपासूनच Trading & Investment चीसुद्धा खूप आवड होती. म्हणून मग मी, या व्यवसायाबरोबरच फावल्या वेळात Trading & Investment सुद्धा करतो. आज माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करून एक वर्ष झाले आहे. सर्वांचा खुपच उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

महत्त्वाचे म्हणजे हे सगळं करण्यामध्ये मला माझ्या कुटुंबाची खूप साथ मिळाली. त्यांनी माझ्यावर कधीच दबाव दिला नाही की नोकरी कर. मला व्यवसाय करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं. आजच्या ह्या स्पर्धात्मक युगात, जिथे नोकरी मिळणे कठीण झाले आहे, तिथे मी माझा स्वतःचा व्यवसाय करतो आहे ह्याचा मला अभिमान आहे.

WhatsApp Channel Banner

आमची कंपनी खालील सेवा देते :

आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, आभा कार्ड, आयुषमान कार्ड, ई-श्रम कार्ड, पासपोर्ट, आयकर रिटर्न भरणे, राजपत्र व इतर सेवा

संपर्क क्रमांक : 7756993483 / 9011897644

पत्ता : सदसहयोग हौसिंग सोसायटी, मु. पो. वरसे, तालुका – रोहा, जिल्हा – रायगड – 402116

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Register your business on the Maharashtra Business Directory and get a FREE LIFETIME SUBSCRIPTION to Smart Udyojak B2B Connect
Click here to Register
error: Content is protected !!
Scroll to Top